मोर्चे काढायचेच असतील तर , मराठा पुढार्याच्या घरावर काढु या !! कारण गेले 60 वर्षे महाराष्टात बहुसंख्य मुखमंत्री मराठा बहुसंख्य मंत्री मराठा बहुसंख्य आमदार मराठा ( आताही ) बहुसंख्य सहकारी साखर कारखाने , मूठभर मराठयांच्या ताब्यात ! बहुसंख्य खाजगी साखर कारखाने , मुठभर मराठयांच्या ताब्यात ! बहुसंख्य सहकारी बँका , मुठभर मराठयांच्या ताब्यात ! बहुसंख्य नगरपालिका , मुठभर मराठयांच्या […]
“एकदा जरूर वाचा” जाट आंदोलन, हरियाणा: जवळपास ७०० कोटींच शासकीय नुकसान, सरकारचा २०००० करोडचा महसूल बुडाला, शेकडो ने मृत्यू, जवळपास ३ राज्यांत भीषण दंगल. पटेल आंदोलन, गुजरात: २५० कोटींच शासकीय नुकसान, ८००० कोटींचा महसूल बुडाला, १२ मृत्यू, २७ लोकांसोबत २०० पोलीस गंभीररीत्या जखमी, ६५० च्या वर अटक. गुज्जर आंदोलन, राजस्थान: ४०० कोटींच शासकीय नुकसान, ६००० कोटींचा […]
Cloud Computing and Enterprising क्षेत्रातील जगातील सर्वात मोठया अमेरिकास्थित कंपनी Oracle चा “Oracle Open World” हा सर्वात मोठा आणि जागतिकदृष्ट्या मानाचा कार्यक्रम नुकताच सन्फ्रान्सिस्को येथे पार पडला. तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक मान्यवरांना या परिषदेत आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात येते. “आमचे वक्ते हे भविष्याला नवा आकार देणारे लोक आहेत” अशी शेखी मिरवत Oracle या कार्यक्रमासाठी आपले वक्ते निवडते. […]
साधारण तीन चार महिन्यांपूर्वी मी माझ्या इमारतीच्या शेजारी असलेल्या दोन झाडांबद्दल एक लेख whatsapp आणि facebookवर लिहिला होता. ३१ मे २०१६ या दिवशी पहाटेच्या वेळेस या दोन झाडांना कोणीतरी विषारी इंजेक्शन देऊन मारून टाकले होते. अगदी ६०-७० वर्ष वयाची ही पूर्ण वाढलेली हिरव्यागार पानांच्या भरगच्च पानांची ही दोन्ही झाडे विषारी इंजेक्शनमुळे अगदी एका आठवड्याच्या काळात काळीठिक्कर […]
परवाच अहमदाबादच्या वाटेवर असताना श्रीमती अनुराधा गोरे यांनी लिहीलेलं ‘ओळख सियाचेनची’ हे पुस्तक वाचत होतो. भारत-पाकिस्तानात वाढलेला तणाव, काश्मिरात चिघळलेली (की चिघळवलेली) परिस्थिती या सर्व अस्वस्थतेच्या पार्श्वभुमीवर हे पुस्तक वाचण्याला आपोआप एक अर्थ प्राप्त झाला होता. काश्मिर, सियाचेन या भारताच्या पाकिस्तान आणि चीन या देशांना भिडलेल्या संवेदनशील सीमावर्ती भागाची अत्यंत सुंदर माहीती या पुस्तकांत श्रीमती गोरे […]
दोन दिवस अबमदाबादेत जाऊन आलो. माझ्या मुलीला तिच्या नोकरीचं पहीलं पोस्टींग अमदाबादेत मिळालं, तिला सोडायला गेलो होतो.. तिला कंपनीतर्फे रुमशेअरींग पद्धतीने क्वार्टर मिळाली होती, ती ताब्यात घ्यायची होती. जवळपास शंभरेक मुली आल्या होत्या देशभरातून..आणि सर्वांची हवी ती रुम मिळवण्यासाठी धडपड चालली होती..सर्वांची म्हणजे पालकांची, त्यातही आईपक्षाची जास्तच..सर्वच आया आपल्या मुलीला आपल्याच शहरातली रुम पार्टनर मिळवून देण्यासाठी […]
भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजणाऱ्या मराठ्यांना झालंय तरी काय? मुघलांच्या आणि अनेक शाह्यांच्या छाताडांवर थयथया नाचून स्वत:च्या मनगटातील ताकदीवर ह्या देशात हिन्दवी स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची वंशपरंपरा मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या ‘द ग्रेट मराठ्यां’नी आरक्षणासाठी इतकं लाचार का व्हावं..? काळ्या छातीवर कोरलेली अभिमानाची ती लेणी कुठे खचली ? जीवघेणा खेळ खेळणारी फौलादी मनगटे घोषणा देण्यासाठी […]
वंशाला दिवा हवा, अर्थात पणती सुद्धा आपलाच वंश आहे हे आम भारतीयाला समजायला अजून जितकी शतके लागणार तितकी शतके स्त्रीभ्रूण हत्या होत राहणार. आपल्या देशात अजूनही असा मोठा वर्ग आहे जो चितेला अग्नी देण्यासाठी मुलगाच पाहिजे या बुरसटलेल्या विचारांचा आहे. यात अशिक्षित, गरीब, निम्न मध्यम वर्गातील लोक अश्या विचारांचे आहेत हे प्रकर्षाने जाणवते, किंबहुना असे म्हणू […]
ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे. […]
“झिंगाट” च्या तालावर महापौरांसह अवघी तरुणाई थिरकली या विसर्जन मिरवणुकीच्या बातमीवरुन सुचलेला लेख. लेखक कळले नाहीत, पण सर्वानीच वाचुन विचार करावा असा. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली. तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली […]