इथे आख्खा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. माणसांना प्यायला पाणी नाही. जनावरं पाण्यावाचून तडफडतायत. मुंबई-ठाण्यासारख्या पाण्याची ददात न भासणार्या भागातही दिवस-दिवस पाणी गायब होतेय. दुष्काळग्रस्त भागातील जनता एकेक थेंब पाण्यासाठी तहानलेली आहे. गावंच्या गावं स्थलांतर करतायत. आपण ही परिस्थिती रोजच विविध वाहिन्यावर पहातच आहोत.
या भीषण दुष्काळी परिस्थितीत शेजारच्या राज्यातून एक “बापू” येतो आणि आपल्या करणीने त्याच राज्यात जन्म घेतलेल्या दुसर्या महात्मा बनलेल्या“बापूं”चं नाव धुळीला मिळवतो. स्वयंघोषित “संत आसाराम बापू” यांचे हे कर्तृत्व. दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळत असताना आसाराम बापू यांनी अध्यात्माची गोळी दाढेखाली ठेवून होळीच्या नावाखाली लाखो लिटर्स पाण्याची नासाडी केली. केवळ एकदाच नाही तर दोनदा. […]
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले
जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे. […]
नुकताच ८ मार्च रोजी जागतिक महिलादिन सर्व जगभर मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. परंतू त्यात भारतासारख्या अनेक पुरुषप्रधान देशातील पुरुषांचा सहभाग किती होता? आणि नसल्यास सर्व स्त्री-पुरुषांनी नक्कीच आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. […]
आज आपण पाहता सगळीकडे दुष्काळ पसरला आहे. पाण्याविना पशु, पक्षी आणि मानव हैराण झाले आहेत. कधी निसर्ग कोपतो तर कधी राजकारणी कोपतात. कधी नैसर्गिक आपत्ती येते तर कधी मानवाने घडवलेली आपत्ती त्रास देते. एकूणच सर्व आनंदी आनंद आहे. सगळीकडे मर्यादेचे उलंघन होत आहे. […]
यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी १२ मार्च १९१३ रोजी झाला. त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. त्यांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रापुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला. […]
माहितीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञातील प्रगतीच्या जोरावर देश-विदेशात नवनवीन शोध लागताहेत आणि तरुणपिढीबरोबर इतरही मंडळी वाचन संस्कृती पासून दुरावत चालली आहेत असे काही विश्लेषकांच्या माहितीच्या आधारे कळते. […]
या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले. […]
ज्या अमेरिकेत प्रत्येक सहाव्या मिनिटाला एका अमेरिकन महिलेवर बलात्कार होतो आणि ५ पैकी एका महिलेवर आयुष्यात कधीना कधी एकदा तरी बलात्कार झालेला असतो, ज्या अमेरीकेत पुरुष सैनिक आपल्याच सहकारी महिला सैनिकावर बलात्कार करण्यात बदनाम झालेले आहेत, त्या अमेरिकेमध्ये जागतिक महिला दिनी – ८ मार्च २०१३ रोजी – दिल्लीमध्ये गेल्या वर्षी धावत्या बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणाची बळी ठरलेल्या २३ वर्षीय तरुणीला आंतरराष्ट्रीय महिला साहस पुरस्काराने गौरविण्यात आले.. […]
भगवान शंकराच्या आहुतीने मंत्र वगळून पुढील आहुती सुरु झाल्या आपल्या पतीचा झालेला हा अपमान मात्र सतीला सहन झाला नाही व संतापाने तिच्या अंगाचा भडका उडाला. क्रोध अनावर
झाला आपल्याच वडिलांकडून झालेली ही मानहानी सहन न होऊन सतीने त्याच यज्ञ मंडपात देह त्याग करण्याचे ठरविले व तिने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केले. […]