नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

नितीन गडकरी आणि Route 66

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न असलेला मुंबई –पुणे एक्सप्रेस वे तयार झाला आणि नितीन गडकरी या माणसाकडे लक्ष गेले. आजही त्यांच्या शिरावर संपूर्ण देशाचे रस्ते बांधण्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाकली ती त्यांचे मुंबई–पुणे या रस्त्याचे काम पाहूनच.महाड -पोलादपूरचा ब्रिटिश कालीन पूल कोसळल्या नंतर जी विधान सभेत चर्चा झाली त्याचे वृत्त अनेक वृत्त वाहिन्या दाखवत होत्या . सरकार मधील कुणीही ” हो या अनर्थाची जबाबदारी आमची आहे” असे स्पष्ट पणे म्हणत नव्हते. पण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे उद्गार ऐकले आणि जरा बरे वाटले. […]

टिळक.. आम्हाला माफ करा !

नुकताच व्हॉटसऍपवरुन एक लेख वाचायला मिळाला. आपल्या डोळ्यावरील झापडं उघडणारा हा लेख कोणी लिहिलाय ते माहित नाही. मात्र ज्याने कोणी तो लिहिला असेल त्याला तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं नक्कीच वाटत असणार. त्यामुळेच आमचाही खारीचा वाटा म्हणून हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करतोय. एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज! ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट […]

टिप्पणी : ७ : ये कहाँ जा रहे हम ?

बातम्या : * दलितांवरील अत्याचार * स्त्रियांवरील अत्याचार * स्त्रियांचे समाजातील unequal स्थान संदर्भ : वृत्तपत्रें व इलेक्ट्रॉनिक मीडियांमधील विविध बातम्या . • सामाजिक असमानतेच्या व अत्याचारांच्या विविध बातम्या वाचल्या-ऐकल्यानंतर , खरंच आपण २१व्या शतकात आहोत कां, असा मनाला प्रश्न पडतो. कुठे दलितांवर अत्याचार होताहेत, तर कुठे स्त्रियांवर ; तर अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातोय. […]

शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेशबंदी का लादली असावी ?

शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेश असावा कि नाही याच्या वादामुळे माझ कुतूहल चाळवल गेलं आणि मुळात अशी बंदी का लादली गेली असावी याचा विचार मन करू लागलं..माझ्या मनाने माझ्या ज्येतिषशास्त्राच्या अभ्यासाशी लावलेली संगती आपल्यासमोर ठेवतो..या विषयातील तज्ञ मार्गदर्शन करतीलच. ज्योतिषात शनीला अत्यंत महत्व दिल गेलं आहे. शनी हा पहिल्या प्रतिचा अशुभ ग्रह मानला गेलेला आहे. मृत्यूचा […]

मंगलमय दीपपूजन की लाजिरवाणी गटारी?

२ ऑगस्टला आषाढातील अमावस्या आहे. हल्ली या दिवसाला आपल्याला खरेतर लाज वाटावी इतकी कुप्रसिद्धी, “गटारी” म्हणून मिळत आहे.जेव्हा आमच्या आजूबाजूची अमराठी माणसे ”गटारी”चा अर्थ विचारतात तेव्हा आमचेच काही मित्र “त्या दिवशी इतकी प्यायची की गटारात पडून गटारे फुल झाली पाहिजेत”, अशी फुशारकी मारतात.आपल्या समाजातील चांगल्या प्रथा एकमेकांना दाखविण्याच्या स्पर्धेच्या या दिवसात आम्ही मात्र अशा फुशारक्या मारतो.अमराठी […]

‘ॐ’ कार..

‘ॐ’ काराला फक्त ‘शब्द’ म्हणणे म्हणजे हिमालयाला टेकडी म्हणण्यासारखे आहे. खरंतर अवकाश-आकाश-पृथ्वी-पाताळ व्यापूनही उरलेला असा ॐ हा ध्वनी आहे. आपल्या हिन्दु धर्मातील प्रत्येक शुभकार्य ‘ॐ’ शिवाय सुरू होत नाही..ॐ काराचे अनेकांना अनेक अर्थ जाणवत असतील, मला जाणवला आणि पटला तो तुम्हां समोर ठेवतो.. ‘अ’ कार, ‘उ’ कार आणि ‘म’ करापासून तयार झालेला ॐ हा ध्वनी जगातील […]

गोवरी दहन की लाकूड दहन

दहनासाठी लाकडाचा प्रघात कधी सुरु झाला हे सांगणे कठीण आहे, पण काही समाजांचे निरीक्षण केल्यावर असे आढळते की फार पूर्वी गोवरी दहन हिच परंपरा होती, त्याची काही उदाहरणे खाली नमूद केली आहेत, तसेच बऱ्याच वेळेस संभाषणात, “अर्ध्या गोवऱ्या मसणात गेल्या” या वाक्यप्रचाराचा वापर केला जातो, हेही लक्षात घेतले पाहिजे. विदर्भात कोष्टी किव्वा हलबा समाजात पारंपारिक पद्धतीत […]

हरपत चाललेलं समाजभान

दररोज ट्रेनमध्ये एक गोष्ट हमखास दिसू लागलीय. ट्रेनमधेच कशाला, कुठेही हेच दृष्य दिसते..जवळपास प्रत्येकाचे डोळे हातातल्या मोबाईलच्या स्क्रिनमध्ये खिळलेले आणि कानात इअरफोन कानात गच्च बसवलेले..आपण काय करतोय, कुठे आहोत असं ना स्वत:चं भान ना आजुबाजूचं..! गंभिर गोष्ट म्हणजे ह्याला कोणताही वयोगट अपवाद नाही.. डोळे व कान ही अतिशय महत्वाची ज्ञानेद्रीये आहेत. बाहय जगाचं भान ही ज्ञानेद्रीये […]

कोण कोणाचे गुरु?

अखेर ते दुकान बंद पडलं आणि त्याचं शटर नेहमीकरिता खाली ओढण्यात आलं. एका मराठी माणसाने ऐपतीबाहेर खर्च करून स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचं धाडस केलं म्हणून अगदी मोजक्या लोकांना किंचित कौतुक वाटलं, तर स्वत: काहीही न करता इतरांचे व्यवसाय कसे व कधी बंद पडतील याची रात्रंदिवस काळजी वाहणाऱ्या बहुसंख्य रिकामटेकड्यांना ते दुकान लवकरच बंद पडणार, याबद्दल उद्घाटनाच्या […]

यालाच म्हणतात भविष्याचा वेध

इस्त्रायलची जगण्याची लढाई……. नाही तर हा ज्यू/यहुदी समाज कधीच इतिहास जमा झाला असता….जसा हिन्दूचा ह्रास होत आहे एक वेळ जगात 32 देशात हिन्दू राज्य होते व धर्म लोकसंख्या जगात सर्वात जास्त होती आज काय व कुठे आहे……….. फ्रान्स वर लागोपाठ हल्ले झाले,पण फ्रान्स वर गन आणि ट्रकनेच हल्ला होतोय अणुबॉंबने नाही याबद्दल त्यांनी इजरायलचे आभार मानले […]

1 115 116 117 118 119 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..