एवढी प्रचंड स्त्रीची ओळख असतांनाही अजूनही स्त्री जन्मा हीच तूझी कहानी ह्वदयी अमृत नयनी पाणी या विचाराप्रमाणे जिवन जगत आहे. प्रत्येक स्त्री ही राणी लक्ष्मीबाई आहे. परंतु आजचे दुष्य बघीतले तर तीची दषा लग्नापुर्वी ’राणी‘ लग्नानंतर ’लक्ष्मी‘ आणि मुल झाली की ’बाई‘ अशी झाली आहे. भारतीय स्त्रीचे जीवन यमुनेच्या प्रवाहाप्रमाणे संथ वाहत आहे. […]
काँगेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह उर्फ दिग्गीराजा पुन्हा बरळले. अर्थातच ते नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला निशाना बनविण्यास चुकले नाहीत. त्यांचीही मजबुरी असेल कदाचित्! हायकमांडला खुश करण्यासाठी काय काय करावे लागते, त्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशी आणि गाठीशी आहेच. […]
निसर्गाने संपन्नता बहाल केलेली असतानाही नशिबी आलेले अठरा विश्वे दारिद्र्याचे भोग, असुरक्षिततेने सदैव जिवाला लागलेला घोर आणि त्यामुळे आलेली अस्थिरता… या सर्वांमध्ये काश्मिरवासीयांमध्ये कुठेतरी तुटलेपण आले आहे. मुख्य प्रवाहापासून पद्धतशीरपणे दूर ठेवण्यात आल्याचा असंतोष काश्मीरी जनतेत खदखदत आहे. काश्मीर भारतापासून अलग होऊ नये, यासाठी तेथील दहशतवाद उखडून टाकण्यासोबतच भारताला समांतर पातळीवर दुसरे युद्ध जिकावे लागेल, ते म्हणजे काश्मिरी जनतेचे मन जिंकण्याचे. […]
माननीय राजसाहेब ठाकरेजी, तुम्ही मला ओळखत नसाल पण मी तुम्हाला ओळखतो. तुम्हाला कोण नाही ओळखत? मी आपल्याच महाराष्ट्रातला एक सर्वसामान्य नागरिक आहे. म्हणजे तुमचे फ़ोटो मोबाईलच्या वॉलपेपरवर ठेवणारा, कामाला दांडी मारुन तुमचे भाषण ऎकायला येणारा, टी.व्ही मध्ये जर तुमची मुलाखात असेल तर सगळी कामं बाजूला ठेऊन ते पाहणारा, तुमच्या चळवळींना (अहिंसक मार्गाने) पाठींबा देणारा आणि मतदानाच्या वेळी तुम्हाला मत देणारा, मी एक सर्वसामान्य मराठी हिंदु नागरिक आहे. […]
एकीकडे कमालीचे क्रौर्य, अतिशय दुष्टपणा! तर दुसरीकडे मानवतेचा, माणुसकीचा अथांग सागर ! दोन अगदी विरुध्ध टोकांच्या मनोवृत्ती ! आणि त्याचे होणारे नकारात्मक व सकारात्मक परिणाम ! केवळ एक महिन्याच्या अंतराने या दोन्हीचाही प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली पुण्यातील एका महिलेला, एका गृहिणीला. त्या गृहिणीचे नांव आहे सौ.वर्षा जयकुमार परांजपे. सप्टेंबर महिन्यात वर्षा ताईना युरुपमध्ये जाण्याची संधी […]
भारतीय प्रशासनातली वाढती लाचखोरी रोखायसाठी, केंद्र सरकारने अंमलात आणलेले कायदे आणि उपाययोजना अयशस्वी ठरल्या आहेत. लाच देणाऱ्यांना कायद्याचे संरक्षण दिल्यास, लाचखोरावर जरब बसेल, त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करायची सूचना आहे. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा हा लेख खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी….. […]
“धर्मांधतेने आणि धार्मिक कट्टरवादाच्या विषवृक्षाला आलेली गोंडस पण सर्वनाशाकडे नेणारी फळे म्हणजे दहशतवाद होय.” आतापर्यंत भारताचे अनेक तुकडे पाडण्यात परकीय सत्ता यशस्वी झाल्यात. पाकीस्थान, बांगलादेश, नेपाळ तसेच अफगाणिस्थान हा भाग भारतातूनच तोडल्या गेला हे इतिहासावरून सहज समजेल . अफगाणिस्थानातील ‘हिंदुकृश’ पर्वतरांगांच्या नावावरून सहज लक्षात येईल.आजपर्यंत भारताने वारंवार दहशतवादाचे विकारल स्वरूप जगापुढे मांडले, परंतु प्रत्यक्ष झळ पोहचेपर्यंत अमेरिकाही जागी झाली नाही. […]
माझी पावले यंत्रवत झपाझप चालत होती, मात्र बघितलेल्या चित्राने मनात काहूर माजलेले होते. हरीणावरील अनपेक्षित हल्ल्याचा प्रसंग कसा असेल ? हृदयाचे तुकडे करून टाकणाऱ्या प्रसंगांनी किती हरीणांचे दररोज मुडदे पडले जात असतील ? हा प्रश्नच मला अतर्क्य वाटतो ……. […]