नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

कायद्याचे विद्यार्थी, न्याय आणि भ्रष्टाचार

नुकतीच एक बातमी वाचली की पुण्याच्या एका प्रसिध्द संस्थेत कायदा शिकणार्‍या मुलांनी एका मुलाचे रॅगिंग केले त्यामुळे त्या मुलाने आत्महत्या केली. त्या मुलाचे वडील पोलीस खात्यात नोकरी करत होते. त्या मुलाच्या पाठीवर ‘माझे वडील पोलीस आहेत आणि ते गैरमार्गाने पैसे मिळवतात’ अशी पाटी लिहुन त्याला सगळीकडे हिंडवण्यात आले त्यामुळे त्याने आत्महत्या केली. हे सर्व धक्कादायक होते. पण यातून बरेच प्रश्नही निर्माण होतात.
[…]

आम्ही अमराठी

सामना नावाचा अत्यंत ज्वालाग्रही पेपर आहे. त्याचे संपादक संजय राउत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आणि पेपरहुन अधिक ज्वालाग्रही लेखक. मध्यंतरी त्यांनी बिहारी आणि उत्तरप्रदेशी लोकांबद्दल अत्यंत ज्वालाग्रही लेख लिहिला. संसदीय समितिसमोर त्याची चौकशी झाली आणि नेमक्या त्या दिवशी ” संजय राउतांची संसदिय समितिसमोर माफी ” अशी ब्रेकिंग न्युज वाहिन्यांनी फ्लैश केली. त्यावर लगेचच संजय राउत समोर […]

जागो ये मुर्दों का गांव !

संपूर्ण समाजच बधीर झाला आहे नव्हे जणू मृतप्रायच झाला आहे. येणार्‍या संकटाची जाणीवच नसल्याने त्यावर विचार करून लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने काही उपाय योजणे, त्याचबरोबर मूलभूत गरजा भागविण्याच्या दृष्टीने नियोजनाला सुरूवात करणे याविषयी कोणी बोलतानादेखील दिसत नाही. म्हणूनच कबीराने म्हटल्याप्रमाणे ‘जागो ये मुर्दोंका गांव’ असे म्हणायची वेळ आली आहे. […]

निवडणूका आटोपल्या – सरकार आलं – पुढं काय?

येणार्‍या 1 मे ला महाराष्ट्र राज्य आपले सुवर्ण महोत्सव वर्ष साजरे करीन त्यावेळी आपण अनेक गोष्टींचा विचार करायला हवा त्यातली एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे राज्याचे राजकारण. खरेच महाराष्ट्राचे राजकारण योग्य दिशेने चालले आहे का याचा उहापोह करणे अत्यंत गरजेचे आहे. […]

सत्पात्री दान

नुकतीच एक बातमी वाचली की मुंबईतील भिकारी दरवर्षी रुपये १८० कोटी कमावतात. काय हा दानशूरपणा! खरोखरच भीक मागणे हा सुध्दा एक मोठा उद्योगच झालेला आहे.
[…]

गिरणी कामगार ते नॉलेज वर्कर

एका पिढीतला तो गिरणी कामगार आणि दुसऱया पिढीतला हा नॉलेज वर्कर… सुखी कोण? हयातभर साच्यावर काम करुनही आज ऐन सत्तरीतही किमान दोन किलोमीटर सकाळ संध्याकाळ पायी चालणारा चंदूमामा? की डोळे-कान-तोंड-मान-मणका-पाठ-हात-मनगट-कंबर-गुढगे-पाय… सगळं काही पाच-सहा वर्षात कामातून घालवणारा आमचा आयटी युगातला नॉलेज वर्कर – प्रकाश? भले पैशाने नॉलेज वर्कर सुखी असेल पण तब्येतीने? कॉलेजमधून बाहेर पडल्यापडल्या वीस-पंचवीस हजाराचा पगार घेऊन दोन वर्षांनी औषध आणि डॉक्टरवर महिन्याला हजारो रुपये घालवायचे आणि कायमचे अनफिट होऊन बसायचे यात काय मजा?… शेवटी शरीर फीट तरच बाकी सगळं…. खरंय की नाही? […]

हिंदू राष्ट्राच्या ध्वजाला विनम्र अभिवादन 

हिंदू राष्ट्राच्या वैभवशाली ध्वजा तुला विनम्र अभिवादन! कारण तू आमच्या अनेक शब्दातील भावनांची स्फुर्ती आहेस. तू आमच्या अनेक अव्यक्‍त कल्पनांची मुर्ती आहेस. आमच्या सहस्त्रावधी अस्फुट आकांक्षांची प्रतिकृती म्हणजे तुझे स्वरुप होय. या स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र दिनी तुझ्यासमोर नतमस्तक होताना आमच्या हृदयात अनेक भावनांचे तरंग गर्दी करुन सोडीत आहेत. […]

कुरतडलेला नकाशा हिंदुस्थानचा

०५ ऑगस्ट म्हणजे हिंदूस्थानचा स्वातंत्र्य दिवस यावर्षी ५८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. पण ५८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आपण ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत त्या देशाचा नकाशा नीट, व्यवस्थित पाहिला आहे का? जो नकाशा आपले राज्यकर्ते आपणांस दाखवितात तसा तो १९४७ साली होता का? जो नकाशा आपले राज्यकर्ते पुन्हा पुन्हा आपल्याला दाखवितात आणि आपणही त्याला हाच माझा देशाचा नकाशा आहे. असे म्हणू लागलो. पण प्रत्यक्षात तो तसा होता का? नाही. […]

आता उरले लुटण्यापुरते

पृथ्वीचा फेरफटका मारताना एकदा आद्य वार्ताहर नारदमुनींना एक गलेलठ्ठ डुक्कर घाणीत/गटारात लोळताना दिसले. ईश्वरी अवताराचे महाभाग्य लाभलेल्या वराहाची ती अवस्था नारदाला पाहवली नाही.
[…]

नवी अस्पृश्यता

सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. […]

1 133 134 135
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..