दैनिक प्रत्यक्षच्या विश्वगंगेच्या तीरावरील सदरात ‘आऊ यांग्लिन’च्या जीवन संघर्षाचा सिद्धार्थ नाईक यांनी उलगडून दाखविलेला क्लेशदायक पण जिद्दी जीवनपट वाचण्यात आला. असे खडतर जीवन अश्या कोळ्या वयात कोणावरही येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना. एवढया छोटया मुलामध्ये एवढी समज, एवढे धारिष्ट फक्त तोच एक देऊ शकतो. कारण वयाच्या पाचव्या वर्षी त्याच्या वडिलांचा दुसऱ्या मजल्यावरून पडून झालेला अपघात, त्यात […]
भारतात सण आणि उत्सवांचा एक वेगळा इतिहास आहे आणि त्यात दिवाळीचा सण वेगळा नाही. दिवाळी साजरी करण्याची परंपरा प्राचीन काळा पासून चालत आली आहे. जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि काळोखाला दूर सारण्यासाठी पणत्या आणि समया देवघरात लावल्या जायच्या. त्यांचा प्रकाश मंद आणि आल्हाददायक वाटत असे. त्यापासून कमी उष्णता उत्सर्जित होत असे. दिवाळीत रांगोळी भोवती पणत्या लाऊन […]
साहित्य, राजकारण, समाजकारण अशा परस्पर भिन्न क्षेत्रामधली समान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मतभेद. जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात चार वेगवेगळी माणसे एकत्र येऊन काम करतात तिथे मतभिन्नता, मतभेद आलेच. अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या निवडीपर्यंत ही गोष्ट अनुभवायला मिळते. आणि त्यात काही गैरही नाही. मतभेद असने हे समाजाच्या जीवंतपणाचे लक्षण मानले जाते. पण […]
इंद्रं मित्रं वरुणं अग्निं आहुः अथो इति दिव्यः सः सुऽपर्णः गरुत्मान् l एकं सत् विप्राः बहुधा वदंति अग्निं यमं मातरिश्वानं आहुःl (ऋग्वेद१/१६४/४६) [सत्य स्वरूपी ईश्वर एकच आहे, पण ज्ञानीं लोक त्याला इंद्र, मित्र, वरुण आणि अग्नि असें म्हणतात. देवलोकीं राहणारा सुंदर पंखांचा पक्षीही तोच. जगातील विभिन्न जाती पंथातले लोक त्याला विभिन्न नावांनी ओळखतात. कुणी त्याला अग्नी, […]
नमस्कार मित्रांनो, भारत देशातील न्यायव्यवस्थेबाबत आज जरा बोलावसं वाटतं. मित्रहो आपल्या देशातील न्यायव्यवस्थेबद्दल सर्वांचे आप-आपले मत आहेत आणि तसे स्वातंत्र्य सुद्धा भारतीय घटनेने दिलेले आहेत. “न्यायव्यवस्था” म्हणाल तर माणसासमोर एकच विचार येतो कि, आपल्याला या न्याय व्यवस्थेमुळे आपले हक्क सुरक्षित राहून, आपल्याला न्याय मिळेल. भारता सारख्या बलाढ्य देशात अनेकदा असं दिसून येतं कि, काही प्रकरणात या […]
युनिसेफ साठी शिक्षण सल्लागार म्हणून काम करत होतो. त्यावेळी दोन जिल्ह्यातील तीन हजार प्राथमिक शाळांच्या शिक्षकांचे प्रशिक्षण असे काम माझ्याकडे होते. त्याचवेळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातल्या मास्टर टिचर्सना प्रशिक्षण व भारतातील अन्य प्रयोगशील शाळांना/शिक्षकांना भेटी देऊन शैक्षणिक प्रयोगांचे आदान-प्रदान असे एकंदर कामाचे स्वरुप होते. ‘त्या दोन जिल्ह्यात’ मी जाण्याआधी युनिसेफने कोट्यवधी रुपये शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी खर्च केले […]
सध्या टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या मालिका दाखविल्या जातात त्या पाहून खरोखरंच प्रेक्षकांनी त्यातून काही बोध घ्यावां अशा असतात का ? हा प्रश्नांच उत्तर काय द्याव ? हा प्रश्न या मालिका पाहणार्याअ सर्वांनाच व्यतीत करतो कारण आज बहूसंख्य प्रेक्षक फक्त टाईमपास म्ह्णून या मालिका पाहत असतात. पूर्वीचे प्रेक्षक जेवढ्या आवडीने उत्सूकतेने रामायण महाभारत पाहत होते तितक्या […]
नुकतीच एक छोटीशी कथा माझ्या वाचण्यात आली. बर्फाळ प्रदेशात दोन लहान मुले बर्फावर खेळत होती. त्या बर्फाचा पापुद्रा फार पातळ होता. अचानक त्या बर्फाला दडा गेला, एक भोक पडले व त्या भोकातून खेळत असलेल्या मुलांपैकी एक मुलगा घसरून बर्फाखाली असलेल्या थंडगार पाण्यात पडला. दुसर्या मुलाने हे पाहीले व लगेच त्याने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी धाव घेतली. तिथे […]
एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील सख्खी आणि चुलत भावंडे एकाच घरात आणि एकत्र कुटुंबात गुण्यागोविंदाने राहतात असे श्री जितेंद्र रांगणकर यांनी लिहिलेले ‘एकत्र कुटुंबाची गोष्ट’ या सदरात दैनिक ’प्रत्यक्ष’मध्ये दर शुक्रवारी वेगवेगळ्या कुटुंबाची ओळख करून घेताना होते. श्री जितेंद्र रांगणकर यांचे सर्वच विषयावरील लेख खूप वाचनीय, अभ्यासपूर्ण आणि विचारांना चालना देणारे असतात. […]
इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकला तर असे दिसते की व्यसनापाई बरेच राजे आणि त्यांची राज्ये पार धुळीला मिळाली. व्यसनापाई कित्येक कुटुंबे बरबाद झाली. दिनांक १८ जुन २०१५ रोजी मालाड, मालावणी येथे विषारी दारू पिऊन १३ जणांना प्राण गमवावे लागले ही बातमी वाचनात आली. असा दुर्दैवी अंत एखाद्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलणाऱ्या प्रमुखाचा झाल्यास त्या कुटुंबावर काय बिकट प्रसंग […]