एकीकडे कमालीचे क्रौर्य, अतिशय दुष्टपणा! तर दुसरीकडे मानवतेचा, माणुसकीचा अथांग सागर ! दोन अगदी विरुध्ध टोकांच्या मनोवृत्ती ! आणि त्याचे होणारे नकारात्मक व सकारात्मक परिणाम ! केवळ एक महिन्याच्या अंतराने या दोन्हीचाही प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली पुण्यातील एका महिलेला, एका गृहिणीला. त्या गृहिणीचे नांव आहे सौ.वर्षा जयकुमार परांजपे. सप्टेंबर महिन्यात वर्षा ताईना युरुपमध्ये जाण्याची संधी […]
भारतीय प्रशासनातली वाढती लाचखोरी रोखायसाठी, केंद्र सरकारने अंमलात आणलेले कायदे आणि उपाययोजना अयशस्वी ठरल्या आहेत. लाच देणाऱ्यांना कायद्याचे संरक्षण दिल्यास, लाचखोरावर जरब बसेल, त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करायची सूचना आहे. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांचा हा लेख खास मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी….. […]
“धर्मांधतेने आणि धार्मिक कट्टरवादाच्या विषवृक्षाला आलेली गोंडस पण सर्वनाशाकडे नेणारी फळे म्हणजे दहशतवाद होय.” आतापर्यंत भारताचे अनेक तुकडे पाडण्यात परकीय सत्ता यशस्वी झाल्यात. पाकीस्थान, बांगलादेश, नेपाळ तसेच अफगाणिस्थान हा भाग भारतातूनच तोडल्या गेला हे इतिहासावरून सहज समजेल . अफगाणिस्थानातील ‘हिंदुकृश’ पर्वतरांगांच्या नावावरून सहज लक्षात येईल.आजपर्यंत भारताने वारंवार दहशतवादाचे विकारल स्वरूप जगापुढे मांडले, परंतु प्रत्यक्ष झळ पोहचेपर्यंत अमेरिकाही जागी झाली नाही. […]
माझी पावले यंत्रवत झपाझप चालत होती, मात्र बघितलेल्या चित्राने मनात काहूर माजलेले होते. हरीणावरील अनपेक्षित हल्ल्याचा प्रसंग कसा असेल ? हृदयाचे तुकडे करून टाकणाऱ्या प्रसंगांनी किती हरीणांचे दररोज मुडदे पडले जात असतील ? हा प्रश्नच मला अतर्क्य वाटतो ……. […]
भ्रष्टाचार आणि बेईमानीचा देशात सुकाळ आला असताना, एखाधा प्रामाणिकपणाचा प्रसंग अनुभवास आल्यास आपण भारतीय असल्याचा अभिमान वाटतो. छोट्या मोठ्या कामाच्या प्रसंगांची वर्तमानपत्रात बातमी देऊन प्रसिद्धी मिळविणाऱ्या माणसांचीही आज कमतरता नाही. परंतु प्रामाणिकपणाने जगतांना या हाताचे दुसऱ्या हाताला कळणार नाही याची काळजी घेणारे माणसे बघून, ‘जीवंत माणुसकीचा प्रत्यय येतो’.
पाच आणि दहा रुपयांसाठी माणसाचे मुडदे पडणाऱ्या या जगात, हजारो रुपयांना स्पर्श न करणाऱ्या माणसांमुळेच आज माणुसकी आणि विश्वास जीवंत आहे. […]
सिस्टिम बदलायची पण, कोणी ? असा प्रश्न सर्वच स्तरातुन विचारला जातोय. सिस्टिम बदलायची, सिस्टिम बदलायची अशी ओरड ही सातत्याने होते. पण, सिस्टिम विषयी सततगळ काढणारे आणि सिस्टिम विषयी “ब्र” ही न काढणारे अशी दोन भिन्न टोकं आज प्रत्यक्ष वावरताना दिसुन येतात. […]
जागतिकीकरण आणि आधुनिक पाश्चात्य तंत्रज्ञान यांच्या वाढत्या प्रभावामुळे आणि प्रसारामुळे जग जवळ येत आहे हे आपण मान्य करुच. पण, याचं मुख्य कारण भाषेचं आदान प्रदान आहे हे ही विसरात कामा नये. कारण, भाषा हे एकमेव माध्यम आज जागतिक स्तरावरील अनेक क्रांती, अनेकविध व परिवर्तनांसाठी जितकं महत्वाचं मानलं गेलं तितकीच महत्त्वता आज भाषेतून होण्याच्या संपर्कालाही प्राप्त होतेय असं तज्ज्ञांच मत आहे. […]
अपेक्षांच्या ओझ्याखाली वावरणारी आजची तरुण पोरं. नकार ऐकण्याची सवय नसलेली. काहीतरी करण्याच्या हेतुने झपाटलेली हे झपाट लेपणं कुठुन येतं? कोण देत यांना ऊर्जेचं रसायन? असा प्रश्न आपल्यापैकी अनेकांना विचारावासा वाटेल? हो ना? पण, या ऊर्जेची दोरी पालकांच्या हातात कुणी बरी दिली? असा जागरुक प्रश्न विचारत आहेत आजची ग्लोबल पोरं. […]