प्रास्ताविक : मागे एकदा माझ्या वाचनात आलें की, कांहीं वर्षांपूर्वी, मराठी साहित्यिक संमेलनात, ‘गझलचें मराठी साहित्यावर आक्रमण’ असा एका परिसंवादाचा विषय होता. त्या परिसंवादात योग्य तो निष्कर्ष काढला गेला, असेंही वाचले. तें कांहींही असो, पण ‘गझलचें आक्रमण’ असा विषय संमेलनात चर्चेला यावा हीच मुळात काळजीची गोष्ट आहे. कोणी जर , ‘आक्रमण झालें आहे’ असें म्हणत असेल […]
बृहन्महाराष्ट्र हा जो शब्द आजकाल सर्वत्र वापरात आहे, त्याबद्दल प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, ‘महाराष्ट्र’ ही एक भौगोलिक, सांस्कृतिक, आणि आतां राजकीयही, संकल्पना आहे ; परंतु ‘बृहन्महाराष्ट्र’ ही केवळ सांस्कृतिक संज्ञा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघायचें झाल्यास, बृहन्महाराष्ट्रीय म्हणजे, ‘ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात स्थलांतर केलेले आहे, असे महाराष्ट्रीय जन’, असें म्हणायला हरकत नाहीं. तेव्हां, बृहन्महाराष्ट्राबद्दल चर्चा करतांना, आधी आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीय व महाराष्ट्रीयत्व या शब्दांचा विचार करायला हवा. […]
गीतें हा हिंदी सिनेमांचा अविभाज्य भाग आहे. विशेषकरून ‘गोल्डन इरा’ म्हणजे १९५० ते १९७०/७५ पर्यंतच्या काळातील सुमधुर गीतांची सगळ्यांना अजूनही भुरळ पडते. त्याकाळी विख्यात संगीतकार होतेच, एवढेच नव्हे तर श्रेष्ठ शायरही कार्यरत होते. त्यामुळे गीतांना नुसतेंच कर्णमधुर संगीतच नाही, तर अर्थपूर्ण शब्दही लाभलेले असत. अशाच एका गीतामधील शायरीचा हा आस्वाद, आणि त्यानिमित्ताने त्याच्या शायरवर एक नजर. […]
महाराष्ट्राचे महाधिवक्ता श्री. श्रीहरी अणे यांनी नुकताच, ‘मराठवाड्याचे वेगळे राज्य व्हावे’ असा विचार मांडला. (त्याआधीही त्यानी, ‘विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे’, असा विचारही मांडलेला आहे). श्री. अणे यांच्या वक्तव्यावर भिन्नभिन्न पक्षांमधल्या विविध राजकारण्यांनी ‘भावनिक गदारोळ’ केला ; इतका की, त्यानंतर श्री. अणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. २३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’मधील अग्रलेखात, “श्रीहरी अणे यांच्यासारखा […]
(‘डिफरन्टली एबल्ड’ व्यक्ती) लेखक : सुभाष स. नाईक मार्गदर्शन : डॉ. स्नेहलता नाईक अन्नदानम् परमदानम् विद्यादानम् मत:परम अन्नेन क्षणिकातृप्तिर् यावज्जीवच विद्यया ।। अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, पण विद्यादान हे श्रेष्ठतम आहे. अन्नाने क्षणभरासाठी तृप्ती मिळते, तर विद्येने जीवनभरासाठी तृप्ती मिळते. हा एक जुना संस्कृत श्लोक आहे, विस्मृतीत गेलेला. हल्लीच्या काळात शिक्षणाचा खेळखंडोबा चाललेला आहे. अन्, त्याबद्दल […]
ती सर्वप्रथम माझ्या आयुष्यात आली तेव्हा मला काही म्हणता काहीही कळत नव्हतं. खरं तर ती कसली माझ्या आयुष्यात येतेय, तिच्याच कृपेने मला या पृथ्वीवर जन्म घेता आला! तिच्याजवळ मला विलक्षण सुरक्षित वाटायचं. आज असंख्य महासंहारक अण्वस्त्रं जवळ बाळगूनही या पृथ्वीवरील अनेक देशांना असुरक्षिततेची भावना रात्रंदिवस ग्रासून टाकते. पण ती कोणत्याही अस्त्राच्या मदतीविना केवळ एका पदराचा उपयोग […]
बँकेची भलीमोठी इमारत, काऊंटर नावाच्या भिंतीमागे निर्विकार चेहेऱ्याने लाखांच्या रकमा मोजत बसलेले बँक कर्मचारी नावाचे स्थितप्रज्ञ, ती भिंत ओलांडून आत शिरण्याचे धाडस करून बँकेचे व्यवहार करणारी काही कर्तृत्ववान माणसं, टोकन नावाचे बऱ्यापैकी वजन असलेले पितळी बिल्ले, ते लुकलुकणारे टोकन नंबर्स व आपला नंबर येताच होणारा बेलचा ‘डिंगडाँग’ असा आवाज या सर्व गोष्टींबद्दल मला शाळकरी वयापासून प्रचंड […]
मी ‘भ्रष्टाचार’ हा शब्द लहान पणापासून ऐकतो आहे. गेली ६० ते ६५ वर्षे माझा या शब्दाशी परीचय आहे. भ्रष्टाचार चांगला नाही हे जसे माझ्या मनावर बिंबवले गेले आहे तसेच राजरोजपणे चाललेला भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने पहायची सवय पण लागुन गेली आहे. हा भ्रष्टाचार पिढ्यान पिढ्या चालत आला आहे. अत्यंत भ्रष्ट देशांच्या यादीत भारताचा क्रमांक बराच वरचा आहे […]
ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध लेखक आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते श्री लक्ष्मण माने यांनी दलितांच्या धर्मांतराबाबत लिहिलेला हा अभ्यासपूर्ण लेख. धर्मांतराची कारणे नक्की कोणती ते यामध्ये वाचा. एक नव्हे हजार कारणे दिली आहेत मातंग समाजाने धर्मांतर करण्यामागे ! लक्ष्मण माने हे भटक्या समाजातील आहेत पण त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे …! मी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांहून अधिक […]
६ मे २०१६ रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका संस्थेतर्फे ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही माझी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेत कर्नाटकातून आलेल्या दोन महिला कृषी संशोधकांशी माझी ओळख करून देण्यात आली. त्यातील एका संशोधकाने कथन केलेली तिची दुर्दैवी कहाणी (कागदोपत्री पुरावे माझ्या हातात आल्यानंतर) १२ मे २०१६ रोजी मी फेसबुकवर पोस्ट केली. व्हॉट्सऍपशी माझा दुरूनही […]