तत्कालीन पंतप्रधान श्री राजीव गांधी यांच्या पहिल्या भेटीत श्री प्रभाकर देवधर यांनी त्यांचे मन जिंकले. श्री राजीव गांधी आणि श्री देवधरसाहेबांच्या समविचारसरणीमुळेच दोघांतील हृणानुबंध जास्त घट्ट झाले. टीव्ही आणि संगणक उत्पादन कमी खर्चात कसे करता येईल या टेक्नोलॉजीचा श्री देवधर साहेबांनी सर्वव्यापक अभ्यास करून भारतात त्या काळी या उत्पादन क्षेत्रात क्रांती घडवून आणली. […]
जीवाचा थरकाप उडवून देणारी घटना काल घडली आणि माझ्या नावावर कलंकाचा एक डाग माझ्या माथ्यावर लागला इ.सन १९४७ साली भारत देश स्वातंत्र झाला देशाची राजधानी म्हणून माझी निवड झाली. […]
देशात महिला किती सुरक्षित आहेत याची जाणीव दिल्ली बलात्काराच्या घटनेनंतर सर्व स्त्रियांना झाली. कुटुंबासाठी अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांना रात्री-अपरात्री नोकरीवरून घरी यायचे असेल तर अशा परिस्थितीत त्यांनी काय करायचे? घाबरून घरी बसणे म्हणजे पळपुटे लक्षण समजण्यात येईल आणि गुन्हेगारांच्या गुन्ह्यात वाढ होईल आणि त्यांचे मनोधैर्य वाढेल. त्यावर ठाण्यात चिल्ड्रन टेक सेंटरच्या विद्यार्थ्यांकडून इलेट्रोनिक ग्यॅझेट तयार करण्यात यश आले आहे. तो उपक्रम चालवणारे पुरषोत्तम पाचपांडे यांना रोबोटिक चप्पल तयार करण्याची कल्पना सुचली. […]