पुर्वीच्या काळी घराघरात रेडियो ऐकला जायचा. काळ बदलला, पुढची पिढी आली तसे रेडियोच्याही पुढच्या पिढीचे आगमन झाले. पिढीदरपिढीगणिक नवनवीन गोष्टी येतात, जुन्या गोष्टी बदलतात, त्याचप्रमाणे टेलिव्हीजन नामक रेडीयोच्या पुढील जनरेशननेही लोकांच्या आयुष्यात बदल घडवुन आणला . काम करता करता रेडियो ऐकणे शक्य व्हायचे , तसे टीव्हीचे नाही . त्यासाठी काम सोडुन त्याच्यासमोर बसावे लागते. आमच्या लहानपणी […]
स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय? माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या […]
टोल च्या प्रश्नावर चर्चा आणि आंदोलने ही होणारच होती. टोलची भीषण सत्यता लोकांना कळायला जरा वेळच लागला. राजकारणातील संबंधित लोकांना हे कधीच लक्षात आले होते. पण विनासायास मिळणा-या उत्पन्ना ची सवय त्यांना लागल्या ( श्रीमंत कारवाल्यांकडून ) मुळे निश्चिंत होऊन सर्वजण बघ्याची भूमिका घेत होते . लोकांना कोल्हापूर टोल आंदोलना नंतर अधिक जाणीव झाल्या मुळे आता […]
आम्ही गोरेगांवच्या आरे काॅलनीतल्या ‘फिल्म सिटी’ची सैर केली..सोबत श्री. पेडणेकर नांवाचे फिल्मसिटीचे कर्मचारी मार्गदर्शक म्हणून आले होते.. दुपारी १२ वाजता आमची ट्रिप सुरू झाली व सायंकाळी ४ वाजता संपली.. सिरियल, चित्रपटात दिसणारे भव्य बंगले, त्यातील राजेशाही दिवाणखाने, प्रचंड मोठे राजमहाल, गांवं, रस्ते हे प्रत्यक्ष पाहताना खुप मजा वाटली..आम्हाला ‘जय मल्हार’ या लोकप्रिय मराठी सिरियलमधील ‘बानू’ची झोपडी […]
आपल्यापैकी प्रत्येकजण उपजिविकेसाठी काही ना काही उद्योग-धंदा करतो.. आपल्यालाही कशाची न कशाची तरी आवड असते..मात्र आपला व्यवसाय व आपली आवड यांचा ताळमेळ कधीच बसत नाही..आवड आणि व्यवसाय यांची सांगड बसली ना, की मग ते काम ‘बोजा’ न बनता आनंदाचा स्त्रोत बनतं..समाधीची अनुभुती देणारं ठरतं..खुप कमी माणसं अशी भाग्यवान असतात..अशाच काही सुदैवी लोकांपैकी एक आहेत माझे ज्येष्ठ […]
मला एक प्रश्न पडलाय…..उत्तर सापडलं, माझ्या पुरतं पटलं देखील……तरी पण एकदा तुमचंही मत घ्यावं म्हणून तुम्हालाही विचारतो.. “महाराष्ट्राचं दैवत.. प्रौढ प्रताप पुरंदर.. क्षत्रिय कुलावतंस.. सिंहासनाधीश्वर.. गो ब्राम्हण प्रति पालक.. राजाधीराज ‘छत्रपती’ शिवाजी महाराज” यांच्या उपाधीतील ‘छत्रपती’ हा शब्द, ‘छत्रपती’ की ‘क्षेत्रपती’..?” ‘क्षेत्र’ म्हणजे एखादा मोठा, विस्तृत प्रदेश आणि त्याचा अधिपती, राजा ‘क्षेत्रपती’ असणं योग्य की ‘छत्रपती’? […]
एका गावांतील श्रीमंत गृहस्थांकडे एका तरुणाने येऊन आर्थिक मदतीची याचना केली. परंतु त्या श्रीमंत गृहस्थाने त्याला गोड शब्दात नकार दिला. नंतर काही दिवसांनी त्याच तरुणाने त्या श्रीमंत गृहस्थाकडे येऊन नवीन उद्योगासाठी आर्थिक मदत करण्याची विनंती केली. ही विनंती त्या श्रीमंत गृहस्थाने तात्काळ मान्य केली आणि तशी मदतही दिली. तरुणाने त्याला आश्चर्याने विचारले, ‘या आधी मी मामुली […]
प्रथम आम्ही भारतीय आहोत..! पहले हम भारतीय है..! First We R Bhartiy…! भारतात राहणाऱ्या तमाम भारतीयांना, आपल्या भारतमातेच्या विविधतापूर्ण गुणवैशिष्ट्यांवर अगाढ प्रेम आहे. या देशात सांस्कृतिक, ऐतिहासिक, धार्मिक, भाषिक, शैक्षणिक अशा अनेकबाबतीत विविधता असली तरी, सर्वांचे एकमत आहे की, ‘आम्ही सर्व भारतीय आहोत.’ भारतमातेचे सुख आणि दुःख आम्ही आपले मानतो. भारतमातेची उन्नती आणि अवनती ही आमची […]
पण आजच्या काळात ती स्थिरता मिळविणे जवळ- जवळ अशक्य आहे कारण कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर नियंत्रण ठेवण, आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण आणि प्रलोभनांच्या आहरी न जाणं सोप्प नसतं. सर्वसामान्य माणसांना हे शक्य होत नाही कारण सर्वसामान्य माणसे आपल्या सोयीनुसार आपल्या पाप-पूण्याच्या व्याख्या बदलत असतात. […]
मला मंत्रालयात काही कामानिमित्त अनेकदा ( नाईलाजाने) जावं लागतं.. तेथील कर्मचाऱ्यांची वागणूक, बॉडी लॅंग्वेज, जनतेला तुच्छ समजण्याची ब्रिटीशकालीन सवय अनुभवली की पुन्हा इथं पाय ठेवू नये असं वाटतं..अगदी ‘माझं सरकार’ आलं असलं तरीही.. मंत्रालयाच्या (नांव बदललं तरी ते सचिवालयच आहे हे कोणीही कबूल करेल) इमारतीच्या रचनेपासूनच सामान्य जनतेची पिळवणूक होते. नक्की कोणत्या मार्गाने जायचे व कोणत्या […]