अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये एकनाथराव खडसे यांनी लिहिलेला हा लेख जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात कोथळी यागावी गणेशचतुर्थीच्या दिवशी मी जन्माला आलो. माझे प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. माध्यमिक शिक्षण औरंगाबादला घेण्यासाठी जावे लागले. कारण त्याठिकाणी माझे दोघे भाऊ कॉलेजमध्ये शिकत होते. एक मेडिकलला होता तर दुसरा एम.एससी करत होता. मी मात्र कॉमर्स शाखेकडे वळलो. अकोला […]
निसर्गचक्रातील बालपण ही एक पायरी. ती किती कणखरपणे आपण पार करतो, यावर आपलं बरचसं भविष्य अवलंबून. आता माझंच पाहा. मी खेड्यात वाढलो असलो तरी माझ्या बालपणात माझ्या आई-बापानं अनुभवाची जी शिदोरी खांद्यावर ठेवली, तीच पुढे मला उपयोगी आली, येत आहे. […]
‘केसरी’मधील लोकमान्य टिळकांचे आणि ‘काळ’ पत्रातील शिवरामपंत परांजपे यांचे लेख वाचून सावरकर भारावून गेले होते आणि तेव्हापासून टिळक नि परांजपे यांना त्यांनी आपले गुरू मानले होते. […]
प्रणव सकदेव सांप्रत काळातील महत्त्वाचे कवी, कथाकार, कादंबरीकार, अनुवादक आहेत. अग्रगण्य मराठी दैनिकात पत्रकार म्हणून ते त्यांनी काम केलं असून एका मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून ते कार्यरत आहेत. […]
मला त्या सद्गृहस्थाचे आभार मानायचे पण भान राहिले नाही. सुटकेच्या आनंदाने मी भराभर घराकडे निघालो. पण क्षणभर थांबून मागे पाहतो तर काय, तिथे कोणीच नव्हते. आसपास माणसाचा मागमूसही नव्हता. मग कोण होता तो? देवच तर नसेल? खरंच आज मला देव भेटला होता व त्याने मला जीवदान दिले. मनोमन मी त्या अज्ञात देवाचे आभार मानले व मार्गस्थ झालो. […]
‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हणतात ते उगाचच नाही. लहानपणी मला गोष्टींचे पुस्तक वाचण्याचे वेड होते. इसापनितीच्या कथा वाचून वाचून पाठ झाल्या होत्या. दहा वर्षांची असताना स्वयंपाकघरातील तांबड्या कोब्यावर मी ‘कविता’ लिहिली होती. तो कोबा म्हणजे माझी ‘पाटी’ असायची. मोठ्ठाली गणिते त्यावर मी सोडवित असे. […]
व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला श्रीराम पचिंद्रे यांचा लेख स्वदेशी हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वाचा मंत्र होता. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने युवा विनायक दामोदर सावरकरांनी पुण्यात परदेशी कपड्यांची होळी करून स्वदेशीचा झेंडा उचलला होता. १९१५ मध्ये महात्मा गांधी यांचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात आगमन झाले. १९२० मध्ये टिळकांचा मृत्यू झाला, त्या दरम्यान […]
खरेच छान दिवस होते बालपणीचे, पोषक वातावरणही त्या जोडीला मला लाभले. मौजमस्ती, गमती जमती याला मिळालेली भरभक्कम अशी चांगल्या संस्कारांची मजबूत पायरी. अशा सर्व जमेच्या बाजू असणाऱ्या बऱ्याच आठवणी या लिखाणाच्या निमित्ताने एकेक करून समोर दिसू लागल्या. […]
माझ्या तरुण मित्रमैत्रिणींनो, मला बरेचदा व्यवसायाच्या संदर्भात ट्रेनिंग प्रोग्राम अथवा इतर सामाजिक कार्यक्रमांत तरुणाई बरोबर संवाद साधण्याचा योग येतो. मलादेखील अशा संवादाच्या प्रसंगाची ओढ असते. कारण ही तरुणाई काय विचार करते, त्यांच्या अपेक्षा काय आहेत, अडचणी काय आहेत आणि भविष्याबद्दलच्या त्यांच्या आकांक्षा काय आहेत ह्याचा वेध ह्या निमित्ताने मला घेता येतो. गेल्या सुमारे चार दशकांच्या काळात […]