मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील उदगीरला आयोजित करण्यात आलेली ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही कार्यशाळा सुरु होण्याआधी सभागृहातील त्या दोघींनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्या मान खाली घालून बसल्या होत्या व त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नव्हता. कार्यशाळा सुरु होण्याआधी आयोजकांनी त्यांचा परिचय करून दिला. त्या कर्नाटकातील कृषी शास्त्रज्ञ होत्या व अकरा तासांचा प्रवास करून स्व-खर्चाने तिथे आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या अत्यंत […]
काही मराठी दैनिक मालिकांना हल्ली विरोधाचा सामना करावा लागत आहे, सध्याच्या मालिका हया वास्तवापासून कोसो दूर असतात. त्यामुळे त्या मालिकांतील कथानकांना आणि कथेतील पात्रांना आणि मुळात कथेला किती गंभीरपणे घ्यायचं याचा विचार करण्याची वेळ आता जवळ आलेली आहे कारण आता मालिकांतील कथानकांचा संबंध थेट समाजाशी, जातीशी आणि धर्माशी लावला जावू लागला आहे. हा मालिकांना विरोध करण्याच्या […]
काही वर्षापूर्वी दुबईच्या मेट्रोत एका भारतीयाला प्रवासासाठी एका धक्कादायक कारणासाठी प्रवेश नाकारला गेला. त्याने धोतर घातले होते. हा माणूस पहिल्यांदा दुबईत धोतराने फिरत नव्हता. यापूर्वीही त्याने दुबईत धोतर नेसून प्रवास केला होता. स्वातंत्र्य आंदोलनात भारतीय रेल्वेच्या एका डब्यातून आखूड धोतर घातलेले “बापू” एका स्थानकावर उतरत असल्याचे आपल्या परिचयाचे आहे. हे चित्र डोळ्यांसमोर उभे करा आणि दुबईच्या […]
लग्न जुळविणे हा हल्ली एक धंदा झालेला आहे. लग्न जुळविण्याच्या नावाखाली कित्येकांनी पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढलेले आहेत. सध्या लग्न जुळविणारी, मंडळे, संस्था, वेबसाइट्स यांना पेव फुटला आहे. या अशा लग्न जुळविणार्या सर्व माध्यमांची मदत घेऊनही जर एखाद्याचे दोन-तीन वर्षे लग्न जुळत नसेल तर वेगवेगळ्या पन्नास व्यक्तींना भेटून त्यांनी नक्की काय साध्य केलेले असतं ? […]
पु.ल.देशपांडे यांच्या लेखावर आधारित खालील उतारा ‘मी मराठी’ असल्याच्या कडव्या अभिमानाने व महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने प्रकाशित केला होता. तो आपल्यासाठी पुन्हा एकदा. महाराष्ट्र दिनाच्या सर्वचजण एकमेकांना शुभेच्छा देतात. परंतू या शुभेच्छा देताना काही गोष्टींची, विशेषतः महाराष्ट्राच्या ‘मराठी परंपरे’ची, आठवण करून देण्यासाठी खालील उतारा लिहीला आहे. थोडा वेळ काढून जरूर वाचावा ही विनंती.. ‘..मुघल काय किंवा इंग्रज […]
दहशतवादी हल्ल्यात अमुक अमुक देशात तमुक तमुक माणसे मरली गेली या अशा आशयाच्या बातम्या आता नित्याच्या झालेल्या आहेत. आपल्या मराठीत म्ह्णच आहे ना ‘रोज मरे त्याला कोण रडे’ तसेच काहीसे या दहशतवादी हल्ल्यांच्या बाबतीत झालेले आहे. फक्त आपल्या देशातीलच नव्हे तर जगभरातील लोकही आता या बाबतीत उदासिन झालेले असावेत. सध्याच्या युगातील माणसे मला वाटत आपला जीव […]
हल्ली वर्तमानपत्रात महिन्यातून एक-दोन तरी ठळक बातम्या येतात की जातीबाह्य विवाह केला म्हणून तसा विवाह करणाऱ्या मुला-मुलीला जिवंत जाळलं, ठार मारलं किंया मग त्या संपूर्ण कुटूंबाची लहान-मोठं न बघता जाहीर विटंबना केली.. हे सर्व आपल्याला वारशात नको असताना मिळालेल्या ‘जाती’मुळे होतं. जातींवर आधारीत समाजरचना हे जगात कदाचित आपल्याच देशाचं लाजीरवाणं वैशिष्ट्य असावं..आपल्या देशात जीव जन्माला येतो […]
(०१.०४.२०१६) मार्च २७, २०१६ च्या लोकसत्तामधील श्री. शेषराव मोरे यांच्या, धर्मनिरपेक्षतेबद्दलच्या भाषणाची बातमी; तसेच ३० मार्चच्या ‘लोकमानस’मधील श्री. राजीव जोशी यांचें त्यावरील मत, व १ एप्रिलच्या ‘लोकमानस’मधील श्री. भालचंद्र कवळीकर यांची त्या मतावरील प्रतिक्रिया, हे सर्व वाचलें. त्यांत बरेच मुद्दे चर्चिलेले आहेत. सर्वांचा परामर्ष घेण्याचा माझा हेतू नाहीं. पण, त्यातील फक्त, १) स्वातंत्र्यवीर सावरकरांची हिंदुत्वाची व्याख्या […]
Standardization is the process of developing and implementing technical standards. ग्रामीण भागाचे सर्व प्रथम standardization झाले पाहिजे होते. लाखो कोटी रुपये खर्च करूनही आम्ही जगाला आमचे एकही खेडे दाखवण्या योग्य करू शकत नाही हे सत्य नाकारू शकत नाही. घरांची रचना, त्यांच्या समोरील आंगणे, (खरेतर घरासमोरील बाग म्हणायचे होते ) त्यांची पाणी पुरवठा योजना, त्यांची मलनिस्सारण योजना […]
छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांचे हेर खाते कसे काम करत होते ते खालील ओव्या दर्शवतात .सदर माहिती मला श्री नरेंद्र नाडकर्णी यांच्या ई मेल वरून मिळाली. अफझलखान स्वराज्या वर चाल करून येत आहे हे महाराजांना कळवण्य साठी हि युक्ती वापरली होती. रामदास स्वामींचे शिष्य स्वराज्यात किती महत्वाचे काम करीत होते हे यावरून लक्षांत येते. अफझलखान निघाला हे […]