युनिव्हर्सिटी कॅम्पसच्या बाहेर एक भाजी विक्रेता फुटपाथवर जवळपास पंचवीस प्रकारच्या भाज्या विकायला बसतो. भाजी घेणाऱ्यांची तोबा गर्दी असते, साधारण वाडीकडे जाणारे सर्व लोक यांच्याकडूनच भाजी घेतात, याचे प्रमुख कारण भाजी बाजारभावापेक्षा स्वस्त असते. सर्व दुचाकी व तुरळक चारचाकी पण इथे थांबून भाजी घेऊन पुढे जातात, हा विक्रेता भाजी घेणाऱ्या प्रत्येकाला एका भाजीला एक प्लास्टिक पिशवी देतो, […]
बालकांनी शिकावे. जीवन जगण्याची कौशल्य प्राप्त करावीत.अनेक क्षेत्रात यश मिळवावे. देशाचे भले व्हावे. या देशाचे सुजान नागरिक व्हावे या अपेक्षेने येथील शिक्षणव्यवस्था चालते . सहा ते चौदा वर्षे वयोगटातील बालकांच्या शिक्षणासाठी कायदा (आरटीई अॅक्ट-2005 ) करण्यात आलेला आहे. कायदे आहेत.यंत्रणा आहे . ज्या स्तरावर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे तिथे मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे. विवाहाचे योग्य […]
मानव अभिव्यक्तीप्रधान प्राणी आहे. आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी त्याची धडपड असते.ते झाले तर जीवनात सफलता येते. जगण्यात जीवंतपणा येतो. आपली संस्कृती जतन करता येते. भावभावना आणि सृजनाचा मुक्त आविष्कार होत असतो. प्रबोधन होते. संस्कार होतात. समाज घडतो. सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब साहित्यात उतरत असते. तद्वतच साहित्य जगण्याचे नवे भान देते. वेदना, आक्रोश, प्रेम, शौर्य, विद्रोह, हर्ष यासम […]
गरमागरम चहाचा आस्वाद घेत असताना पेपरवाल्याने कधी नव्हे तो आज वेळेवर पेपर टाकला. पेपरच्या मुखपृष्ठावर एक मोठ्ठे छायाचित्र छापले होते. त्यात रस्त्याच्या कडेला खडी फोडत बसलेली मजूर स्त्री आणि तिच्या शेजारी नखशिखांत धुळीने माखलेला व रणरणत्या उन्हात मनसोक्त खेळत असलेला तिचा मुलगा दाखवला होता व त्या छायाचित्राखाली लिहिले होते- आज जागतिक महिला दिन ! अशा दिवसाची […]
मतदार, मतपेटी आणि आपली लोकशाही; एक प्रवास, कुपोषणाकडून कुपोषणाकडे..!! जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशाची मानली जाते. स्वातंत्र्यानंतर ७० वर्षात ही लोकशाही जिवंत आहे. ती जिवंत राहीली याचं कौतुक एवढ्यासाठीच, की स्वात्त्र्यापूर्वी १५० वर्ष या देशावर ब्रिटीशांच राज्य होतं. ब्रिटीश येण्यापूर्वी आपला देश असंख्य छोटी छोटी संस्थानं, राज्य आणि विविध शाह्यांमधे वाटला गेला होता. एकाच […]
भारत पर्यटनाला आलेली ती विदेशी महिला हातातील चिप्सचे रिकामे पाकीट फेकण्यासाठी अर्धा तास डस्टबिन शोधत फिरली… आणि तिच्याच समोर संत्र्याची सोललेली साल मी बिनधास्त रस्त्यात फेकली… माझ्याकडे रोखलेली तिची ती प्रश्नार्थी नजर पाहिली तरीही मला लाज नाही वाटली…. लाज माझ्या बेगडी स्वच्छतेची…! त्याने बेकायदेशीर काम करण्यासाठी माझ्याकडे सरकवलेलं नोटांचं पाकीट मी हळूच खिशात दाबलं… आणि त्याच्याच मागून भिकाऱ्यासारखं हात जोडून मला […]
आपल्या ‘मराठी भाषे’वर प्रेम करा, तिचा रोजच्या व्यहारात अट्टाहासाने वापर करा आणि पुढे असंही सांगेन, की कुणाशी भांडायची पाळी अलीत तर निदान भांडताना तरी मराठीचा वापर करा. एक दणदणीत वाक्य मराठीत फेकून मारा, बघा, समोरचा पन्नास टक्र्याने तरी खाली येतो की नाही..! […]
मुंबईच्या उपनगरांतील रस्त्यावर दिवसाचे १२-२५ तास आपल्या तिन चाकांच्या रिक्शांवर मेहेनत करणारे रिक्शावाले माझ्या अखंड कुतुहलाचा विषय आहेत. बऱ्याचदा नडेल, अडेलतट्टू, उर्मट असंच यांचं वागणं असतं. प्रवाश्याला हवं त्या ठिकाणी न येणं हा तर त्यांचा व्यवसायसिद्ध हक्क आहे की काय अशी शंका यावी असंच यांचं वागणं असतं. बाकी त्यांचे सर्व दुर्गूण सोडले तर ही माणसं अनुभवाने […]
गेले काही दिवस चाललेल्या लोकशाहीच्या महोत्सवाची उद्या सांगता होणार. कोणत्याही उत्सवाची सांगता जशी गोड होते, तशीच परवा महाप्रसादाच्या दिवशी एकमेंकांवर केलेले भले-बुरे आरोप प्रत्यारोप विसरून पुन्हा सर्व एकत्र येणार आणि एकमेकाला पावन करून घेणार आणि पुढची पांच वर्ष xxxx पण एकत्र नांदणार. या सर्व पार्श्वभुमीवर सर्वपक्षीयांनी एकमेकांवर केलेले गंभीर आरोप, मतदारांनी आपल्याच पक्षाला मत द्यावं म्हणून […]
“छिपकलीयों का हुनर तो देखो, बड़ी होशियारी से रात के अँधेरे में मोटे मोटे कीड़ो को हज़म कर लेती है, और.. सुबह होते ही अपने गुनाहों को छिपाने के लिए किसी महापुरुष की तस्वीर के पीछे छिप जाती है..” कधीतरी, कुठेतरी वाचलेलं किंवा कोणाकडून तरी ऐकलेलं हिन्दीतलं हे वचन सकाळीच आठवलं आणि नकळत त्या पालींची साम्य […]