नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

मन की बात – विश्वास

गेले काही दिवस माझ्या मनात ‘विश्वास’ या विषयावर विचार येत होते. खरच विश्वास ठेवावा का कोणावर? कि ठेवूच नये? एखाद्यासाठी आपण जीवाला जीव द्यायला तयार होतो तो विश्वासानेच कि आपल्यावर तशी वेळ आली कि ‘तो एखादा’ तसेच वागेल या अपेक्षेने..? अशासारख्या अनेक प्रश्नांनी मनात गुंता झला होता..असे प्रश्न निर्माण होण्याला माझ्या काही जवळच्यांची प्रत्यक्ष पाहिलेली तशीच […]

अवयवदानाचा संकल्प

शरीर हे क्षणभंगूर आहे , मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयरुपी जिवंत रहायचे असेल तर ‘ अवयव दान ‘ करा. मृत्यूपश्चात एक देह सात जणांच्या आयुष्यात एक आशेचा किरण ठरू शकतो. तर 35 लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकतो. मात्र आपल्या समाजात अवयवदानाविषयी फारशी जागृती नसल्याने कित्येक रुग्ण वर्षांनुववर्ष प्रतिक्षेत आहेत. अवयव दान हे केवळ डोळे किंवा […]

जाताना जरा लक्षात असू द्या

खांदेकरी ‌ शिव्या देणार नाहीत तिरडी उचलताना , इतपत वजन मर्यादित ठेवावे , सरणावर ठेवताच जळायला मदत व्हावी म्हणून थोडी चरबीही असायला हरकत नाही अंगात . पूर्णपणे जळून झाल्यावर उरणारी दोन – अडीच किलो वजनाची हाडे काही काळाने पंचमहाभूतांत विलीन होऊन जाणार आहेत , त्यामुळे मेल्यावर आपले काही मागे राहील , या भ्रमात राहण्याचा मूर्खपणा करू […]

मन कि बात – नवीन वर्ष

उद्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. जाणार वर्ष कसं गेलं याच्या सिंहावलोकनाचा दिवस. वर्ष जातच असतात आणि नवीन येतच असतात..जाणारं वर्ष बऱ्याच, म्हणजे सर्वांनाच, संमिश्र गेलं असं वैयक्तिकरित्या म्हणण्याचा प्रघात आहे..आणि ते तसंच गेलेलंही असतं..फार चांगलं नाही आणि फार वाईटही नाही..पण होतं काय की, गोड आठवणी आपण चटकन विसरतो आणि कटुता मात्र हृदयाशी कवटाळून ठेवतो..व ह्या कडू […]

कोसळलेला साक्षीदार

अखेर आज मी कोसळलो. खरं तर जगाचा निरोप घेण्याचं माझं वय नक्कीच नाही. माझ्या आसपास असलेले माझे सोबती अनेक वर्षांपासून ताठ मानेने उभे आहेत. मला मात्र अकाली मृत्यू आला यात शंकाच नाही. या न्यायालयाच्या आवारात गेल्या वीस वर्षांत घडलेल्या असंख्य घटनांचा मी मूक साक्षीदार आहे. मला ऐकू येतं, मी बघू शकतो, पण निसर्गाने बोलण्याची देणगी मात्र […]

स्मार्ट सिटी नागपूर

काल प्रख्यात टीव्ही चॅनलचे आमंत्रण आले म्हणून कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सभागृहात गेलो. विषय नागपूरमध्ये होणाऱ्या नगरपालिका निवडणुका होता. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वतंत्र विदर्भ, व बसपा यांचे मातब्बर नेते आपली बाजू मांडत होते, तसेच दुसऱ्या पक्षाने या शहराची कशी वाट लावली, हे सांगण्याचा त्यांचा प्रत्येक वाक्यात भर होता. भाजप आम्ही मेट्रो या शहरात आणली, तसेच आता […]

तुम्ही फकीर झालात, लोकांनी तिराळं व्हायचं की मुखिया ! 

‘माझ्याच देशातील काही लोक माझ्यावर आरोप करतात, त्याचे मला आश्‍चर्य वाटते, आजपर्यंत देशाला लुटणार्‍यांना जबाबदारीची जाणीव करून देणं चूक आहे का? भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर हल्ला करून मी गुन्हा केलाय का? मी तुमच्यासाठी लढाई लढतो आहे, भ्रष्टाचारी करून करून काय करतील, मी फकीर आहे, मी झोळी घेईल आणि चालू लागेल – इति नरेंद्र मोदी  नोटबंदीच्या निर्णयाने […]

जातीधर्माच्या व्यवस्थेचा पगडा आणि धर्म निरपेक्षतेचा मुलामा

जयललिता यांच्या मृत्यू नंतर पुन्हा एकदा भारतीय चेह-या वरचा मुलामा उडाला आहे.जयललिता या ब्राह्मण विरोधी राजकीय पक्षाच्या सर्वेसर्वा होत्या . किंबहुना ब्राह्मण विरोध हाच या पक्षाचा इतिहास आहे. चेन्नईतील उच्च जातीचे लोक केव्हाच हद्दपार झाले आहेत . […]

देशाचे चित्र बदलत आहे त्याचे कमीतकमी साक्षीदार तरी व्हा

आठ दिवस घरात असलेली रक्कम खात्यावर भरण्यासाठी थांबलो होतो. नोटा बदलून घेण्याची गरज भासली नाही. बँक खाते आहे. त्या खात्यावर रक्कम भरली आणि लगेच बेअरर चेक नि थोडी रक्कम काढून घेतली. बँकेचे कर्मचारी कल्पना करवणार नाही इतके चांगले वागत होते. सगळ्या खाजगी बँकेत हाच अनुभव येतोय असे लोक बोलतात. मध्यम वर्गीय आनंदित !!!! या सर्व ५०० […]

1 107 108 109 110 111 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..