जपानी काव्य : जपानीमध्ये अनेक काव्यप्रकार आहेत, जसें की हायकू, तांका, रेंकु वगैरे. त्यातील हायकू हा प्रकार जगप्रसिद्ध झालेला आहे. हायकूमध्ये सहसा निसर्ग-चित्रण आढळते. पण हल्ली इतर विषयांवरही हायकू लिहिले जातात. मृत्यूचा उल्लेख असलेली ही कांहीं उदाहरणें (भाषांतरित) – All the time I pray to Buddha I keep on killing mosquitoes – Kaboyashi Issa (मध्ययुगीन कवी) […]
आजच्या घराघरातील आई-वडिलांना खऱ्या अर्थाने ‘पालक’ बनून आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ‘आमची मुलं बिघडली हो’ असा आक्रोश करण्याची वेळ येणार नाही आणि ‘सातच्या आत घरात’ सारखे चित्रपट निर्माण करण्याची गरजच भासणार नाही ! […]
‘‘केवळ पैसा कमावण्यासाठी स्पर्धेत सहभागी होऊ नका. गाडी आणि बंगल्याच्या मागे धावण्यापेक्षा कलेच्या मागे धावलात तर सगळं ऐश्वर्य तुमच्या मागे आपोआपच धावत येईल’’ हा एका सुप्रसिध्द संगीतकाराने स्पर्धकांना दिलेला सल्ला अत्यंत गांभीर्याने घेण्याची वेळ आलेली आहे. थोडेही कष्ट न करता ‘एका रात्रीत हीरो’ बनण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ’या जगात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट्स नसतात’ हा विचार रक्तात भिनवून व ’डिग्निटी ऑफ लेबर’ची खिल्ली न उडवता ऐन उमेदीच्या वयात रात्रंदिवस कष्ट करून अफाट यश प्राप्त करण्यासाठी जर आपल्या देशातील तरुणाईने प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर भारताला अवघ्या विश्वावर राज्य गाजविण्यासाठी वेळ लागणार नाही! […]
आपण विविध भाषांमधील, मृत्युविचार express करणार्या काव्यावर ज़रा नजर टाकूं या. ‘जो न देखे रवि । सो देखे कवि ।’ अशी उक्ती आहे. त्यामुळें, हें पाहणें interesting ठरेल की कवींच्या नजरेतून मरण कसें दिसतें. […]
मृत्यू हा जीवनाशी-संबंधित इतका मूलभूत विषय आहे की, साहित्यात त्याचा उल्लेख वारंवार येतोच. त्याचा अल्पसा आढावा आपल्याला मृत्यूकडे अधिक डोळसपणें पहायला मदत करेल असा अंदाज करायला हरकत नसावी. विविध भाषांमधील जुन्यानव्या कवींनी मृत्यूबद्दल काय लिहिलें आहे, त्यांचा काय-कसा approach आहे , याबद्दल मनात कुतुहल निर्माण झालें , व त्या जिज्ञासेपोटीं कांहीं वाचन-मनन-चिंतन केलें. त्या मंथनातून मिळालेली कांहीं माहिती मी share करत आहे. […]
आपल्याकडे प्रत्येक प्रथेमागे, सणामागे काही ना काही सामाजिक आणि शास्त्रीय कारणे ही आहेतच. दीप अमावास्येच्या दुसऱ्या दिवशीपासून महाराष्ट्रात श्रावण सुरु होतो. ऊन-पावसाचा खेळ. अंधार देखील लवकर पडू लागतो. कदाचित म्हणूनच पूर्वी दीप अमावास्येच्या निमित्ताने घरातील सर्व दिवे बाहेर काढून त्या योगे त्यांची स्वच्छता व्हावी असे अध्यारूत असावे. […]
मी एक भारतातला सर्वसामान्य नागरिक असून दरवर्षी नित्यनियमाने न चुकता कर भरत आहे. तरीसुद्धा काही दिवसात गरीब लोकांसाठी आलेल्या पुळक्यासाठी हे पत्र लिहावेसे वाटले. गरीब आणि श्रीमंत ह्याची व्याख्या आजही आपण त्यांच्याकडे असलेल्या पैश्यावरुन करत आहोत. ते पैसे कसे कमावले ह्याच काहीच देणघेण कोणाला नसते. म्हणूनच नोकरी करून पगार घेणारा एक सामान्य करदाता त्याला मिळणाऱ्या पांढऱ्या पैश्यामुळे नेहमीच श्रीमंत ठरवला जातो. कारण त्याला मिळणाऱ्या पैशाची नोंद हि होत असल्याने त्याच्या हातात पडण्याआधीच ते पैसे कराच्या रुपात कापून घेतले जातात. […]
सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करतो कि, “नेमकी दिशा” हा लेख फक्त आणि फक्त तरुण “ब्राह्मण वर्ग आणि त्यांची सध्यस्थिती आणि त्याची संभाव्य दिशा काय असावी” याभोवतीच फिरेल. […]
पण मध्यमवर्गीय बुध्दीजीवी लोकांनी आपली विचारसरणी बदलली नाही तर लवकरच पुन्हा परकिय राजवट किंवा असामाजिक विचारांचे लोक सत्ता बळकावून देशाचा बट्ट्याबोळ केल्याशिवाय राहणार नाहीत. […]