नवीन लेखन...

ज्या लेखांना कोणतीही वर्गवारी दिली नाही ते लेख

जागतिकीकरण की सांस्कृतिक अगतिकीकरण….!!!

आजच्या संगणकीय व माहितीतंत्रज्ञानाच्या महायुगात अवतरलेलं जागतिकीकरण ही भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान व सेवा यांना (प्रत्यक्ष मनुष्यबळ वगळता) सर्वसाधारणपणे निर्बंधमुक्त वातावरणात एका देशातून जगातल्या दुसर्‍या कुठल्याही देशामधे ये-जा करू देणारी, प्रामुख्याने ’आर्थिक-प्रक्रिया‘ असली तरी जीवनातील इतर क्षेत्रेही प्रभावित करण्याएवढी तिची व्याप्ति व शक्ति मोठी आहे.
[…]

मराठी माणूस आणि योगविद्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर १४ नोव्हेंबर, १९५४ साली हैद्राबादयेथील ’मराठवाडा साहित्यपरिषदेत‘ भाषण करताना म्हणाले होते की, ”भारतातील सर्वभाषिक प्रांतात अत्यंत दुर्दैवी प्रांत कुठला असेल, तर तो ’महाराष्ट्र‘ होय! इतर परप्रंातीयांकडून संपूर्णपणे नागवला गेलेला, हा भोळाभाबडया माणसांचा प्रदेश आहे. भारतीय नागरिक सर्व एक, हे जरी खरे असले, तरी व्यवहारात ही भावना निरर्थक आहे. राजकारणात हे औदार्य अंगलट येते व भोळयाभाबडयांचा घात होतो!“ आधुनिककाळाच्या रेटयात या ’नागवल्या गेलेल्या व म्हणूनच मागे पडलेल्या‘ भोळयाभाबडया मराठीजनांना, पुन्हा एकवार ’अटकेपार झेंडा‘ लावण्यासाठी व शिवछत्रपतींप्रमाणेच जाज्वल्य राष्ट्रधर्म निर्मिण्यासाठी गरज आहे, ती एका तेजस्वी व निरोगी-निर्व्यसनी तरूणपिढीची… आणि ही अशी ’पिढी‘, फक्त अविरत योगाभ्यासाच्या मजबूत ’शिडी‘वरच चढून गगनाला गवसणी घालू शकेल!!!“
[…]

माडगूळी डेज

माझ्या कळतेपणापासून गेली जवळ जवळ पन्नास वर्षे माडगूळला जाण्याची कल्पना निघाली की सर्व प्रथम कोणत्या मार्गाने जायचे याची चर्चा घरात जवळ जवळ जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चालायची. काहींचे मत पडायचे की कोरेगाव मार्गाने आटपाडीपर्यंत जावे, तर काहींचे कऱ्हा-वीटा मार्गाने! कुठलाही मोठा घाट नसलेल्या सोलापूर रोडने इंदापूर आणि तिथून अकलूज सांगोला मार्गे थेट माडगूळलाच जावे, तर काहींचे म्हणणे फलटण-म्हसवड मार्ग जवळचा असल्याने त्याच मार्गाने जावे असे असायचे. मला स्वत:ला मात्र कुर्डुवाडीवरून बार्शीलाईट रेल्वेने सांगोला आणि तेथून मोटारने माडगूळला जाणेच खूप आवडायचे.
[…]

नागरिक पत्रकार – विश्वासार्हतेची एक नवी वाट

न्यू मिडीया या एका महत्त्वाच्या संकेतस्थळावर ठळकपणे लिहिलेले हे वाक्य एका नव्या पत्रकारितेच्या आश्वासक प्रवासाची नांदीच स्पष्ट करत आहे. नागरिक पत्रकार म्हणजेच सिटीझन जर्नालिस्ट हा सध्याच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञान युगात एक अभिनव आणि बर्‍यापैकी विश्वासार्ह असा जनतेचा थेट सहभाग असणारा पैलू समोर येऊ लागला आहे.
[…]

कामगार – एक माणूस – एक समाजाचा घटक!

”माझी योग्यता शिवछत्रपतींच्या पायधुळीसमान जरी असो, तरीही माझ्या संघटनाकार्यात शिवाजी महाराजांच्याच राजनितीचं प्रतिबिंब ठायी ठायी पडेल, याची दक्षता घेऊन माझी प्रत्येक कृति अहंकाराला पूर्णतः तिलांजली देऊन, शिवछत्रपतींच्या पावन चरणी समर्पित करेन!!!“ — राजन राजे
[…]

कामगारांचं बजेट!!!…

१९९१-९२ नंतरच्या ’खाउजा‘(खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) धोरणापश्चात गेल्या सुमारे १५-२० वर्षात देशात एवढया संपत्तीची निर्मिती झाली की, जी १५०-२०० वर्षे झाली नव्हती.
[…]

एक नवे कोरे सदर.. १ जानेवारीपासून

आता विज्ञानाने खूपच प्रगती केली आहे. तरीपण ती निसर्गात असलेल्या विज्ञानाच्या तुलनेत नगण्य आहे याचेही भान शास्त्रज्ञांना आहे. पौराणिक काळात ऋषीमुनींनी आणि विचारवंतानी दिलेली कित्येक स्पष्टीकरणे आजही तंतोतंत लागू पडतात ही खरोखर आश्चर्याची बाब आहे.

अनेक अध्यात्मिक संकल्पनांना विज्ञानीय दृष्टीकोनातून स्पष्टीकरणे देता येणे शक्य आहे. नवीन वर्षापासून विज्ञान आणि अध्यात्म हे श्री गजानन वामनाचार्य यांचे सदर सुरु करण्यामागचा हाच हेतू आहे.
[…]

लैंगिक शिक्षणातून छेडछाडीला लगाम !

……आणि एक ना एक दिवस एका भयंकर भयावह अशा विनाशकाल परिस्थितीला सामोरे जावे लागेल…अशी नुसती कल्पना केलेलीच बरे…नाही का?..तात्पर्य शालेय अभ्यासक्रमातून लैंगिक शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.
[…]

क्या खबर? जितनी मुर्ती उतनी कबर….

एक इंग्रजी लेखक म्हणतो “तुमच्या राष्ट्रातील तरुण मुलं कोणती गाणी गातात यावरून तुमच्या राष्ट्राचे भविष्य कळते”. आज आपल्या देशातील तरुण मुलं कोणती गाणी गातात हो? मुन्नी बदनाम हूई… ह्याचा अर्थ स्पष्ट आहे, भविष्यात आपल्या मुन्न्या म्हणजे आपल्या आया, बहिणी, मुली बदनाम होणार. याकडे पालकांनी लक्ष्य दिलं पाहिजे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सर्व हिंदु नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे, आपापले वादविवाद चूलीत टाकून. मी मराठी, मी मराठी असं बोंबलणार्‍या नेत्यांनीसुद्धा मराठीच्या बुरख्यात मुसलमानांना प्राधान्य देऊ नये. याचे परिणाम भिषण होऊ शकतात, हे मी नाही सांगत, इतिहास सांगतो. जाता जाता इतकेच सांगतो की तुम्ही ज्या ईश्वराला मानत असाल, त्या ईश्वराला स्मरून सांगा, तुम्ही सुरक्षीत आहात का? तुमच्या आया-बहिणी सुरक्षीत आहेत का? तुमच्या आया-बहिणींची अब्रू कधीच लूटली जाणार नाही, तुम्ही कसाबसारख्या जिहादींचे शिकार होणार नाही, याची शाश्वती तुम्ही देऊ शकता का? जर याचे उत्तर “नाही” असेल तर हिंदु संघटन साधणे हाच एक अमोघ उपाय आहे. जर असे झाले नाही तर “जितनी मुर्ती उतनी कबर”.
[…]

1 58 59 60 61 62 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..