नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

मेरा भारत देश बघा किती महान

एका बाजूला दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पोट भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या करतोय. पिकवणारया शेतकरयांची तूर खरेदी ला पैसे नाही. शेतकरी कर्जमुक्ती करायला पैसे नाहीत. […]

ते तर हिन्दू होते..!

नुकत्याच झालेल्या ‘महाराष्ट्र दिना’बद्दल काहीतरी लिहावं म्हणून लिहायला बसलो होतो. ह्या दिवसाबद्दल लिहायचं तर महाराष्ट्र, देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या विभूती आणि देशरक्षणार्थ वेळोव्ळी धावलेला महाराष्ट्र याचा थोडक्यात आढावा घ्यावा लागतो. आणि असा आढावा घेताना पहिलं नांव चटकन मनात येतं आणि बोटातून बेशुद्धतही उतरतं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं..! ह्या नांवाला महाराष्ट्रात सोडा, देशातही पर्याय […]

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी

महाराष्ट्र, महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी, एक चिंतन- वेडी स्वप्न पाहायची आणि सनदशीर मार्गाने वाटेल ते करून ती पूर्ण करायची हे मराठी माणसाच्या रक्तात आहे. त्यालाठी पडतील ते कष्ट करायची, संयमाने वाट पाहायची त्याची तयारी आहे. महाराष्ट्रात जन्मलेला माणूस ‘मराठी’ असुनही त्याला केवळ ‘मराठी’ हे ‘प्रांतिय’ लेबल लावलेलं आवडत नाही कारण देशातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा […]

राज्य हवं असेल तर स्वत:वर डाव घ्यायची तयारी ठेवा

आपल्यातील प्रत्येकाला आयुष्यात राज्य हवं असतं पण त्यासाठी स्वत:वर डाव घ्यायला आवडत नाही..नेहमीच आपला डाव कुणीतरी घ्यावा म्हणून यासाठी प्रत्येकजण कुणाचीतरी वाट पाहत असतो.सभोवतली इकडून तिकडून फिरणार्या सोयऱ्यातून कुणीतरी पुढे येईल ही आपली इच्छा काही केल्या फलद्रूप होत नाही.मग आपण इथल्या माणसांच्यामध्ये माणुसकी उरली नाही म्हणून खेद व्यक्त करतो. कधी भावना उरात मावेनाशा झाल्या की त्यातून […]

हाॅटेलिंग आणि मला न प(च)टलेल्या खाण्याच्या माॅडर्न पद्धती

ग्लोबलायझेशनमुळे मध्यमवर्गाच्या हातात बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला व सहाजिकच त्या पैशाला खर्च करण्याचेही मार्गही निघू लागले. माझ्या पिढीचा बचतीकडे असणारा कल, नविन पिढीत खर्च करून उपभोग घेण्याकडे वळू लागला. पैसे साठवण्यासाठी नसून खर्च करणासाठी असतात ह्या विचाराने आता चांगलंच मुळ धरलंय. पैसे खर्च करायच्या नविन मार्गात हाॅटेलिंग हा चवदार प्रकार हल्ली भलताच लोकप्रिय आहे. हल्ली नवरा […]

सरकारनं लाल दिवा काढला, आता हे ही करावं

केंद्र सरकारने काही ठराविक सेवा वगळल्यास सर्वच मंत्री-अधिकाऱ्यांच्या गाडीवरचा लाल दिवा काढून टाकण्याचा निर्णय घेतला हे अतिशय उत्तम काम केलं. सामान्य जनतेच्या भावना सरकार ओळखू शकलं याचा अर्थ सरकारची जनतेशी नाळ जुळली आहे असा होतो. आता सरकारने आणखी एक काम करावं. ‘भारत सरकार’ किंवा ‘मबाराष्ट्र शासन’ असं मराठी-इंग्रजीत मागे-पुढे लिहिलेल्या अनेक सरकारी व खाजगी गाड्या दिसतात. […]

भुमिकांची अदलाबदल

आपलं म्हणणं जर एखाद्या व्यक्तीला पटलं नाही तर आपण किती सहजपणे तो मुर्ख आहे किंवा त्याला काही कळत नाही असं म्हणून मोकळं होतो. पण आपल्या विरूद्ध मतं मांडणाऱ्याची भुमिकाही बरोबर असू शकते हा विचार भले भले करू शकत नाही. समोरच्या माणसाची भुमिका समजून घेण्यासाठी थोडासा परकाया प्रवेशाचं कौशल्य अंगी असावं लागतं आणि ते प्रयत्नाने सहज साध्य […]

लालदिवा नव्हे, माज उतरायला हवा !

लालदिव्याचं आकर्षण, वलय आणि दरारा आपल्या नेत्यांनाही चांगलाच समजला. त्याचं अनुकरण सरकारी बाबूंनी केले. अधिका-यांनीही आपल्यासाठीही लाल दिव्याची विशेष सोय करून घेतली. लाल दिव्याचं स्वप्न पाहून अनेक मुलं स्पर्धा परिक्षेच्या स्पर्धेत उतरली. सामान्य माणसांपेक्षा वेगळे अधिकार, नव्हे तर जगण्याचा खराखुरा अधिकार म्हणून लाल दिव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बनला. […]

माझा रिसर्च चा विषय

नैराश्य :बालमनातील  स्व-संकल्पना (Despair in Child Self-Concept) वेगवान स्पर्धेच्या काळात प्रत्येक व्यक्ती ही सुखी व यशस्वी आयुष्य जगण्यासाठी धडपडत असते.संयुक्त कुटूंबातून एकल कुटुंबापर्यंत ,ग्रामीण भागातून शहराकडे, त्याच्या  गरजा ,स्वप्नं ,आशाआकांक्षा ,राहणीमान, खानपान, चैनीच्या वस्तू ,सुंदर घर ,शिक्षण ,चांगली नोकरी ,सुंदर जीवन-साथी इ. गोष्टीच्या लालसेने स्वतःचे मानसिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. अनिश्चित घटना आणि अस्थिरता,अगतिकता,असुरक्षितता,अपेक्षांचं ओझं ,अपमानास्पद वागणूक त्यामुळे ताणतणाव,चिंता व […]

धन्य तो पिता

एक जेमतेम शिकलेला पिता. नांव त्याचं शिवशंकर कोळी. सोलापूर शहरात राहत होते. त्यांना शिवपार्थ नावाचा लहान मुलगा माध्यमिक शाळेत शिकत होता. चुणचुणीत आणि तल्लख बुद्धीचा.खेळाची आवड होती. त्यात तो फुटबॉल खेळण्यात अत्यंत निष्णात. गेल्या काही दिवसापूर्वी शिवपार्थ मैदानात फुटबॉल खेळत होता. रखरखतं ऊन होत. सूर्य आग ओकत होता. खेळता खेळता शिवपार्थ उष्माघाताने कोसळला. उपचारासाठी जवळच्या सरकारी […]

1 102 103 104 105 106 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..