कोणताही सजीव मरण पावला म्हणजे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणे, पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून, आवश्यक असते. मानवी पार्थिवावर धार्मिक विधिनुसार अंत्यसंस्कार केले जातात. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनाॅटॉमी विभागाला, वैद्यकीय अभ्यासासाठी देहदान करणे हाही अेक अंत्यसंस्कारच आहे या विषयी या लेखात चर्चा केली आहे. […]
सोबतचा लेख कृपया लक्षपूर्वक वाचावा ही विनंती, मग प्रतिक्रीया नाही दिल्यात तरी चालेल.. १५ आॅगस्ट १९४७ला देश ब्रिटीशांच्या जोखडातून मुक्त झाला आणि १९५० सालच्या आजच्याच दिवशी भारतीय राज्यघटनेचा अंमल सुरू होऊन देश सार्वभोम झाला. स्वतंत्र झाल्यापासून घटनेचा अंमल सुरू होईपर्यंत भारताला ‘स्वतंत्र वसाहती’चा दर्जा होता, ‘स्वतंत्र देशा’चा नाही.. आज भारतीय प्रजासत्ताक स्थापन होऊन ६७ वर्ष झाली. […]
गावखेड्यातील मुलं शाळेत येतात. शिक्षण घेतात. तसेच महाविद्यालयातही प्रवेश घेतात. मात्र ग्रामीण भागात शिक्षण घेण्यास आजही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिक्षणाच्या सोयी अत्यल्प असतात. घरची परिस्थिती नाजूक असते. कृषी संस्कृतीशी निगडित व्यवसाय असतो. घरचे संस्कार त्यांच्यासोबत असतात. गावचे रीतिरिवाज, रूढी, परंपरा यांचा पगडा मनावर असतो. शिक्षण ही संकल्पना जसजशी प्रगल्भ होऊ पाहते, तितकीच ती कठीण […]
कोणी म्हणतोय भाजप जिंकला, कोणी म्हणतोय शिवसेना हरली, कोणी म्हणतोय राष्ट्रवादी पुढे तर, कोणी म्हणतोय कॉंग्रस मागे, कोणी म्हणतोय मनसेची वाट लावली… पण लक्षात ठेवा इथे फक्त “जिंकलाय” आणि पुढे गेलाय तो… गुजराथी, मारवाडी, भैया, मद्रासी, सिंधी, पंजाबी, आणि हरलाय आणि तो फक्त माझा “महाराष्ट्र”… आणि माझ्या महाराष्ट्रातील “मराठी माणूस”… आपण कोणत्याही पक्षाचे असाल आपल्याला हे मान्य करावंच लागेल … महाराष्ट्रात राहून जर […]
विश्वास नांगरे पाटील म्हणतात, परवा मी सैराट पाहीला . सिनेमा बद्दल मला काहीच बोलायचे नाही . मराठी सिनेमाने ६०-७० कोटीचा धंदा केला म्हणजे आनंद आहे . म्हणतात, आज काल मराठी जनमानसावर या सिनेमाचा पगडा आहे . नक्कीच असेल . नाशिक-पुणे हायवेवर संगमनेर जवळच्या चहाच्या टपरीवर एक पंचविशीतला तरुण दुसऱ्याला सांगत होता की , “मागच्या आठवड्यात त्याला […]
भाजपा-सेना यांच्यातली ‘लोकसेवे’साठी चालणारी झोंबाझोबी पाहून मन कसं भरून यायला हवं, काळीज दाटून यायला हवं आपलं.. पण तसं काहीच न होता चीड, संताप, तिरस्कार, किळसं वाटू लागलीय.. असं होतंय याचं कारण यांना ‘लोकसेवा’ करायची नसून काहीही करून सत्ता व त्या सत्तेतून आपल्या पुढल्या कितीतरी पिढ्यांसाठी प्रचंड माया जमवायचीय हे सर्वांनाच कळून चुकलंय आता (तुमच्या पुढच्या पिढ्या […]
DNA ( Deoxyribo Nucleic Acid). डीएनए मध्ये जीवाबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मनुष्य प्राण्यासहीत सर्वच सजीवांमधे हे घडतं. शाळेत असताना कधीतरी उत्तरापुरती घोकंपट्टी केलेली ही माहिती. कोणत्याही […]
काल एका पुस्तकात जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार श्री. चार्लस कोरीया यांचं एक वाक्य वाचनात आलं. वाक्य सांगण्यापूर्वी मुंबईतील व मुंबईची माहिती असणाऱ्यांसाठी प्रथम चार्लस कोरीयांची एक ठळक ओळख सांगतो. मुंबईतल्या दादर पश्चिमेला असलेलं ‘पोर्तुगीज चर्च’चे वास्तशिल्पी म्हणजे श्री. चार्लस कोरीया. पोर्तुगीज चर्चची वेगळीच बांधणी अगदी नवख्या माणसाची तर सोडाच, रोज पाहाणाऱ्याची नजर सारखी आकर्षून घेते यांत शंका नाही. […]
पोटाचे प्रश्न माणसाला अस्वस्थ करतात.शांत झोपू देत नाहीत. प्रत्येक जीवाला जसे जगण्यासाठी अन्न लागते तद्वतच मानवासही ते लागते.समाज पोटाचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करतो. त्या व्यवस्थेप्रमाणे कार्यकर्तृत्व करण्याचा माणूस प्रयत्न करतो. कमीअधिक प्रमाणात पोटाचे प्रश्न सुटतातही . तसे भाकरीच्या प्रश्नावर अनेकदा राजकारण होते. चळवळी उभ्या राहतात. समाजकारण होते.क्रांती होते. परिवर्तन होते.’ भाकरी मिळत नसेल तर केक […]
हे काम सुद्धा भाजपा सरकारनेच केले आहे. या सरकार मध्ये सुद्धा काही कट्टर पंथीय आहेत. पण त्यांचा विरोध जुगारून जर हि कामे होत असतील तर मी या सरकारचे मना पासून अभिनंदन करतोय. अजूनही लोकांना धर्माची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याची गरज आहे. भाजपा सरकारने ती करावी हीच अपेक्षा आहे. […]