मोहाडी येथे प्रस्तावित असलेल्या एका खाजगी थर्मल पॉवर प्रोजेक्ट या वीज निर्मिती प्रकल्पावर आता ताशोरे ओढणे सुरू झाले आहे. हा थर्मल पॉवर प्रोजेक्ट आजूबाजुंच्या भागांकरिता प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणार असल्यामुळे या प्रकल्पाच्या विरोधात संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. […]
आज पुरुषांच्या बरोबरीने ५०%महिलांना राजकारणात प्रवेश मिळालाय अन् आज महिला नगरसेविका झाल्यात ते केवळ सावित्रीबाईंच्या धैर्यामुळे अन् पुढाकाराने….अशा या सावित्रीबाईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या महिलांनी सामाजिक अन् राजकीय स्तरावर वावरतांना स्वत:पासून सुरवात करून समाजाला किमान भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, मुबलक पाणीपुरवठा, ग्रामीण व शहरातील महामार्गांवरील बस व एसटी थांब्याजवळ महिलांसाठी सौचालाये, महापालिका रुग्णालयांतून अध्यायावत आरोग्य सोयी, सुविधा व सेवा देण्याचं काम व स्वच्छता राखण्याचं काम जरी केलं तरी सावित्रीबाईंचं ‘मौलिक कार्य व स्वप्न’ सफल झाल्याचं समाधान व महिलाराजचं प्रत्यय तुम्हा आम्हा सर्वांनाच मिळेल यात दुमत नाही.अशा या आदर्श पहिल्या महिला शिक्षिकेला स्मृतीदिनी विनम्र अभिवादन! […]
स्वामीजी म्हणाले होते, “अजून पन्नास वर्ष आपण एकही मंदिर बांधलं नाही तरी चालेल, अजून पन्नास वर्ष आपण शंकराला बिल्वपत्र वाहिलं नाही तरी चालेल. आता पन्नास भारत हेच तुमचे मंदिर होऊ द्दा, आता पन्नास वर्ष भारतातील गोर-गरीब जनता हाच तुमचा परमेश्वर होऊ द्दा.” काय सुंदर आणि सात्विक विचार आहेत. शेवटि माऊलीच ती. विवेकानंदांच्या शैलीत सांगायचे झाले तर, आपण स्वामी विवेकानंदांची जयंति साजरी नाही केली तरी चालेल, याचा अर्थ असा नाही की साजरी करु नये. एकवेळ साजरी नाही केली तरी चालेल. पण विवेकानंदांच्या संकल्पनेतील हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हीच खर्या अर्थाने विवेकानंदांना श्रद्धांजली आहे, आदरांजली आहे. जर असे झाले नाही तर सगळे व्यर्थ आहे. पण आपण सकारात्मक विचार करु, उद्दाचा उगवणारा सुर्य अखंड हिंदुस्थानात असेल, हेच लक्ष्य ठेवून, हेच ध्येय घेऊन आपण जगू आणि स्वामी विवेकानंदांच्या संकल्पनेतील हिंदु राष्ट्र स्थापन करू. […]
या पृथ्वीतलावर, सजीवांना सुखाने जगता यावे, त्यांचे अस्तित्व टिकून रहावे, इतकेच नव्हे तर त्यांच्या आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन सबल प्रजाती निर्माण होऊन त्यांच्या सजीवांची संख्या वाढावी यासाठी निसर्गाने, काळजीपूर्वक भक्कम तजवीज करून ठेवली आहे.
सजीवांनी, आपले विचार एकमेकास कळविणे आणि ते विचार त्यांना कळणे, या साठी निसर्गाने, कोणती आणि कशी यंत्रणा सिध्द केली आहे, ते या लेखात वाचा. […]
काही व्यक्तींना नाविन्यपूर्ण, जगावेगळे काहीतरी करण्याचा छंद असतो. त्याच ध्यासातून ती व्यक्ती कामास लागली तर एखादी अद्भूत कलाकृती निर्माण होऊ शकते. अशाच छंदातून नाशिक येथील दिनेश वैद्य यांनी पौराणिक हस्तलिखितांचे संगणकावर डिजिटलायझेशन करुन पौराणिक ऐतिहासिक वारसा जपण्याचा उपक्रम सुरु केला आहे. […]
प्रसार माध्यमांचा गजबजाट असलेल्या आजच्या जगात सगळ्या बाजूंनी माहिती आणि मनोरंजनाचा भडिमार आपल्यावर होत असतो. त्यातही टीव्हीसारखं दृश्य माध्यम आणि इंटरनेटवरल्या सोशल नेटवर्किंग साईट्ससारखं परस्परसंवादी माध्यम यांना लोकांची पसंती असते. आजच्या जगात या सगळ्यांचं महत्त्व आहेच, ते नाकारताही येणार नाही. या पसाऱ्यात आकाशवाणी किंवा रेडिओचा विसर आपल्याला पडतोय का? कदाचित पडतोय. तशी हल्ली एफ. एम. वाहिन्यांची लोकप्रियता अगदी तरुण वर्गातही थोडी रुजू पाहते आहे. तरीही आकाशवाणीला जे पूर्वी लोकांच्या मनात खास स्थान होतं, ते आज उरलेलं नाही. अर्थातच आकाशवाणी यापुढेही असणार आहे आणि आपलं काम ती करत राहणार आहे. एके काळी आकाशवाणीचा दबदबा केवढा होता, तिथे मोठमोठे कलाकार, लेखक, गायक, संगीतकार, नट इ. कसे वावरले हे आपण अनेकदा तिथे काम करणाऱ्या मंडळींच्या आठवणीतून ऐकलं-वाचलं आहे. आकाशवाणीत काम केलेल्या बऱ्याच मंडळींची या विषयावरली पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. […]
नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा या तालुक्यांचा परिसर कसमादे पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोग करुन शेती उत्पादनात वाढ करण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयोग देवळा येथील पेशाने शिक्षक असलेल्या संजय देवरे या शेतकऱ्याने केला आहे. हळदीचे पीक घेऊन त्याचे जास्त उत्पादन काढण्याचा यशस्वी प्रयोग त्यांनी करुन दाखविला आहे. […]