ऐअर इंडिया डब घाईला आलेली आहेच पण त्याच बरोबर भारतातील सर्वात मोठी कंपनी भेल सुद्धा गेली ५ वर्षे सातत्यानी कमी नफ्यात चालत आहे .२०१२ साली या कंपनीचा निव्वळ नफा ७०३९ कोटी रुपये होता .तो दरवर्षी घसरत मार्च २०१५ मध्ये १४१९ कोटी रुपये इतका घसरला.सरकारी कंपन्यांची हि अवस्था का होत आहे याचे उत्तर खरे तर नव्या सरकारनी […]
तीन तरूणींचं सेल्फीच वेड मुंबईत एका तरुणीचा आणि एका निधड्या छातीच्या तरुणाचा बळी घेण्यास कारणीभूत ठरलं. सेल्फीच्या वेडाने सध्या म्हातार्यांीपासून- तारूणांपर्यत सार्यां नाच पछाडलेले आहे. याला अपवाद फक्त ते आहेत जे मोबाईलचा वापर करत नाहीत. तंत्रज्ञानापासून दूर राहणारे आज खर्याु अर्थाने सुखी आहेत असं म्ह्णण्याची वेळ आता जवळ आली आहे. सेल्फीच्या नादात हल्ली तरुणमंडळी फक्त स्वतःतील […]
देशात आणि राज्यात स्त्रियांवरील आत्याचार आणि बलात्कार होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे देशभरात अनेक वाद नव्याने निर्माण होत आहेत. प्रसारमाध्यमे ही ते वाद चवीने चघळ्त आहेत. या सर्वात मुळ प्रश्न नेहमी सारखाच बाजुला पडत आहे. या सर्व घटनांसाठी पोलीस सुरक्षा सबंधी मंत्री आणि अधिकारी यांच्यासह खुद्द स्त्रियांनाही आरोपीच्या पिंजर्यात उभं करून या समस्या सुटणार […]
मध्यंतरी एका बातमीवर माझी नजर स्थिरावली ती बातमी होती आपल्या देशातील विवाहित पुरूषांच्या आतमह्त्येच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येचा आकडाही बर्यापैकी चक्रावणारा होता. आता प्रश्न हा होता विवाहित पुरूषांच्या आत्मह्त्येच प्रमाण का वाढत असाव ? त्याच मुळ कारण आहे आपल्या देशातील पुरूषप्रधान संस्कृती. आपल्या देशात पुरूषप्रधान संस्कृती आहे आणि त्याचा आपल्या देशातील स्त्रियांना ह्जारो वर्षापूर्वीपासून […]
आजही आपल्या देशात नरबळी सारखे प्रकार घडता आहेत हया विषयी वाचल्यावर, ऐकल्यावर आणि पाहिल्यावर मन सून्न होत. डॉ. दाभोलकरांचे बलिदान व्यर्थ गेले की काय असही नराहून वाटू लागत पण ते तस नाही. दाभोलकरांनी अंधश्रध्देच्या विरोधात इतका प्रदीर्घ लढा दिल्यानंतरही जर आपल्या देशात नरबळीसारखे प्रकार होत असतील तर आपला देश अंधश्रध्देच्या गर्तेत किती खोलवर रूतलेला आहे हे लक्षात येत. […]
काल नवीन वर्षाचा पहिला दिवस होता, घरी आल्यावर सहज आस्था चेनल लावले. महर्षी रामदेव यांचे प्रवचन सुरु होते. जीवनात उद्दिष्ट लक्ष्य गाठण्यासाठी दोन सूत्र सांगितले -पहिला विकल्परहित संकल्प आणिक दुसरा अखंड पुरुषार्थ. त्याचेच विश्लेषण आपल्या अल्प बुद्धीने करण्याचा प्रयत्न केला आहे. विकल्परहितसंकल्प अर्थात आपल्याला जीवनात काय बनायचे आहे किंवा काय लक्ष्य गाठायचे आहे. हे आपल्याला माहित […]
अतिशय हृदयस्पर्शी कविता आहे हि !! मी विदर्भात खूप फिरलो आहे .कित्तेक एकर जमिनीचा मालक सुद्धा वीज आणि पाणी नसल्याने विपन्न अवस्थेत आहे.शेतात विहीर आहे पण विहिरीवर बसवलेल्या पंपावर विजेची जोडणी मिळत नाही. ज्यांच्या कडे पंपाला विजेची जोडणी आहे त्यांना वीज मिळण्यासाठी रात्रभर शेतात जागे राहावे लागते.रात्री फक्त ३ तास पंप चालतो ते सुद्धा मध्य रात्रीनंतर […]
मराठीसृष्टीने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेचे निष्कर्ष आत्ताच आले आहेत. या सर्व्हेचा विषय होता मराठीतून इमेल आणि ऑनलाईन प्रतिक्रिया पाठविण्याविषयी. यात सहभागी झालेल्या व्यक्तींकडून आलेल्या माहितीतून दिसते की अजूनही ७७ टक्क्यांपेक्षा जास्त मराठी माणसे आपल्या आपापसातील संपर्काची भाषा म्हणून इंग्रजीचाच वापर करतात. […]
आजचे युग स्पर्धेचे युग आहे असे नेहमी म्हटले जाते. पण मला ते तितकेसे पटत नाही. स्पर्धा हा काही केवळ आजच्या युगाचाच युगधर्म नाही. तर स्पर्धा हा निसर्गचक्राचाच अविभाज्य घटक आहे. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून स्वतःचे अस्तित्व राखण्याच्या स्पर्धेत अवघी सजीव सृष्टी धडपडताना दिसते. जे या स्पर्धेत यशस्वी झाले ते टिकले आणि मागे पडले ते नामशेष झाले. “सर्व्हायव्हल ऑफ […]
कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूंची उदा. तेल – साबण, खाद्यपदार्थांची जाहिरात करताना त्या वस्तूच्या शुध्दतेवर नेहमीच भर दिलेला आढळतो. कारण शुध्दतेला आपण नेहमीच अनन्य साधारण महत्त्व देतो. मग ती चारित्र्याची असो, विचारांची असो किंवा वस्तूंची असो. पण एका बाबतीत मात्र हा “शुद्धतेचा नियम” सर्रास धुडकावून लावलेला दिसतो. आणि ती गोष्ट म्हणजे लेखनातील, उच्चारातील शुद्धता. शुद्धलेखन म्हणजे जुन्या पिढीने […]