प्रामाणिकपणा आणि त्या कष्टाचं बाळकडू या वारीत तूझ्या समस्त भक्तांना पाज…. त्यांना आशिर्वाद दे कुठल्याही विध्नाला सामोरं जाण्याची.. तू विध्न देतोस त माणूस घडण्यासाठीच मग त्यातून माणूस घडू दे देवा.. राक्षस या लढाईत हरू दे.. तूझ्या या भक्ताचं हेच साकडं आहे तूझ्याकडे.. […]
दिनांक २९ जुलै, २००२, Los Angeles ला आता रात्र झाली आहे. काही तासापूर्वीच सुप्रसिद्ध संगीतकार, महाराष्टाचे लोकप्रिय गायक श्री सुधीर फडके हे स्वर्गवासी झाल्याची दु:ख्खद बातमी भारतांतून आली आहे. […]
स्त्रीलंपट, गर्दुले, व्यभिचारी व मद्यप्यांचे सर्व समान उद्देश सफल होतील असे ठिकाण जेथे सर्व वयोगटातील, थरातील, धर्म, पंथ व लिंगातील माणसे सामील होऊन आपला समाज, संस्कृती, संस्कार, मान-सन्मान, प्रतिष्ठा या सगळ्याला उघडपणे तिलांजली देऊन निर्लज्जपणे पार्टी करतात व त्यात कायद्याचे रक्षकच भक्षक होतात तेव्हां शरमेने नागरिकांची, आई-वडिल, नातलग, कुटुंबीय व त्या खात्याच्या प्रमुखांना स्वत:चा चेहरा लपविण्यासही जागा नसेते आणि मेल्याहून मेल्या सारखे होते पण त्यात सामील होणारांना त्याचे काही सोयर सुतक नसते. […]
बाबा बिचारा स्वत:ची सुखदु:ख विसरुन, प्रसंगी स्वत:च्या आवडी-निवडींना मुरड घालून मुलांसाठी सगळं करतो. पण या बाबाचीही एक वेगळीच व्यथा आहे. कोणी समजून घेईल का? […]