अस म्हणतात कि संकटाच्या काळी जो उभा रहातो तोच खरा मित्र. फायद्यासाठी कोणी मित्र होतात तर काही वेळ बघून जवळ येतात. तर काही पक्के मित्र रहातात. पण काही असे असतात कि जे एका हाकेवर धावून येतात. इस्राइल हा भारताचा असाच एक मित्र देश. बघयला गेल तर भारताच्या दृष्ट्रीने अगदी छोटा पण त्याची महती अशी आहे कि भले भले देश त्याच्यापासून वचकून आहेत. […]
पण हि बिनतारी विश्वस्तता म्हणजेच WiFi हा काहि एकविसाव्या शतकातला शोध नाहिये तर तो युगानुयुगांपूर्वीपासूनचा शोध अाहे असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हि मला वेड्यात काढाल…..सांगतो , ऐका […]
चिनी मालावर बहिष्कार टाकताय ? मग गिरीष टिळक यांचा हा लेख नक्कीच वाचा…गिरीष टिळक हे भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हितचिंतक आहेत. प्रसिद्ध अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे बंधू आहेत. शिवाय जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या कंपन्यांना बुध्दीमान कर्मचारी मिळवून देणारी त्यांची स्वतःची कंपनी आहे. […]
ज्योतिष ही श्रद्धा की अंधश्रद्धा या विषचाचं चर्वण करून करून चोथा झालाय अगदी. तरी पुन्हा पुन्हा नव्याने हा विषय चर्चिला जातोच. जो विषय चर्चेत असतो, त्या विषयाची लोकांना एकतर आवड असते किंवा नपड तरी असते. दोन्ही संदर्भात चर्चा ही होतेच. परंतू मी थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातून या विषयांवर बोलणार आहे. लिहीण्याची सुरुवात करण्यापूर्वी मी एक गोष्ट स्पष्ट […]
पिक्चरच्या शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न हवंहवंसं जगलं तर…? […]
हा अतिशय सुंदर लेख शेअर करतोय. लेखक माहित नाही. “मी असा काय गुन्हा केला ?” हे शब्द मा. प्रमोद महाजन यांनी, मा.गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ, आपल्या अंत समयी उच्चारले होते. आपल्या सख्ख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. “अरे, अरे हे काय करताय ?” असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. […]
राजधानी दिल्लीमधल्या वृक्षाच्छादित रस्त्यांनी नटलेल्या लुटयेन्स झोन मध्ये राहायला फुकट सरकारी घर मिळवणं हे बऱ्याच भारतीय राजकारणी, पत्रकार, चित्रकार, कलाकार वगैरे लोकांचं स्वप्न असतं. नाना खटपटी करून एकदा लुटयेन्स दिल्लीमध्ये घर मिळवलं की हे लोक तिथेच आयत्या बिलावरचे नागोबा होऊन वर्षानुवर्षे ठाण मांडून बसतात. सत्ता बदलली,केंद्रातलं पद गेलं तर स्वतःहून लोकांनी ही घरं खाली करावीत अशी अपेक्षा असते, पण नाममात्र भाड्यात मिळणारी अशी अलिशान घरे सोडणार कोण? […]
पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून होणं कायद्याने अनिवार्य करणं आवश्यक आहे. काल-परवाच एक व्हीडीओ पाहिला. एका लहान मुलीला तिची आई हवीय. तिला भुकही लागलीय. पण ती ज्या शाळा नामक पिंजऱ्यात आहे, त्या पिंजऱ्याची टिचर नामक रिंगमास्टर तिला इंग्रजीतून प्रश्न विचारतेय. ती लहान मुलगी अगदी असहाय होऊन रडतेय, तर ती रिंगमास्टर तिला दम देऊन हसायला सांगतेय. […]