नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

मन की बात – DNA व Dna

DNA ( Deoxyribo Nucleic Acid). डीएनए मध्ये जीवाबद्दलची माहिती साठवून ठेवलेली असते. ही माहिती एका पिढीतून दुसर्‍या पिढीकडे जाणाऱ्या गुणदोषांना कारणीभूत असते. ही माहिती केंद्रबिंदूत २३ जोड्या असलेल्या गुणसूत्रांद्वारे साठवली जाते. गुणसूत्रांच्या प्रत्येक जोडीत एक गुणसूत्र पित्याकडून व एक मातेकडून येतो. मनुष्य प्राण्यासहीत सर्वच सजीवांमधे हे घडतं. शाळेत असताना कधीतरी उत्तरापुरती घोकंपट्टी केलेली ही माहिती. कोणत्याही […]

झाड आणि इमारत !

काल एका पुस्तकात जगप्रसिद्ध वास्तुरचनाकार श्री. चार्लस कोरीया यांचं एक वाक्य वाचनात आलं. वाक्य सांगण्यापूर्वी मुंबईतील व मुंबईची माहिती असणाऱ्यांसाठी प्रथम चार्लस कोरीयांची एक ठळक ओळख सांगतो. मुंबईतल्या दादर पश्चिमेला असलेलं ‘पोर्तुगीज चर्च’चे वास्तशिल्पी म्हणजे श्री. चार्लस कोरीया. पोर्तुगीज चर्चची वेगळीच बांधणी अगदी नवख्या माणसाची तर सोडाच, रोज पाहाणाऱ्याची नजर सारखी आकर्षून घेते यांत शंका नाही. […]

बाप रगत ओकतो, दुष्काळा पोटात घेतो…

पोटाचे प्रश्न माणसाला अस्वस्थ करतात.शांत झोपू देत नाहीत. प्रत्येक जीवाला जसे जगण्यासाठी अन्न लागते तद्वतच मानवासही ते लागते.समाज पोटाचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यवस्था निर्माण करतो. त्या व्यवस्थेप्रमाणे कार्यकर्तृत्व करण्याचा माणूस प्रयत्न करतो. कमीअधिक प्रमाणात पोटाचे प्रश्न सुटतातही . तसे भाकरीच्या प्रश्नावर अनेकदा राजकारण होते. चळवळी उभ्या राहतात. समाजकारण होते.क्रांती होते. परिवर्तन होते.’ भाकरी मिळत नसेल तर केक […]

सत्यनारायण नको जनता जनार्दन प्रसन्न करा

हे काम सुद्धा भाजपा सरकारनेच केले आहे. या सरकार मध्ये सुद्धा काही कट्टर पंथीय आहेत. पण त्यांचा विरोध जुगारून जर हि कामे होत असतील तर मी या सरकारचे मना पासून अभिनंदन करतोय. अजूनही लोकांना धर्माची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याची गरज आहे. भाजपा सरकारने ती करावी हीच अपेक्षा आहे. […]

अनंत अमुची ध्येयासक्ती

आयुष्य हे खर तर मला एखाद्या खवळलेल्या समुद्रा प्रमाणे वाटते.एका पाठोपाठ लाटा या येतच राहतात. अनेकदा या लाटांच्या माऱ्यापुढे मन खिन्न होऊन जाते.अगदी थकल्या सारखे होते. पण अशाच वेळी आठवण होते ती कुसुमाग्रजांच्या ‘कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेची. अगदी भीषण वादळात सापडला असतानाही किती खंबीर,धीरगंभीर वाटतो तो आणि त्याचे ते वागणे पाहून वाटते आपण उगाचच छोट्या छोट्या […]

नवे वर्ष,नवी परीक्षा

‘सुधारक’कार आगरकरांचे ‘शिष्य’ ‘तुतारी’कार केशवसुत आपल्या ‘तुतारी’या कवितेत सांगतात- “जुने जाऊ द्या मरणालागुनि जाळूनी किंवा पुरुनी टाका सडत न एका ठायी ठाका सावध ऐका पुढल्या हाका खांद्यास चला खांदा भिडवूनी” असा एल्गार करणारा संदेश त्यांनी नव्या पिढीला दिला.जुन्या गोष्टींना कवटाळून न बसता काळाचे भान ठेवून तरुणांनी नवे विचार आत्मसात करावेत,असे त्यांनी सांगितले. क्रांतीकारी कवी ज्ञानपीठ विजेते […]

शहद जीने का मिला करता हैं थोडा थोडा

शहद जीने का मिला करता हैं थोडा थोडा जानेवालो के लिये दिल नही तोड़ा करते आपल्यापैकी अनेकांनी ही गझल ऐकली असेल.जीवनाचे तत्त्वज्ञान सहज सोप्या साध्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे यात.यातील शब्द फक्त प्रियकर/प्रेयसी(मितवा) साठी नाही.थोडे बारकाई ने पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की ही गोष्ट जीवनात प्रत्येक ठिकाणी लागू पडते. जे हातचे गमावले त्याबद्दल माणसाला हुरहुर […]

मूर्तीभंजकांची परंपरा…

मंगळवारी पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या १० ते १५ कार्यकर्त्यांनी पुण्यातील छत्रपती संभाजी उद्यानातील नाटककार राम गणेश गडकरींचा पुतळा हटवला आणि मुठा नदीत तो फेकून दिल्याचं म्हटलं जात आहे. राजसंन्यास’ या नाटकातून राम गणेश गडकरींनी छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. संभाजी ब्रिगेडने याआधी दादाजी कोंडदेव यांचा पुतळा हटवला होता. […]

भारतातला शेक्सपिअर  – राम गणेश गडकरी

भारतात सुद्धा एक शेक्सपिअर जन्माला आला होता आणि त्यांचे नाव – राम गणेश गडकरी ! पण मला हे ‘भेटले’ ते ‘भेटले’ अशी अशुद्ध भाषा बोलणारी पैदास मोठ्या संख्येने वैचारिक गोंधळ घालत आहेत. त्यांना त्यांचे काय महत्व कळणार. यांच्या पैकी किती जणांनी गडकरींचे वाङ्मय वाचले आहे. गडकरींची हि कविता फक्त वाचावी आणि साहित्य संमेलनात फक्त हजार मतदानात निवडून आलेल्यांनी आपण कुठे बसतोय याचे आत्मशोधन करावे. […]

1 106 107 108 109 110 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..