कोकणात आढळणाऱ्या मंदिरांमध्ये मुख्यतः ग्रामदेवतेचे मंदिर महत्वाचे असते. त्याव्यतिरिक्त काही खाजगी मंदिरे सुद्धा आहेत. आज नोकरी व्यवसायाची साधने बदलल्यामुळे कोंकणातील बहुसंख्य लोक शहराकडे स्थायिक झाले आहेत. पण आपल्या गावाकडील ग्रामदेवतेचे मंदिर हा त्यांच्या जिव्हाळयाचा विषय आहे. कोकणातील मंदिरांमध्ये साजरे होणारे सण उत्सव, जत्रा यांच्या प्रथा-रूढी आणि परंपरांमुळे समाजातील एकोपा आणि बांधिलकी टिकून राहण्यास मदत होते. […]
कोकणात मंदिरांबरोबरच विविध देवतांच्या सुट्या मूर्ती बघण्यासारख्या आहेत. कदाचित त्यांची इथे पूर्वी मंदिरे असावीत. पण आज ती कुठे दिसत नाहीत. आज मात्र या मूर्ती खास कोकणी पद्धतीच्या साध्यासुध्या कौलारू देवळात ठेवलेल्या दिसतात. कोकण हा जसा निसर्गाने नटलेला प्रदेश आहे, तसाच तो असंख्य चालीरीती, रूढी-परंपरा आणि विविध मूर्ती आणि मंदिरांनी सजलेला प्रदेशही आहे. कोकणातली बरीच मंदिरे अगदी […]
चित्रकथी कलाकार मूळचे महाराष्ट्रातील नसून ते भटकत भटकत महाराष्ट्रात आले. राजाश्रय मिळविण्यासाठी चित्रकथांची निर्मिती झाली. सावंतवाडीचे संस्थानिक खेम सावंत, शिवराम राजे यांच्या अश्रयाने ते तिथे कायम स्वरूपी वस्ती करून राहिले आणि हळूहळू ती कला बहरत गेली. बहरलेली ही कला पाहून खूष होऊन राजांनी या कलाकार मंडळींना ठराविक देवळे वतन म्हणून दिली. […]
इथल्या निसर्गाने इथल्या माणसाला कणखरपणा दिला, त्याच्या मनगटात कर्तृत्व गाजवण्याची ताकद दिली. इथल्या मातीतले अनेक नमुने आपापली छाप लोकांच्या मनावर कोरून गेले. पालघर पासून ते कुडाळ पर्यंत अनेक लोकांना भेटता आलं आणि एक गोष्ट जाणवली की इथला प्रत्येक माणूस ही एक स्वतंत्र संस्था आहे. प्रत्येकाच्या जगण्याच्या तर्हा निराळ्या, जगण्याचे संदर्भ निराळे, त्याच्या सुखाच्या कल्पना निराळ्या. […]
एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय ती लवकर पूर्ण होत नाही. भाईंनी कोकणातील कवी, लेखक व रसिकांना जोडण्याचा ध्यास घेतला होता. केवळ तीन महिन्यात सगळी जुळवाजुळव करून 1991 च्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोकण मराठी साहित्य परिषदेची गुढी उभारली गेली. उत्तर कोकणातून डहाणू, पालघर, केळवे, माहीम, वसई, ठाणे, कल्याण तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्हा यातील साहित्य रसिक कोमसापच्या कल्पनेने भारून गेले. […]
न्यूझीलंडला जाण्याआधीच त्याच्या सृष्टीसौंदर्याबद्दल, तिथल्या रस्त्यांच्या चढ-उतारांबद्दल, निरम आकाशाबद्दल इतकंच काय पण तगड्या गाईबद्दलही खूप वर्णनं ऐकली होती, वाचली होती. हल्ली स्वित्झर्लंड खूप महाग झाल्याने बऱ्याच सिनेमांचे शूटिंगही न्यूझीलंडमध्येच होते ही माहितीही आमच्या पोतडीत जमा झाली होती. त्यामुळे न्यूझीलंड पहाण्याची इच्छा प्रबळ झाली व आम्ही एका कंडक्टेड टूरचा तपास सुरू केला. आमच्या वेळेसाठी योग्य अशी ‘जेट […]
प्रत्येक बोलीभाषेत एक वेगळे सौंदर्य असते, ती बोलण्याची खुबी असते, आपला असा एक बाज असतो, गोडी असते ती सारी कोकणातील या बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत पुरेपूर आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शहरात राहणारे लोक आपसात बोलताना सर्रास बाणकोटी व मालवणी बोलीभाषेत बोलत असतात ते ऐकणाऱ्यांनाही गोड वाटते. थोडे फार कोळी-आगरी बोलीबाबत असेच बोलता येईल. एकूणच कोकण ही निसर्गसौंदर्याची खाण आहे […]
मराठवाडा ही साधुसंतांची भूमी आहे. क्रांतिकारकांच्या योगदानाविषयी लिहिताना जागतिक कीर्तीचे अनेक विचारवंत आठवतात. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, लोकमान्य टिळक, बाजीराव पेशवे, नाना फडणीस, कान्होजी आंग्रे, धोंडो केशव कर्वे, पां. बा. काणे, गो. कृ. गोखले किती थोरामोठ्यांनी कोकणात जन्म घेतलाय म्हणून सांगावे? […]
भांडी घासताना विम बार धुणं धुताना व्हील तिच्याच हातात दाखवतात आणि तरीही ती किती सुंदर हसते जाहिरीतीत… बादशहा मसाल्याची फोडणीसुद्धा तिच देत असते आणि सासऱ्याच्या गुडघ्याला मुव तिच लावत असते आणि तरीही ती किती सुंदर हसते जाहिरातीत… बाळाचं डायपर तिच बदलते आणि मुलांना एका मिनिटात मॅगीही तिच बनवून देते आणि तरीही ती किती सुंदर हसते जाहिरातीत… […]
व्यापार बहराला येण्यासाठी राजकीय स्थैर्य असण्याची आवश्यकता असते. मौर्य काळात आणि पुढे महाराष्ट्रात सातवाहन काळात अशा प्रकारचे राजकीय स्थैर्य मोठ्या काळासाठी उपलब्ध झाले आणि म्हणूनच सातवाहन काळात कोकणातील बंदरांतून पश्चिमेकडील देशांशी आणि विशेषकरून रोमन साम्राज्याशी मोठ्या प्रमाणात व्यापार होत असे. कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा आर्थिक सुवर्णकाळ म्हणता येईल. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असलेला देश […]