नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

तृप्त मी, अतृप्त मी, तरीही संतृप्त मी:

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी लिहिलेला हा लेख माझा शैक्षणिक प्रवास तसा खडतरच होता. प्राथमिक शिक्षण जन्मगावी वाघोड ता. रावेर (जळगाव) या माझ्या जन्मभूमीतच घेतलं. माध्यमिक शिक्षणही दहावीपर्यंत गावातच झालं. अकरावी (मॅट्रीक) साठी रावेर या तालुक्याच्या गावी माझे मामा गुरुवर्य ना.भि. वानखेडे यांच्या घरी राहिलो. तेव्हा मला खरी शिक्षणाची गोडी […]

वैश्विक मानवी मूल्ये (Universal Human Values -UHV) – नवा प्रयोग

AICTE ने ही संकल्पना प्रथम सुचविली आणि आता ती हळूहळू अंमलात येतेय. तंत्रज्ञांमधील वर्तनविषयक सुधारणा, त्यांच्या आदिम प्रेरणा आणि शिक्षणानंतरच्या भावी काळात कार्यकर्तृत्व अधिक बहरावे या हेतूने तांत्रिक विषयांबरोबरच UHV चे रोपण त्यांच्या मनात व्हावे आणि अधिक मृदू पण तितक्याच ठाम प्रवृत्तीने त्यांनी सगळं स्वीकारावं हा सदर विचारसरणीचा मूळ गाभा ! […]

राष्ट्रव्यापी संपातून घडलेले करियर

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये जोसेफ तुस्कानो यांनी लिहिलेला हा लेख जगणे सरळधोपट असले की त्यात बेचवपणा येतो. कुतूहल, धाडस, उत्कटता, ईर्षा यातून बरेवाईट निर्णय घेऊन आपण जगतो. ठेचकळत, अडखळत अपयशावर मात करत यश संपादन करतो त्याची चव काही औरच असते. आयुष्यातील विविध टप्प्यात उत्कृष्ठतेचा ध्यास अवश्य मनी असावा, पण तिच्या प्राप्तीचा हट्ट नसावा. ‘देवाची […]

‘राहून गेले….वाहून गेले….’

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. प्रदिप कर्णिक यांनी लिहिलेला हा लेख तुमच्या आयुष्यात राहून गेलेल्या, ज्या तुम्हाला करायच्या होत्या, पण होऊ शकल्या नाहीत, अशा विषयावर आमच्या दिवाळी अंकासाठी एक लेख लिहून द्यावा, असा श्री. नालेसाहेबांचा फोन आला. ते विषयाचा अधिक विस्तार करीत होते आणि मी त्याचवेळेला विषयाला मनात प्रारंभही केला. म्हटले, अरे वा, अगदीच […]

गरज आहे हमखास यशस्वी होण्याची

आजच्या जगात यशस्वी होण्याची व्याख्या आणि अर्थ ह्यामध्ये व्यक्तिनुसार फरक असू शकतो. शरीराने आपण रोजच्या अत्यंत तणावग्रस्त अशा रहाटगाडग्यात अडकलेले असतो. पण व्यक्तीच्या मनात स्वत:ची अशी अनेक स्वप्नं तरळत असतात. […]

मला अस्वस्थ करणारी एक खंत !

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्रा. पु. द. कोडोलीकर यांनी लिहिलेला हा लेख तत्कालीन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु आदरणीय डॉ. टी. के टोपे यांच्या शिफारसीमुळं मी वसईत प्राचार्य म्हणून रुजू झालो. त्याकाळी वसईगाव ही ग्रामपंचायत होती. त्यामुळं प्राध्यापकांना नियमाप्रमाणं घरभाडे, अन्य भत्ते मिळत नव्हते. बाहेरील प्राध्यापक इथं आर्थिक अडचण सोसून येण्यास तयार नव्हते. आर्थिक पात्रता असलेले […]

एक नाणे, दोन बाजू: पर्यटन आणि पर्यावरण

आपल्या भारतातील पयर्टन क्षेत्राचा आढावा घ्यायचा झाला तर जुन्या काळात आपल्याकडे जी तीर्थाटनाला जायची पद्धत होती तो भारतातील पर्यटनाचा उगम. पुढे ब्रिटिशांच्या काळात गोया साहेबाने इथला उन्हाळा सोसेना म्हणून अगदी माथेरानपासून मसुरीपर्यंत भारतभरातली हिलस्टेशन्स शोधून काढली आणि उन्हाळ्यात तिकडे जाण्याची पद्धत पडली. […]

वसईचे पाणी पेटले…

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये फा. फ्रान्सिस दिब्रिटो यांनी लिहिलेला हा लेख मुंबई फुगत चालली होती. तेथील लोंढे मोठ्या संख्येने वसई-विरारला धडकत होते. स्वस्त घरांच्या आमिषाने भारतभरातील लोकांची वसईकडे रीघ लागली होती. पिण्याचे शुद्ध पाणी ही मानवाची आद्य गरज आहे. शासनाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच केले होते. भरपूर पाण्याचे खोटे आश्वासन देऊन बिल्डर लोकांना फसवीत होते. […]

वक्तृत्वाचे सप्तसोपान

प्रसन्नवदन, रसाळ, ओघवती वाणी, संस्कृत भाषेवर प्रभुत्व असूनही सहजसोप्या शैलीत अध्यात्म, साहित्य ह्या विषयांवर अभ्यासपूर्ण प्रवचने, व्याख्याने आणि हिंदी-उर्दूतून सूफीझम ह्यावर देशात-परदेशात विवेचन आणि भावगर्भ निवेदन करणाऱ्या म्हणून ख्याती. […]

अर्ध्यावरती डाव सोडिला..

अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये डॉ. विजय पांढरीपांडे यांनी लिहिलेला हा लेख ज्या संस्थेतून मी इंजिनियरिंगची पदवी घेतली ह्या संस्थेचं पूर्वीचं नाव विश्वेश्वरैया रिजनल इंजिनियरिंग कॉलेज असं होतं. २००२च्या सुमारास त्या सर्व रिजनल कॉलेजेसचं रूपांतर नॅशनल इंस्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (एन आय टी) असं करण्यात आलं. अन् ह्या संस्थाना केंद्र सरकारतर्फे अभिमत विद्यापीठाचा (डीम्ड युनिर्व्हसिटीचा) दर्जा […]

1 16 17 18 19 20 135
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..