तरच कत्तलखाने बंद होतील !
यातून तुम्हाला एकवेळ पैसे मिळणार नाहीत. पण कशाशीच तुलना करता न येणारे अमाप असे पुण्य मात्र नक्की मिळेल.
[…]
ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख
यातून तुम्हाला एकवेळ पैसे मिळणार नाहीत. पण कशाशीच तुलना करता न येणारे अमाप असे पुण्य मात्र नक्की मिळेल.
[…]
साम, दाम, दंड आणि भेद या आयुधांवर आधारित असलेलं राजकारण…गुन्हेगारी पार्श्वभूमीचा ठपका पुसण्यासाठी राजाश्रय हे एक पूरक आणि पोषक साधन…असुशिक्षित, असुशील व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते, ज्यांना समाजसेवेची ओढ,आवड अथवा समाजाशी कसलीही बांधिलकी नाही,..जनतेच्या अडी-अडचणी, दैनंदिन समस्या, सामाजिक प्रश्नांची जाण व समज नसलेले नेते जनतेचे नेतृत्व करण्यास लायक असतील का?
[…]
‘ट्विटर’ हे अमेरिकी संकेतस्थळ आहे आणि त्याचे भारतात कार्यालयही नाही. सरकारने बंदी घालायचे ठरवले तरी त्यांनी मनात आणले तर अनेक प्रकारे ही बंदी झुगारून ‘ट्विटर’ सुरू राहू शकते. जेथे ‘विकीलिक्स’ ला अमेरिका नमवू शकली नाही, तेथे भारताची काय पाड? त्यामुळे सरकारने उगाच स्वतःचे हसे करून घेऊ नये.
श्री. परेश प्रभू
संपादक, नवप्रभा
[…]
मुंबईत रझा अकादमीने काढलेल्या मोर्चानंतर हिंसाचार करणार्या दंगेखोरांविरुद्ध ठोस कारवाई न झाल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परवा काढलेला मोर्चा आणि नंतरची विराट जाहीर सभा या संघटनेच्या यापुढील वाटचालीला नवी दिशा देणारी ठरणार आहे. एवढ्या प्रचंड संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊनही अत्यंत शांततामय रीतीने ही सभा आणि मोर्चा पार पाडून मनसेने आपली संघटना ही हुल्लडबाजांची संघटना नाही आणि आपल्याकडे यापुढील काळात अधिक गांभीर्याने पाहावे लागेल असेच जणू सूचित केलेले आहे.
माझ्या आजवरच्या कारकिर्दीत मी असंख्य लोकांच्या मुलाखती घेत त्यांच्याशी संवाद साधला आहे. यापैकी काही माणसे चांगलीच स्मरणात राहिली आहेत. त्यापैकी विलासराव देशमुख हे एक व्यक्तिमत्त्व. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यावर त्यांच्याशी संवाद साधतानाचे ते सारे क्षण मनाच्या किनार्याशी ताजे होत डवरले.
विलासरावांच्या सहवासातून मला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दिसले. उत्तम राजकारणी, उत्तम प्रशासक, प्रगल्भ विचारांचा माणूस, सहृदय मित्र अशी अनेक गुणवैशिष्ट्ये विलासरावांच्या ठायी होती. महाराष्ट्राच्या बहुजन समाजाची तसेच नागरी समाजाची उत्तम जाण असणारा नेता, सरपंचापासून ते मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास आणि केंद्रीयमंत्रीपदापर्यंतची ही वाटचाल अत्यंत कष्टाची होती. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नाही तर दिल्लीच्या राजकारणातही मोठ्या परिश्रमपूर्वक पद्धतीने स्थान निर्माण केले. त्यांच्या या वाटचालीचा मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान वाटत राहील. त्यांची ही कारकीर्द आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येक मराठी माणसाच्या मनात सदैव घर करुन राहील.
मराठी भाषेचा विकास व्हावा, तिचे संवर्धन व्हावे, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन आणि कोल्हापुरचे जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या पुढाकाराने अनोखी संकल्पना साकारत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयाच्या आवारात मराठी ग्रंथदालन उभारण्याची योजना आकारास येत आहे.
[…]
आमच्या भारतात अनेक आदर्श परंपरा कोणताही गाजावाजा न करता वर्षानुवर्षे सुरु आहेत. यापैकीच एका, उदात्त हेतूने सुरु झालेल्या परंपरेचा हा एक धावता आढावा.
[…]
पुराणकालीन रामसेतू आख्यायिकेतील काल्पनिक भाग नसून नैसर्गिक चमत्कार आहे, भूगर्भातील चमत्कारिक संसाधनांचा वापर करून नल व नील या वानरांच्या(वनात राहणारे नर)सहकार्याने प्रभू श्रीरामचंद्राने बांधलेला सेतू होय. समुद्राच्या तळाशी बुडालेल्या रामसेतूच्या अस्तित्वाची साक्ष देणारे कितीतरी पुरावे भारतात आहेत. रामसेतू हा संशोधानाचा भाग आहे. अश्याच काही पुराव्यांचा मागोवा घेणारा हा लेखप्रपंच….
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions