इतर सर्व
ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख
माझी तत्वसरणी :: धर्माचरणांचा कार्यकारणभाव.
माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण, ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी….तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेऊन मी हे लेख लिहिले आहेत.
दैनंदिन जीवनात आपण, दिवसाचा काही भाग, विशेषतः आंघोळीनंतर, देवपूजा, पोथ्या वाचन, जपजाप्य, मंत्रपठण, ध्यानधारणा, एखादे स्तोत्र म्हणणे वगैरेत घालवितो. ही सर्व धार्मिक आन्हिके, पुरातन काळापासून आचरली जात आहेत. ही आन्हिके केव्हातरी, कुणीतरी, काही विशिष्ट उद्देश ठरवून प्रचारात आणली असावीत. दिवसाचाकाही काळ, इतर विचार बाजूस सारून, चांगले सात्विक विचार मेंदूत यावेत हाच असावा असे वाटते. विज्ञानीय दृष्टीकोनातून या सर्वांचे मनन केल्यास, बर्याच बाबींचा उलगडा होतो.
[…]
नोकरशाही कि भेकडशाही?
“शिवरायाचे आठवावे स्वरुप, शिवरायाचा आठवावा साक्षेप. शिवरायाचा आठवावा प्रताप, भूमंडळी”. हा उपदेश समर्थ रामदासांनी छत्रपती संभाजी महाराजांना केला. तरी आपण सर्वांनी हा उपदेश लक्षात घ्यायला पाहिजे. कुठल्याही क्रांतिकारकाचे/सज्जनाचे आराध्य शिवाजी महाराज होते(आहेत?). शिवाजी म्हणजे जगण्याची पद्धत. शिवाजी महाराजांसारखे जगावे, म्हणजे प्रामाणीकपणे जगावे. आपण म्हणतो शिवाजी जन्माला यावा पण तो शेजारच्या घरात. आजच्या जीवनात शिवाजी कुणालाही परवडणार नाही.
[…]
दलित रंगभूमी – दलित नाट्यचळवळ वर्णनात्मक प्रवास
दलित रंगभूमीचे पहिले नाटक तृतीय रत्न (1855) की जे महात्मा फुले यांनी लिहिले आहे. या नाटकाचा विषय ब्राह्यणांनी जे देवाच्या नावे गैरसमज व अंधश्रद्धा प्रस्थापित केल्या होत्या त्या विरुद्ध प्रहार करणारे हे नाटक होय.
[…]
उत्क्रांती
माणसातल्या मर्यादा संपवण्यासाठी आणि त्याला एक परिपूर्ण बनवण्याचा घाट एक शास्त्रज्ञ सुरु करतात निसर्गाच्या विरुद्ध जावून निसर्गाला आव्हान करण्याचा प्रयोग ते मांडतात त्यात ते यशस्वी होतात का? कृत्रिमरीत्या उत्क्रांती शक्य आहे का आणि तिचे परिणाम काय असतील? माणूस खरच निसर्गाला आव्हान देवू शकेल का? मी प्रेषित कुलकर्णी सादर करत आहे उत्क्रांती !!!!
[…]
जागतिक भ्रस्टाचार रिपोर्ट २०११ ( जागतिक पर्यावरण बदल )……!!!
खरेच बदलते जागतिक पर्यावरण व तसेंच जागतिक मदत कार्य
कारणीभूत ठरेल भ्रस्टाचार वाढण्यास …………..!!!!
[…]
गुरुवर्य नरहर रघुनाथ फाटक
फाटकसरांचं आणि माझ्या आईचं लांबचं नातं होतं .त्यामुळे काही घरगुती कार्यात किंवा समारंभात मी त्यांना अनेकदा पण दुरूनच पाहिलं होतं. याखेरीज, जिथे जिथे विद्येची उपासना चाले, तिथे तिथे सर दिसत. ते ग्रंथसंग्रहालयात असोत की साहित्य संघात, भारतेतिहास संशोधन मंडळात किंवा प्राज्ञ पाठशाळेत ते कुठेही असले तरी आजूबाजूला माणसांचा गराडा आणि सरांचं अव्याहत बोलणं असा त्या बैठकीचा बाज असे.
[…]
विज्ञान आणि अध्यात्म
साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीवर जीव निर्माण झाला असावा असे शास्त्रज्ञ सांगतात. सुरुवातीला हे जीव अगदी प्रथमावस्थेत, जीवाणू, बुरशी, आणि एकपेशीय प्राणी यांच्या स्वरुपात निर्माण झाले. पृथ्वीवर सजीव कसे निर्माण झालेत याबद्दलची माहिती अनेक पुस्तकांतून आणि माहिती जालावर मिळते. या नंतर कोट्यवधी पृथ्वीवर्षांचा काळ लोटला. आनुवंशिक तत्वात उत्क्रांती होऊन प्राणी आणि वनस्पतींच्या लाखो प्रजाती निर्माण झाल्या. सरतेशेवटी सुमारे ७० लाख पृथ्वीवर्षांपूर्वी, कपिंच्या काही प्रजातीत उत्क्रांती होऊन मानव निर्माण झाला.
मानवी मेंदूची अध्यात्मिक सुरुवात सुमारे १० हजार वर्षांपूर्वी झाली. त्या काळापासून आजपर्यंत, मानवी शरीररचनेत आणि पृथ्वीच्या पर्यावरणात फारसा फरक पडला नाही. त्यामुळे त्या काळी विचारवंतांनी केलेली निरीक्षणे आणि घेतलेले अनुभव आपण आजही घेऊ शकतो. त्याकाळी असलेली बुद्धिवान माणसे आजही जन्म पावू शकतात. त्याकाळी केलेल्या निरीक्षणांचे आणि अनुभवांचे स्पष्टीकरणे, त्यांच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि त्या काळी उपलब्ध असलेल्या ज्ञानानुसार त्यांनी दिले. ते गेली शेकडो वर्षे उपयोगी पडले, मार्गदर्शक ठरले.
[…]