स्त्री -भृण हत्या का होतात याचे उत्तर खर तर समाजाच्या मानसिकतेत दडले आहे. आई – वडिलांना मुलगी नकोशी असते असे नाहीये, पण मुलगी म्हणजे खर्च असे समीकरण कुठेतरी मनात पक्के बसले आहे. जन्माला आल्यापासून तिच्या हुंड्यासाठी तजवीज करावी लागणार असे पालकांना वाटते. स्त्रीला दुय्यम वागणूक द्यायची सुरुवात लहानपणापासून होते. आरोग्य, पुरेसा आहार, उच्च शिक्षण याबाबतीत मुलींना डावलले जाते. […]
स्वामी विवेकानंदांचे मूळचे नांव नरेंद्रनाथ दत्त असे होते. ते बंगालचे रहिवासी होते. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे ते एकनिष्ठ शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरु केले. आज जगभर त्यांच्या अनेक शाखा आहेत. […]
आपल्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवताना, थोरा मोठ्यांचे मार्गदर्शन, योग्य शिक्षण आणि अनुभवाची शिदोरी उपयुक्त पडते. उल्लेख करता येतील असे अनेक नामवंत कलाकार मंडळी मराठी मनोरंजन विश्वाला लाभले ज्यांनी मराठी वाङमय कृतीचं अक्षरश: सोनं केलं. […]
प्रेम, माणसांना जोडणारं सुरेख रसायन. किती सखोल, किती मृदु, तरल आणि माणसांना कोणत्याही गोष्टीत आपलंसं मानून स्वत:त गुंतून ठेवणारं. तितकंच निरागस, अबोल पण प्रभावी, चिरंतन, अमर, नात्यातले बंध घट्ट करणारी एक अदभूत नैसर्गिक देणगी. […]
पण प्रश्न खरा हाच आहे की एवढं सगळं झाल्यावरतरी २०१३ मध्ये परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? की हे असेच निरंतर सुरु रहाणार… नेतेमंडळी, तथाकथित (so called) सामाजिक कार्यकर्ते, मिडिया वगैरे आपल्या पोळ्या भाजून घेणार आणि आपण असेच मूकपणे बघत रहाणार? […]
भारतीय राजकारणात कौटिल्याच्या कुटनीतीचा अभ्यास करणारे मुसद्दी आणि अर्थशास्त्राचे विचारवंत असतांना असे आतताई निर्णय भारत सरकार घेऊच कसे शकते ह्याचेच आश्चर्य आणि कुतूहल वाटते! भारताला नुसती अश्यावासने द्यायची, खोटे बोलायचे, विश्वासघात करायचा, पाठीत खंजीर खुपसायचा, वेळ पडल्यास छुपे युद्ध करायचे, आणि वर ‘गिरा तोभी टांग उपर’ असे वागायचे आणि आपल्या मागण्या पदरात पाडून घ्यावयाच्या याचे हे बोलके उदाहरण आहे. […]
पृथ्वीतलावर तीन रत्ने आहेत जल, अन्न आणि सुभाषित. परंतू मुर्ख माणसे दगडांच्या तुकड्यांना रत्नांची संज्ञा देतात. असे प्राचीन ग्रंथामध्ये, सुभाषितकारांनी यथायोग्य वर्णन केले आहे. रत्नतुल्य किंबहुना त्यापेक्षा मौल्यवान असलेले पाणी हे सजीवांचे प्राण होय. […]
फक्त भारतात एक विशेष अपवाद आहे ते म्हणजे कोणत्याही राजकीय व्यक्तीला कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही राजकारणात उतरण्यासाठी. तरी ही राजकीय मंडळी जर निवडून आली तर ते जनतेसाठी नियम व कायदे संसदेत बनविणार […]
लष्कर-सीमा सुरक्षा दल आणि पोलिसांनी गेल्या वर्षभरात दहशतवाद्यांचा बंदोबस्त केल्यामुळे, काश्मीर खोर्यात शांतता आणि निर्भयतेचे वातावरण आहे. परिणामी यावर्षी भूलोकीचे हे नंदनवन परदेशी आणि देशातल्या पर्यटकांनी गजबजले आहे. राजधानी श्रीनगरमध्ये हजारो स्त्री-पुरुष पर्यटक रात्री उशिरापर्यंत शहरातून फेरफटका मारतात. पर्यटकांच्या वाढत्या संख्येने राज्याच्या पर्यटन उद्योगालाही चांगले दिवस आले आहेत. हजारो काश्मिरी नागरिकांना रोजगारही मिळाला. […]
पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिलेल्या म्यानमार भेटीला विलक्षण महत्त्व प्राप्त झाले. पंचवीस वर्षांनंतर म्यानमारला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान ठरले आहेत. आँग स्यान स्यू की यांच्या लोकशाही लढ्याची फलनिष्पत्ती होत असताना भारताने म्यानमारपुढे केलेला मैत्रीचा हात महत्त्वपूर्ण ठरणारा आहे. महत्त्वपूर्ण करार करून मनमोहन सिंगांनी मुरब्बीपणा दाखविला आहे. […]