नक्षलवादाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत असताना मोहिमेतील अधिकार्यांनी नक्षलवाद्यांचा प्रभाव संपत असल्याचा दावा केला आहे. प्रत्यक्ष परिस्थितीचे अवलोकन केले असता या दाव्यात तथ्य नसल्याचे दिसते. नक्षलवाद फोफावण्याची अनेक कारणे आहेत आणि तो संपवायचा असेल तर या कारणांचे उत्तर शोधले पाहिजे. तसे केले तरच नक्षलवाद संपतोय की वाढतोय हे लक्षात येईल. […]
जगातील बहुतांश देशांमध्ये आर्थिक सुधारणांचे वारे वाहत असले तरी दारिद्रयरेषेखाली जगणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये दोन वेळचे अन्नही धड न मिळणार्यांची संख्या मोठी आहे. अशा परिस्थितीत संपन्न देशांनी आपल्या संपत्तीचा छोटा हिस्सा गरिब देशातील जनतेच्या मूलभूत गरजा भागवण्यावर खर्च करायला हवा. या धारणेतून आता काही ठोस प्रयत्न केले जात आहेत. […]
आडनावाची खरोखर गरज आहे का? आडनावे काय सांगतात? आडनाव सोडले तर काय बिघडते? विवाहानंतर महिलांनी कोणते आडनाव लावावे? सासरचे? की माहेरचे आडनाव सोडूच नये? की सासर-माहेरचे जोड आडनाव धारण करावे? […]
महाराष्ट्राचे अर्थकारण हे मुंबईशी निगडीत आहे; ६० वर्षापूर्वी या अर्थकारणाशी तात्कालीन मुंबई राज्याचा मोठा प्रदेश व देशाचे अर्थकारणही थेट संबंधित होते. […]
काही वृत्तपत्रात ज्या बातम्या झळकल्या आहेत त्या धक्कादायक आहेत. तसेही आजकाल वृत्तवाहिन्यांची अमाप पीक आल्यापासून धक्कादायक बातम्यांमध्ये जाण राहीली नाही. […]
महाराष्ट्रात दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीने मराठी आणि मावळी मन लढले! आज किल्ल्यांची दुरवस्था झाली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य दुर्गविज्ञानाची दृष्टी पाहून म्हणावेसे वाटते. […]
शेतकर्यांच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा पायंडा राजकीय पक्षानी पाडला आहे. इतर कोणत्याही मुद्यांना हात न लावता या भावनिक मुद्याचा लाभ घेण्याच्या हेतूने आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रकार राजकीय पक्षानी चालविला आहे. […]
‘व्यक्ती एकटा असला म्हणजे हरवतो’, असे प्रसिध्द लेखक वपु काळे यांनी त्यांच्या ‘पार्टनर’ पुस्तकात म्हटले आहे. मनाला शांती मिळावी म्हणून आपण एकांतात राहणे पसंत करतो. परंतु आपल्याला काही दिवसातच त्या एकांताची सवय जडते. कारण मानव हा सवयीचा गुलाम आहे, हे आपल्याला ठाऊकच असेल. एका ताज्या निरिक्षणात असे आढळून आले आहे की, एकटेपणा आपल्या शरीर व मनाला मोठ्या प्रमाणात हानी पोहचवतो. म्हणजे त्याचा परिणाम आपल्यावर इतक्या भयंकर प्रमाणात होतो की आपल्याला आयुष्यातून उठण्याची वेळ येते. […]