भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजणाऱ्या मराठ्यांना झालंय तरी काय? मुघलांच्या आणि अनेक शाह्यांच्या छाताडांवर थयथया नाचून स्वत:च्या मनगटातील ताकदीवर ह्या देशात हिन्दवी स्वराज्याची निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची वंशपरंपरा मोठ्या अभिमानाने मिरवणाऱ्या ‘द ग्रेट मराठ्यां’नी आरक्षणासाठी इतकं लाचार का व्हावं..? काळ्या छातीवर कोरलेली अभिमानाची ती लेणी कुठे खचली ? जीवघेणा खेळ खेळणारी फौलादी मनगटे घोषणा देण्यासाठी […]
वंशाला दिवा हवा, अर्थात पणती सुद्धा आपलाच वंश आहे हे आम भारतीयाला समजायला अजून जितकी शतके लागणार तितकी शतके स्त्रीभ्रूण हत्या होत राहणार. आपल्या देशात अजूनही असा मोठा वर्ग आहे जो चितेला अग्नी देण्यासाठी मुलगाच पाहिजे या बुरसटलेल्या विचारांचा आहे. यात अशिक्षित, गरीब, निम्न मध्यम वर्गातील लोक अश्या विचारांचे आहेत हे प्रकर्षाने जाणवते, किंबहुना असे म्हणू […]
ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभवात सहाव्या अध्यायात माउलींनी मराठी भाषेची महती सांगताना ” माझ्या मराठाचिया बोलू कौतुके “अशी सुरवात करून ओव्या रचल्या .ज्ञानेश्वरांनी जाणीव पूर्वक मराठीचिया या शब्दा ऐवजी मराठाचिया हा शब्द प्रयोग केला होता . या मधे मराठी बोली बोलणारा तो मराठा हा हेतू असावा .परंतु आज मराठी भाषाच जणू जातीभेदांनी झाकोळून गेली आहे. […]
“झिंगाट” च्या तालावर महापौरांसह अवघी तरुणाई थिरकली या विसर्जन मिरवणुकीच्या बातमीवरुन सुचलेला लेख. लेखक कळले नाहीत, पण सर्वानीच वाचुन विचार करावा असा. संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १४ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहीली. तुकोबारायांनी देखील वय वर्ष १४-१५ च्या आसपास किंवा त्याही आधी पहिला अभंग रचला असावा. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक जेव्हा त्या काळातील समाजाच्या कानांवर पडायला सुरवात झाली […]
पाण्याने दुधासोबत मैत्री केली आणि दुधात एकरुप झाले. दुधाने पाण्याची समर्पित वृत्ती पाहिली आणि म्हणाले, ‘मित्रा तू स्वत्व त्यागून माझे स्वरुप धारण केलेस… आता मीही बघ कशी मैत्री निभावतो ते…. आता तुझे मोल हे तुझे राहिले नाही .. आता बघ मी तुझे आणि माझे मोल समान करुन तुला माझ्या मोलाने विकतो. आणि खरेच ते पाणी दुधात […]
वेगळा विदर्भ का? हा कायमच चर्चेचा विषय आहे. काही लोकांच्या मनात याबाबत साशंका सुद्धा आहे कि जर वेगळा विदर्भ झाल्यास आपण सक्षम होऊ कि नाही. पण खालील काही बाबींवर कृपया विचार करा आणि सांगा कि फायदा कुणाचा होईल. पण कृपया वाचा एकदा तरी.छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेश पासून वेगळे झाले. आता छत्तीसगड चा विकास दर (growth rate) […]
निदान सिद्धिविनायक ट्रस्टने अशा प्रकारच्या उधळपट्टीला थारा देऊ नये. “मन्नत” वाल्याला तेच पैसे ट्रस्टच्या माध्यमातून एखाद्या चांगल्या कार्यासाठी देण्याची विनंती करावी. एवढीच गणेशभक्तांची अपेक्षा असणार. किमान तेवढी अपेक्षा ट्रस्टने पुरवावी. अर्थात ट्रस्टने पुरवली नाही तरी बाप्पा ही अपेक्षा नक्कीच पुरवेल. […]
गिरिजा व प्रसाद मुंबईला सकाळी एक्स्प्रेसने निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी घरी न्याहारी केली. गिरिजा ही पित्तप्रधान व प्रसाद हा कफप्रधान प्रकृतीचा होता. पित्तप्रधान प्रकृतीमुळे गिरिजाचा जठराग्नी प्रदीप्त होता. दोन तासांतच तिला भूक लागली. कर्जतला गिरिजाने वडापाव मागितला. प्रसादला भूक नसल्याने त्याने गिरिजाला वडापाव घेऊन दिला. नंतर दादरजवळ गिरिजाने सॅंडविच खाण्याची इच्छा व्यक्त केली. प्रसाद म्हणाला, ‘‘आपण सकाळी […]
पोट आणि आनंद.. मला जीवनातल्या अनेक गोष्टींविषयी कुतूहल आहे..त्या कुतूहलातून माझ्यासमोर नेहमी नवनविन प्रश्न उगाचंच निर्माण होत असतात..वयाच्या पन्नाशीतही मला वेड्यासारखं या प्रश्नांच्या मागे त्यांच्या उत्तरांच्या शोधात जावसं वातं आणि एखाद्या प्रश्नाची मनासारखी उकल झाली की मला लहान मुलासारखा आनंद होतो..त्याक्षणी मी जगाचा सम्राट असल्याचा आनंद उपभोगत असतो..काही वेळाने वास्तव जगात परतावं लागतं आणि आपल्याला पोटही […]
महाराष्ट्रात विदर्भ आणि विदर्भात वऱ्हाड. म्हणजे पूर्वीचे लोक म्हणत सोन्याची कुऱ्हाड. असा आमचा प्रदेश. महाराष्ट्राच्या मध्यभागी वसलेला बुलडाणा जिल्हा. त्यात खामगाव तालुका. आमच्या जिल्ह्याचे वैशिष्टये म्हणजे, भौगोलिक दृष्ट्या एकसंघ नाही. काही भाग घाटावर तर अर्धा भाग घाटाखाली. त्यामुळे सरळ सरळ जिल्ह्याचे दोन भाग पडलेले आहेत. दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे, बुलडाणा जिल्हा विदर्भात असला तरी अगदी पश्चिम विदर्भात […]