मनुष्य हा काळाच्या हातातील बाहूले असतो, काळ्-सुत्री बाहूले. तो बरेच काही ठरवतो पण घडतं तेच जे काळ ठरवतो. माझ्या लहानपणापासुन पहाण्यातील एक व्यक्ती आहे,खूप कष्टाळु व मेहेनती, आता अन्दाजे वय ५८-६० असेल, पण मेहेनतीने व्यवसाय करायचे. लग्न झाले तेव्हा परिस्थिति अगदिच बेताची होती, कसेबसे खर्चाची तोंड मिळवणी व्ह्यायची, दोन वेळचे साधे जेवण कसेबसे मिळायचे त्यामुळे जीभेचे […]
उत्साहाने सळसळणा-या ऐन तारुण्यात भविष्याची सुंदर स्वप्नं रंगवत फिरण्याच्या नितांतसुंदर वयात जी घरं आणि त्या घरांना ख-या अर्थाने घरपण प्राप्त करून देणारी माणसं भेटतात त्यांना आपण आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. काही दिवसांपूर्वी नागपूरच्या जुन्या भागातील ‘वाडा संस्कृती’ला तब्बल पंचवीस वर्षांनंतर मी कडकडून भेटलो. व्यवसाय व समाजकार्याच्या निमित्ताने पाचवीला पुजलेल्या भटकंतीमुळे इच्छा असूनही व्यास्तेतून वेळ काढता […]
१७ ऑगस्ट २००८ साली माझा हा लेख लोकसत्ता मध्ये आला होता. हायकोर्टाच्या ताज्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मी हा लेख मराठीसृष्टीवर टाकत आहे. गणेशोत्सवा चे स्वरूप हे उत्सव साज-या करणा-या कार्यकर्त्यांच्या गुणांवर अवलंबून असते .लोकमान्य टिळकांनी राजकारणाबरोबर समाजाला एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न केले ,त्यातूनच शिवजयंती ,गणेशोत्सव या सारखे उत्सव करण्याची परंपरा महाराष्ट्रात उदयास आली.राजकारण आणि धर्म या एकाच […]
एका हायवेवरील मॉलच्या समोरील बसस्टॉपच्या मागे ( लाज वाटते म्ह्णून नाही तर सार्वजनिक ठिकाण आहे म्ह्णुन असेल कदाचित आणि एका बिझनेस पार्कच्या खाली असणार्या पानाच्या टपरीसमोर बर्यापैकी अधुनिक पोषाख परिधान केलेल्या सुंदर दुखण्या तरूणी ऐटीत सिगारेट ओढताना पाहिले की भल्या भल्या पुरुषांची बोटे तोंडात गेल्याखेरीज राहात नाहीत. आंम्ही तर कधी विजलेला सिगारेटही बोटात पकडला नाही पण […]
मे ९, २०१६ च्या लोकसत्ता, मुंबई एडिशनमधील ‘गोवंशप्रतिपालकांचा विजय’ हा लेख वाचला. उत्कृष्ट व्यंग. हे व्यंग आमच्यासारख्या वाचकांना समजलें, पण ज्यांना कळायला हवें, त्यांना तें कळलें असेल काय ? एनी वे, तें जें असेल तें असो, आपण यानिमित्तानें , ‘गाय’ या विषयाची थोडीशी चर्चा करूं या. पुढें जाण्यापूर्वी, मला हें स्पष्ट करणें आवश्यक वाटतें की, एक […]
प्रास्ताविक : २००७ मध्ये भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाला १५० वर्षें पूर्ण झाली. कांहीं लोकांनी त्याची दखल घेतली न घेतली. २०१२ मध्ये, त्या स्वातंत्र्यसमराचा घोषित नेता, अखेरचा मुघल बादशहा बहादुरशाह ज़फ़र याच्या मृत्यूला १५० वर्षें झाली. त्याकडे फारसें कुणाचेंच लक्ष गेलेलें नाहीं. २००७च्या शंभर वर्षें आधी, जेव्हां १८५७ च्या ‘गदर’ला ५० वर्षें पूर्ण झाली होती, तेव्हां स्वातंत्र्यवीर सावरकरांनी […]
प्रास्ताविक : मागे एकदा माझ्या वाचनात आलें की, कांहीं वर्षांपूर्वी, मराठी साहित्यिक संमेलनात, ‘गझलचें मराठी साहित्यावर आक्रमण’ असा एका परिसंवादाचा विषय होता. त्या परिसंवादात योग्य तो निष्कर्ष काढला गेला, असेंही वाचले. तें कांहींही असो, पण ‘गझलचें आक्रमण’ असा विषय संमेलनात चर्चेला यावा हीच मुळात काळजीची गोष्ट आहे. कोणी जर , ‘आक्रमण झालें आहे’ असें म्हणत असेल […]
बृहन्महाराष्ट्र हा जो शब्द आजकाल सर्वत्र वापरात आहे, त्याबद्दल प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, ‘महाराष्ट्र’ ही एक भौगोलिक, सांस्कृतिक, आणि आतां राजकीयही, संकल्पना आहे ; परंतु ‘बृहन्महाराष्ट्र’ ही केवळ सांस्कृतिक संज्ञा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघायचें झाल्यास, बृहन्महाराष्ट्रीय म्हणजे, ‘ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात स्थलांतर केलेले आहे, असे महाराष्ट्रीय जन’, असें म्हणायला हरकत नाहीं. तेव्हां, बृहन्महाराष्ट्राबद्दल चर्चा करतांना, आधी आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीय व महाराष्ट्रीयत्व या शब्दांचा विचार करायला हवा. […]
गीतें हा हिंदी सिनेमांचा अविभाज्य भाग आहे. विशेषकरून ‘गोल्डन इरा’ म्हणजे १९५० ते १९७०/७५ पर्यंतच्या काळातील सुमधुर गीतांची सगळ्यांना अजूनही भुरळ पडते. त्याकाळी विख्यात संगीतकार होतेच, एवढेच नव्हे तर श्रेष्ठ शायरही कार्यरत होते. त्यामुळे गीतांना नुसतेंच कर्णमधुर संगीतच नाही, तर अर्थपूर्ण शब्दही लाभलेले असत. अशाच एका गीतामधील शायरीचा हा आस्वाद, आणि त्यानिमित्ताने त्याच्या शायरवर एक नजर. […]
महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्री. श्रीहरी अणे यांनी नुकताच, ‘मराठवाड्याचे वेगळे राज्य व्हावे’ असा विचार मांडला. (त्याआधीही त्यानी, ‘विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे’, असा विचारही मांडलेला आहे). श्री. अणे यांच्या वक्तव्यावर भिन्नभिन्न पक्षांमधल्या विविध राजकारण्यांनी ‘भावनिक गदारोळ’ केला ; इतका की, त्यानंतर श्री. अणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. २३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’मधील अग्रलेखात, “श्रीहरी अणे यांच्यासारखा […]