आठ दिवस घरात असलेली रक्कम खात्यावर भरण्यासाठी थांबलो होतो. नोटा बदलून घेण्याची गरज भासली नाही. बँक खाते आहे. त्या खात्यावर रक्कम भरली आणि लगेच बेअरर चेक नि थोडी रक्कम काढून घेतली. बँकेचे कर्मचारी कल्पना करवणार नाही इतके चांगले वागत होते. सगळ्या खाजगी बँकेत हाच अनुभव येतोय असे लोक बोलतात. मध्यम वर्गीय आनंदित !!!! या सर्व ५०० […]
आमच्या मुंबईसारख्या शहरात आमचा शिव्यांशी नित्य संबंधं येतो. येवढा की आता त्याचं काहीच वाटेनासं झालंय. इथे गर्दीच येवढी की येता जाता धक्का लागतोच. तो मुद्दामहून दिलेला धक्का नाही हे देणाऱ्याला आणि लागणाऱ्यालाही माबिक असतं. तरी चार दोन शिव्या दिल्या-घेतल्या जातातच. एकमेकाची आय-माय साग्रसंगीत उद्धारली जाते..पण त्यात त्या धक्का देणाऱ्या-घेणाऱ्याविषयी राग नसतो तर त्या ‘व्यवस्थे’ला दिलेल्या शिव्या […]
आपण आपल्या लहानपणापासून कृष्णजन्म कहाणी बऱ्याच वेळेस ऐकली आहे, सिनेमा, नाटकातून सुद्धा पाहिलेली आहे, काही ठिकाणी बरेच प्रश्न अनुत्तरीत वाटले, त्याचा विचार करून काही कड्या जुळवण्याचा प्रयत्न केला आहे. माझाही श्रीकृष्णाबद्दल तितकाच आदर आहे जितका आपण सर्वांचा आहे, तसेच या लेखातून कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. कंसराजा आपल्या लाडक्या बहिणीचे लग्न वासुदेव सोबत लावतो, व खूप […]
आज इतक्या वर्षांनंतर डाॅ. बाबासाहेब तळागाळात पोहोचले, रुजले. परंतू शेवटी जे सर्वच मोठ्या माणसांचं होतं तेच बाबासाहेब या देव माणसाचंही झालं..बाबासाहेब एक समाजाचे म्हणून ओळखले जायला लागले. जसं, संत नामदेव शिंपी समाजाचे झाले, संत रोहीदास चर्मकार समाजाचे, फुले माळीसमाजाला दिले गेले..! अशी कित्येक उदाहरणं देता येतील. परदेशात असं झालेलं दिसत नाही. मार्टीन ल्युथर किंग किंवा नेल्सन […]
ऊस हे नगदी पीक आहे. ते पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते. पश्चिम महाराष्ट्रात भरपूर ऊस होतो. तर मराठवाड्यात कमी पर्जन्यमान असल्याने येथील शेतकरी, शेतमजूर ऊसतोडीचा पर्याय निवडतो. दिवाळी – दसरा सणादरम्यान बहुतांश साखर कारखाने सुरू होतात. हंगाम सुरू होण्यासाठी बैलगाडी,ट्रॅक्टर, ट्रक यांचा वापर ऊस वाहतुक करण्यासाठी केला जातो. ऊसतोडीस मजूर लागतात. त्यांना उचल, आगावू रक्कम दिली जाते. […]
केवढं मोठं ज्ञान तो साधा टॅक्सीवाला मला देऊन गेला होता. हॉर्न माणसांसाठी नसून जनावरांसाठी असतो, हे हॉर्नच गाडीला असण्यामागचं कारण असेल याचा विचारच मी कधी केला नव्हता. बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो. मन की बात.. ‘टॅक्सीवाल्याची शिकवण’ ही माझा लेख ‘दैनिक सकाळ’, पुणे व नगर आवृत्तीत ‘मुक्तपिठ’या सदरात नुकताच प्रसिद्ध […]
पुत्र असावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा, या उक्तीची जाणीव मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून जाणवू लागली, व 8 नोव्हेंबरला ती खऱ्या अर्थाने सार्थ ठरली. 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात, घडवली जाणारी महत्वाची घटना, फक्त 2 लोकांनी नियोजित करून, रात्री 8 वाजता, लोकांच्या समोर ठेवणे, हि निश्चितच धाडसी कृतीच म्हणावी लागेल. आपले नशीब फार चांगले […]
मागील काही दिवसापासुन म्हणजे 8/11/16 तारखेपासून काळा पैसा कसा तयार होतो, कोण साठवतो यावर बरीच चर्चा टीव्ही, फेसबुक, व्हाट्सअँप वर दिसून आली, मीही त्यातलाच एक म्हणून जमेल तसे दोन लेख लिहिले. विरोधी पक्षनेते, तसेच NDA मधील काही विरोधी नेते प्रत्येक भाषणाच्या सुरवातीलाच सांगतात, आम्ही काळ्या पैशाविरुद्ध आहोत, परंतु ज्या तर्हेने हे सर्व हाताळले जातंय ते बरोबर […]
बऱ्याच वेळेला आपण एखाद्या माणसाला त्याच्या कपड्यावरून किंवा पेशावरून जोखण्याची चूक करतो. एखादा साधा सरळ आणि समाजाच्या सर्वात खालच्या स्तरावरची व्यक्ती कधी काय शिकवून जाईल हे सांगता येत नाही. अगदी अलीकडे माझ्याबाबतीत अशी गोष्ट घडली. एका साध्या टॅक्सीवाल्याने मला दोन गोष्टी अगदी सहजपणे आणि त्याच्याही नकळत शिकवल्या. त्या सांगताना त्याने कुठेही मोठा आव आणला नव्हता मात्र […]