अकरावीच्या प्रवेशाचा गेल्या अनेक वर्षापासून सरकार, नोकरशाही, शिक्षणतज्ज्ञांनी घातलेला सावळा गोंधळ पाहून हा घोळ कायमस्वरूपी मिटवण्यासाठी मी पुढील एक वर्षीय योजना तय्यार केली आहे. कारण सरकारी काम योजनाबद्धरित्या झालेच पाहिजे हा शासनाचा नियम आहे. आपणा कडे कांही योजना असल्यास आपण ही सादर कराव्यात. […]
शेतीक्षेत्रातील अनिश्चिततेवर तसेच आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी शेतकर्यांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो. त्यादृष्टीने पीककर्ज महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर या वर्षी राज्यात पीककर्ज वाटपाचे मोठे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शिवाय यंदाच्या खरीप हंगामात पीककर्जाची रक्कम २० टक्क्यांनी वाढवून मिळणार आहे. याबरोबरच घेतलेले आणखी काही निर्णय शेतकर्यांसाठी दिलासादायक ठरणार आहेत. […]
रोगग्रस्त, पिसाळलेले आणि आक्रमक कुत्र्यांना तर नक्कीच ठार मारले पाहिजे. श्वान प्रेमिंनी कुत्र्यांवर प्रेम करण्यासोबत त्यांच्या पालनाचीही जबाबदारी घ्यावी. त्यांना जर कुत्र्यांवर एवढंच प्रेम करायच असेल तर त्याची किंमतही मोजायला तयार रहायला हव. मनुष्य हा प्रथम माणसांसाठी आहे. आपल्या देशात अनेक अनाथ मुले आहेत त्यांच्याबद्दल ही मंडळी सहानुभुती का दाखवित नाही? […]
येणार्या काळात हा एकेरी पर्याय स्वीकारणार्या स्त्रियांची संख्या उत्तरोत्तर वाढत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एकेरी मातृत्व अनेकांना कोलमडत चाललेल्या कुटुंबसंस्थेचा परिपाक वाटू शकेल. पण याचे उत्तर इतके साधे नाही. या कुटुंबसंस्थेच्या मुळाशी ज्या पुरुषसत्ताक प्रवृत्तीची पेरणी समाजाने केली, त्याची ही फळे असतील का? […]
विषवृक्षाला विषारी फळे येऊ लागली तर त्यात एवढे दचकण्यासारखे काय आहे? जीवनार्थ संपून अनर्थ माजू लागला तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? अजूनही जमिनीची मशागत तर आपणच करतो आहोत ना…! […]
१३ जून १९६९ या दिवशी आ. अत्रे आपल्यातून निघून गेले, वरळीच्या ‘शिवशक्तीतून‘ दादरच्या स्मशानभूमीपर्यंत त्यांची जी प्रचंड अंत्ययात्रा निघाली ती आजही लोकांना आठवत असेल. आ. अत्रे गेले आणि मराठीचा अत्यंत अभिमानी असा महापुरूष निघून गेला. आ. अत्रे गेल्यानंतर १९७६ पर्यंत ‘मराठा‘ दैनिक चालू राहिले व ते नंतर बंद पडले. ‘शिवशक्ती‘ सुध्दा दुसर्यांच्या हातात गेली त्यामुळे आ.अत्रे यांचे नाव मराठी माणसांच्या स्मृतीपटलावरून हळूहळू नाहीसे होऊ लागले. ज्या महापुरूषाने मबईसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई प्राणपणाने लढून जिंकली, त्याचे मराठी मनाला विस्मरण होऊ लागले याची टोचणी वृत्तपत्रव्यवसायात काम करणार्या माझ्या काही मित्रांनाही लागून राहिली. […]
आज मुंबई अस्वस्थ आहे. काय करावे हे तिला सुचत नाही. कसे जगावे हे उमजत नाही. कोणाला सांगावी तिची व्यथा? कोणाकडे मांडावी तिची कथा? जगासाठी ती या देशाची आर्थिक राजधानी आहे. एक महानगरी आहे. पण काय आहे आता तिच्याकडे? […]
सध्या अचानक महाराष्ट्राला चांगले दिवस आले आहेत. सगळीकडे सुबत्ता आली आहे. विजेचा प्रश्न मिटलेला आहे. महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त झाला आहे. शेतकर्यांना पाहिजे तितके पाणी उपलब्ध आहे. तीन तीन पिके वर्षभरात घेतली जातायत. शेतकर्यांच्या आत्महत्या थांबल्यात , त्यांच्या घरात एसीपासुन मायक्रोवेवपर्यंत सर्वकाही उपलब्ध आहे. कुपोषणाचा प्रश्न सुटलाय , सगळी लहान मुले एकजात निरोगी दिसतायत . सरकारी नोकरांचे पगार […]
आमच्या बॅंकेच्या लोन डिफॉल्टरच्या लिस्टवर दर तीन महिन्यानी सही करायचे काम फिल्ड ऑफिसर म्हणुन माझ्याकडेच आहे , सहसा मी या यादीवर नुसती नजर टाकतो , आणि सही करुन टाकतो . यात विशेष असे काहीच बघण्यासारखे नसते. ही लिस्ट आमच्या रिकव्हरी एजन्सीकडे जाते , आणि ती एजन्सी येन केन प्रकारेण लोनची रिकव्हरी करुन बॅंकेत भरते. याबद्दल काही […]