भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल. […]
वाहिन्यांचा कल्लोळ एवढा झाला की, यामुळे भारताच्या सांस्कृतिक मनोरंजनाची नुसती खिचडी झालेली आहे, त्यामुळे एखादेवेळी का विरंगुळा म्हणून या इडियट बॉक्सचा उपयोग करुन घेतो म्हटले तरी तो निव्वळ इडियटपणाच ठरतो यात तिळ मात्रही शंका उरली नाही. यात काही अपवाद सोडले अन् मनोरंजन होवू लागेल तर ‘कमर्शिअर ब्रेक’ची आडवी टांग ‘आड’ येते त्यामुळे आता
पुन्हा एकदा खर्या रसिकाने नाट्यगृहे, सिनेमागृहे अथवा वाचनालये किंवा परिसंवाद, व्याख्यानमाला या प्रकाराकडे वळण्याचा विचार करायला हरकत नाही. […]
दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण मानला जातो. फटाक्यांच्या आतषबाजीने या उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो. परंतु, फटाक्यांमुळेमोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण होते. फटाक्यांमधील विषारी रसायनांचा मानवी शरीरावर विपरित परिणाम होतो. मानवाप्रमाणेच जीवसृष्टीलाही धोका पोहोचतो. ही सर्व हानी रोखण्यासाठी दिवाळीमध्ये फटाक्यांच्या वापरावर काही मर्यादा आणल्या पाहिजेत. […]
अश्विन वद्य त्रयोदशीपासून कार्तिक शुद्ध प्रतिपदेपर्यंत साजरा केला जाणारा आनंदोत्सव म्हणजे दिवाळी. वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज हे दिवाळीचे दिवस असीम आनंदाचे ठरतात. दिवाळीत प्रत्येक दिवसाला आख्यायिकांचा आधार आहे. अमावस्येच्या रात्रीचा अंध:कार दूर सारून प्रकाशाच्या वाटा दाखवणारा हा सण ! या निमित्ताने आयुष्य जगण्याची नवी प्रेरणा मिळते. […]
मुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिगर मराठी आंदोलने होणे हे तसे नवीन नाही. राजकीय लाभासाठी काही तरी भावनात्मक निमित्त शोधण्याचे प्रयत्न राजकारणी करीत असतात आणि मुंबईसारखे महानगर त्यासाठी सुपीक भूमीसारखे असते. […]
गरीबांसाठी घरबांधणीच्या संबंधात काहीजणांचा उंच इमारतींच्या बांधकामाला आक्षेप असतो. परंतु मुंबईसारख्या शहरांमध्ये जमिनीचा तुटवडा असल्यामुळे आणि जागांचे भाव प्रचंड असल्यामुळे गरजू लोकांना घरे मिळवून द्यायची असतील तर बैठ्या घरांची रचना पुरेशी ठरत नाही. तीन ते सात मजली इमारती बांधणे आवश्यक ठरते. […]
ग्राहकांना भूल घालण्यासाठी घरांच्या विकासकांना, जाहिरातदारांना काही ना काही चमकदार शब्द हवे असतात. मतदारांना वश करण्यासाठी तशीच गरज राजकारण्यांनाही भासत असते. अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजेच परवडणारी घरे आज महानगरांच्या राजकारणी आणि बिल्डर लोकांचे परवलीचे शब्द बनले आहेत. परवडणाऱ्या घरांच्या जाहिराती सध्या मोठ्या प्रमाणात वर्तमानपत्रांमध्ये येत आहेत. अशा गृह प्रकल्पांना सरकारच्या धोरणाचा आशिर्वाद आहे. […]
यंदा देशात सलोख्याचं वातावरण निर्माण झालय ही खुप समाधानाची व आनंदाची गोष्ट आहे कारण नजीकच्या काळातील काही प्रिय घटना या परिस्थितीला साजेशा आहेत अर्थात छोटा – मोठा अपवाद असेलही पण त्यामुळे या आनंदावर विर्जण पडावं एवढही काही मोठं अघटित घडलं नाही, नाही म्हणायला नको ते ऐकायला लावणारे व कल्पनाही करवत नाहीत. […]
नक्षलवादाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असताना मोहिमेतील अधिकार्यांनी नक्षलवाद्यांचा प्रभाव संपत असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता या दाव्यात तथ्य नसल्याचे दिसते. नक्षलवाद फोफावण्याची अनेक कारणे आहेत आणि तो संपवायचा असेल तर या कारणांचे उत्तर शोधले पाहिजे. तसे केले तरच नक्षलवाद संपतोय की वाढतोय हे लक्षात येईल. […]
जगातील बहुतांश देशांमध्ये आर्थिक सुधारणांचे वारे वाहत असले तरी दारिद्रयरेषेखाली जगणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये दोन वेळचे अन्नही धड न मिळणार्यांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत संपन्न देशांनी आपल्या संपत्तीचा छोटा हिस्सा गरिब देशातील जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यावर खर्च करायला हवा. या धारणेतून आता काही ठोस प्रयत्न केले जात आहेत. […]