‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ ही संतांची उक्ती त्याची सत्यता किती दृढ करते हे आतापर्यंतच्या आपल्या श्री गणेशाबरोबरच्या प्रवासातून लक्षात आलेच असेल. आता पर्यंत आपण विविध देशातील श्री गणेशांची माहिती मिळविली. त्याबरोबर आता आपण आपल्या राज्यातील आणि भारतातील गणेशांची माहिती मिळविणार आहोत. […]
कलीयुगात लग्नाच्या संकल्पना बदलत असतांना लग्न करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रमुख गोष्टींची आदलाबदल करून लग्न केली जात आहेत. त्यात गे लग्न, समलिंगी विवाह, लिंग बदलून विवाह अश्या अ-नैसर्गिक विवाहांना काही तरुणांमध्ये प्रचंड आकर्षण आहे. […]
पूर्वी राजांच्या काळात प्रसिद्ध असलेला मल्लखांब हा क्रीडा प्रकार तसा दुर्लक्षितच. शरीराच्या सर्वांगीण व्यायामाच्यादृष्टीने आवश्यक असा हा खेळ. शरीर निरोगी राखण्याचे काम हा खेळ करतो. कोकणात असे काही कलाकार आहेत, की ज्यांच्यातील सुप्त गुणांना कधी वावच मिळाला नाही. कोकण ही कलाकारांची खाण म्हटले तर वावगे ठरू नये. क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात कोकणातील अनेक हिरे चमकले. ‘मल्लखांब’ हा क्रीडा प्रकार तसा कठीण. पण कोकणच्या काही क्रीडापटूंनी तो लीलया पेलला. त्यातलाच एक क्रीडापटू विजयकुमार. […]
द्धापकाळ जीवनामधला अंतीम टप्पा. जणू जीवनाची संध्याकाळ. एका चक्रमय जीवनाचा शेवट होण्याचा पूर्वकाळ. समिश्र अशा भावनांचा उहापोह करण्याची वेळ. न जाणो एक विचार मनांत येतो की ह्या वयाकडे आदर भावाने बघण्या ऐवजी, गमतीदारपणाची हास्यास्पद वाटणारे वय, एक संभ्रमी अवस्था, समजली जाते. ज्याला थोडासे कुत्सीतपणाने बघीतले जाते. […]
श्रावण कृष्ण अष्टमीला विष्णूंचा आठवा अवतार भगवान कृष्णांचा जन्म झाला. त्यांचा जन्म मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, बुधवारी मथुरेत बंदीशाळेत (कारागृहात) झाला. या निमित्ताने हे व्रत करण्याची प्रथा आहे. […]
श्रीकृष्ण जयंतीचे दुसरे दिवशी हा साजरा केला जातो. याला काला, दही-हंडी अशीही नांवे आहेत. श्रीकृष्णांनी व्रजमंडलात गायी चरविताना सर्वांच्या शिदोर्या एकत्र करुन खाद्यपदार्थांचा काला केला व सर्वांसह भक्षण केले. […]
श्रीकृष्ण जन्मकथा श्रीकृष्ण जन्मकथा सांगतो ऐका विनवितो श्री विष्णु अवतार घेतो ह्या सृष्टीवर १ दुष्टांचा होई अनाचार पृथ्वीते होई पापभार त्यांचा करण्या संहार परमेश्र्वर अवतरती २ कंस राजा दुष्ट स्वतःस समजे श्रेष्ठ प्रजेला देई कष्ट स्वार्थापोटी ३ छळ करु लागला जनांचा लुटमार अत्याचार छंद त्याचा खूनही करी साधूसंतांचा दुष्टपणे ४ […]
पुण्यात घडविण्यात आलेल्या स्फोट मालिकांनी, आम्हाला नव्याने नव्या संदर्भासह विचार करण्यास भाग पाडले आहे. स्फोट कमी तीव्रतेचे असले तरी मात्र त्या स्फोटांची परिणामकारकता निश्चितच मोठी आहे. कमी तीव्रतेचे म्हणून त्याकडे दुर्लक्ष वा कमी लक्ष देणे आमच्यासाठी आत्मघात ठरेल हे निश्चित ! […]
सर्वोच्च न्यायालयाने व्याघ्र प्रकल्पांच्या केंद्रास्थानाच्या परिसरात (कोअर झोन) पर्यटक बंदी लागू करीत वाघांच्या शिकारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, यामुळे तमाम वन्यजीव प्रेमींना आनंद झाला. पर्यटक बंदीमुळे पर्यटकांची अनौपचारिक देखरेख संपृष्टात आल्याने वनअधिकारी निर्ढावल्यासारखे वागायला लागतील, याचा वारंवार प्रत्यय येतही आहे. बंदी असलेल्या जंगलात वनअधिकारी फिरतात की नाही हे पाहतो कोण ? वाघांच्या शिकारी झाल्यावर त्या इतरांना कळणार नाही, याची काळजी घेण्यात हा विभाग मोठा पटाईत आहे. आणि ते कळल्यास, कश्या प्रकारे नैसर्गिक मृत्यु झाला आहे हे सिद्ध करण्याची किमया हाच विभाग करू शकते. बफर झोन / कोअर झोन हा या वनविभागासाठी कम्फर्टेबल झोन ठरणार आहे. […]