दहावी-बारावीच्या परीक्षांमधील कॉपीचे वाढते प्रकार रोखणे हे मोठे आव्हान आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने काही नवे उपाय सुचवले. त्यात विद्यार्थ्यांनी कॉपीविरोधातील शपथ घेणे तसेच कॉपी करणार्यांवर कठोर कारवाई यांचा समावेश आहे. पण, या उपायांची प्रामाणिकपणे अंमलबजावणी झाल्यावरच कॉपीमुक्तीचे स्वप्न प्रत्यक्षात येईल. […]
देशातील महागाईने गंभीर स्वरूप धारण केले आहे. तुरडाळीचे दर अव्वाच्या सव्वा वाढण्यापासून खर्या अर्थाने सुरू झालेलीमहागाई कांदे आणि दुधापर्यंत येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे हे सर्व सरकारला दिसत असूनही त्यावर ठोस उपाय होतानादिसत नाहीत. आठ रुपयांवर असणारा कांद्यांचा दर शंभर रुपयांवर न्यायचा आणि चाळीसवर आणल्यानंतर भाव कमी केलेम्हणून पाठ थोपटून घ्यायची असे सरकारचे धोरण आहे. […]
गेल्या वर्षी लांबलेल्या पावसाने आणि आता अचानक वाढलेल्या थंडीमुळे कृषीक्षेत्र अडचणीत आले. खरे तर अलीकडे तापमानातील बदल आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अशा वेळी त्याला शासनाकडून नुकसानभरपाई दिली जात असलेली तुटपुंजी आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विमा कोष ही नवी संकल्पना अस्तित्वात यायला हवी. […]
एखाद्याच्या मागे ठरावीक समस्येचा ससेमिरा कायम राहतो तशी काँग्रेसची अवस्था झाली आहे. बोफोर्स प्रकरण बाहेर आल्यावर गदारोळ उडाला आणि त्या लाटेत काँग्रेसला पराभूत व्हावे लागले. त्यामुळे सत्तेवर आल्यावर येनकेनप्रकारेन हे भूत गाडून टाकायचे असा काँग्रेसचा निर्धार होता. त्या दृष्टीने केलेले प्रयत्न बर्यापैकी यशस्वी झाले. पण, आता इतक्या वर्षांनंतर हे भूत पुन्हा जागे होऊन काँग्रेसच्या मानेवर बसले आहे. […]
आयसीसी विश्वचषक स्पर्धा केवळ दीड महिन्यांवर येऊन ठेपली असताना भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड या प्रमुख दावेदारांबरोबरच इतर देशही तयारीला लागले आहेत. भारताची सध्याची कामगिरी पाहता या विश्वचषकावर धोनीच्या शिलेदारांनी नाव कोरल्यास कोणालाच आश्चर्य वाटणार नाही. प्रश्न आहे तो अंतिम अकरा जणांच्या योग्य निवडीचा. […]
इंटरनेटच्या माध्यमातून आज मराठीतून काहितरी लिहीतांना खूप आनंद होतो आहे. आज सहजचं आपण डोळसपणे पाहिलं तर आपल्या एक लक्षात येइल की कुठेतरी आपण आपलं माणूसपण हरवतोय. समाजातून हळूहळू नितिमुल्य सुध्दा हरवतायत. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार होऊ पहातोय. याचाचं सुशिक्षीत मनाला खूप त्रास होतोय. पण आपल्याच षंढपणामूळे आपण काहिच करु शकत नाही याची जाणिव मनाला खूप अस्वस्थ करतेय. आणि मग कधीतरी लिहिलेली कविता तुमच्यापर्यंत पोहचवावीशी वाटतेय…. […]
सध्याच्या वेगवान युगात वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन रस्ते सुधारणांवर भर दिला जात आहे. शिवाय प्रशस्त रस्त्यांची बांधणीही केली जात आहे. तरीही वाहतूक खात्याचे दुर्लक्ष आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्याची चालकांची प्रवृत्ती आदी कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांची संख्या वरचेवर वाढत आहे. परिणामी, हे रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत. ही परिस्थिती कोण आणि कशी बदलणार हा खरा प्रश्न आहे. […]
नवीन वर्षात भारतात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार आहेत. आजघडीला कंपन्या चांगली कौशल्ये असणार्या कर्मचार्यांना आकर्षित करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी विविध योजना आखत आहेत. त्यामुळे कर्मचार्यांच्या कमाईत भरघोस वाढ होणार आहे. त्याच वेळी जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत असल्याने सामान्यांच्या खर्चातही वाढ होणार आहे. […]
खंडोबा हे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही प्रदेशातील बहुसंख्य जनतेचे कुलदैवत आहे. मल्लारी, मल्लारीमार्तंड, म्हाळसाकांत, मैलार, मैराळ अशी नावे असलेल्या खंडोबारायाची महाराष्ट्र आणि कर्नाटकात एकूण बारा स्थाने आहेत. त्यापैकी नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील माळेगाव हे एक तीर्थक्षेत्र आहे. […]