दत्तावरील अभंग तीन शिरे सहा हात । तया माझा दंडवत ।। काखे झोळी पुढे श्वान । नित्य जान्हवीचे स्नान ।। माथां शोभे जटाभार । अगी विभूती सुंदर ।। शंख चक्र गदा हाती । पायी खडावा गर्जती ।। तुका म्हणे दिगंबर । तया माझा नमस्कार ।। नमन माझे गुरुराय । महाराजा दत्तात्रया ।। तुझी अवधूत मूर्ती । […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. वि. शं. चौघुले यांनी लिहिलेला हा लेख गेल्या काही दशकांत मराठीतील संतसाहित्याचा परामर्ष समीक्षक, अभ्यासक, संशोधक, विचारवंत, तत्त्वज्ञ या सर्वांना आपापल्या परीने घेतला आहे. कोणतीही सांस्कृतिक-धार्मिक-सामाजिक-आध्यात्मिक परंपरा सातत्याने सुरू असते. तिच्या प्रवाहात नवीन भर पडत असते; वाटावळणे घेत ती पुढे सरकत असते. काळाच्या ओघात तिच्यात नवी भर पडते. म्हणून […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. नीतिन आरेकर यांनी लिहिलेला हा लेख श्रेष्ठ दर्जाचं साहित्य हे प्रत्येक काळातील वाचकासमोर एक आव्हान असतं. कारण ते कालसापेक्ष असतं आणि तितकंच कालातीतही असतं. ते साहित्य वाचकाच्या कुवतीनुसार त्याला समाधान देत असतं. तो वाचक, त्या साहित्याची, त्याला सापडलेल्या वा त्याला आधारासाठी उपलब्ध असलेल्या निकर्षांच्या आधारावर समीक्षा करत असतो. तुकारामांचं […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये चंद्रसेन टिळेकर यांनी लिहिलेला हा लेख संत तुकाराम – तुकोबा – तुका आणि विं. दां. च्या भाषेत तुक्या देखील ! महाराष्ट्राच्या कडेकपारीत दुमदुमणारं नाव!! संत तुकाराम महाराज !!! मराठी साहित्याच्या दरबारातील मानाचा मानकरी… अफाट प्रतिभेचा प्रतिभावंत, महाकवी, भन्नाट अक्षरांचा स्वामी, भेदक शब्दकळा अवगत किमयागार… संत परंपरेतला कळस, ज्याची अभंगवाणी आसमंतात […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये रामकृष्ण अभ्यंकर यांनी लिहिलेला हा लेख संत पुरुष म्हणजे ईशतत्त्वाचे वाटाडे. जन्मभर स्वतः वारेमाप कष्ट करून सतत त्यांनी जगाचेच हित चिंतिले आहे. ‘चिंता करीतो विश्वाचि ऽऽ’ या वचनातून समर्थ रामदास स्वामींनी ‘कल्याण करी रामराया ऽऽ’ या शब्दांतून समाजाबद्दल ईश्वरीशक्तीकडे अशीच करुणा भाकली आहे. जीवनाच्या अवघ्या जेमतेम दोन दशकाच्या उण्यापुऱ्या काळात […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्रा. डॉ. सयाजी निंबाजी पगार यांनी लिहिलेला हा लेख महाराष्ट्रात श्री विठ्ठल भक्तीच्या स्नेहाने चंद्रभागेत सुस्नात होऊन जीवन कृतार्थ करण्याचा राजमार्ग दाखविणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या मंदिराचा कळस म्हणून गौरविलेले संतश्रेष्ठ म्हणजे तुकाराम महाराज होत. वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा वैचारिक पाया ज्ञानेशांनी घातला. अनुभवामृत, ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथांनी उत्तुंग असे चिविलासाचे व प्रेमबोधाचे तत्त्वचिंतन […]
पशुपक्ष्यांचे शिक्षण, लग्न वगैरे काही नाही तर ते एकमेकांना समजून सांभाळून घेतात. कदाचित भांडण करत असतील. मात्र घर सोडून एकमेकांना सोडून देत नाहीत. कारण त्यांचे घरटं छोट आहे पण मन मात्र खरंच खूप मोठे आहे. दोघेही उच्च शिक्षित. आर्थिक स्वावलंबन. जबाबदारी नाही. बंधन नाहीत सगळ्या सुखसोयी. अजून काय हवं असतं सुखी संसारासाठी ते सगळे काही आहे तरीही असे का व्हावे? हे समजत नाही. पण माणसा परीस… हेच खरं आहे…. […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी लिहिलेला हा लेख महाराष्ट्राच्या संत परंपरेचे रहस्य आपल्या अभंगातून मांडताना बहिणाबाईंनी सार्थपणे असे म्हटले आहे की ज्या वारकरी धर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला त्याच्या कलश स्थानी तुकोबा आहेत. तुकोबांचा अभ्यास म्हणजे एका महायात्रेच्या प्रस्थानासाठी सिद्ध होणे आहे. ही आंतरिक अशी यात्रा आहे. ही धरणीवरल्या माणसाला आकाशाची […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. नयना अशोक मेंगळे यांनी लिहिलेला हा लेख संत तुकाराम महाराजांचे अभंग नावाप्रमाणेच अभंग आहेत! अंतर्गत शक्तीची जबरदस्त ताकत त्यांच्या ठायी होती. भक्ती हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ मूल्य होते. त्यांना नीतीमूल्याची जाण होती. जनजागृतीचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. विट्ठल नाम हे अमृतापेक्षाही त्यांना गोड वाटे. नामचिंतन जसेजसे खोलवर रूजले तसेतसे त्यांचे […]
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये भालचंद्र केशव गन्द्रे यांनी लिहिलेला हा लेख श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्रौपदी वस्त्रहरणांत सातत्याने तिला वस्त्रे पुरवून तिची अब्रू वाचविली. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातही अशाच एका परीक्षेच्या वेळी, तत्सम प्रसंग घडला नि श्रद्धेमुळे ईश्वरी-लीला कशी घडते हे साऱ्यांनाच जाणवले. तुकाराम महाराजांचे गुरुबंधू श्री. गोचर स्वामी! तुकाराम महाराजांवर गुरुकृपेचा वरदहस्त होता. त्यामुळे ते […]