नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

मराठी उद्योजक आणि अस्मिता

आत्मनिर्भर भारत’ची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली आणि ‘कोविड-१९’च्या निराशाजनक वातावरणात देशभरात एक आगळेच चैतन्य सळसळले. ही आत्मनिर्भरतेची संकल्पना सामान्य माणसाने, उद्योग जगताने आणि देशभक्त नागरिकांनी उचलून धरली. या संकल्पनेचा भावनात्मक विचार दूर ठेवून आपण मात्र वास्तवात डोकवायला हवे. […]

आत्मनिर्भर भारत : प्रतिभा पोषणाचे द्योतक

आत्मनिर्भर यात ‘आत्म’ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आत्म याचा अर्थ स्वयम् म्हणजे स्वतः. स्वतःची ओळख असणं खूप गरजेचं आहे. स्वतःची ताकद काय आहे, मर्यादा काय आहे, आपली बलस्थाने कोणती, दुर्बलता कोणती, याचं ज्ञान आपल्याला होतं. दुर्बलतेवर आपण मात करू शकतो. आपल्या बलस्थानांना आपण अधिक मजबूत करू शकतो. […]

अजाणतेपणातील वांडपणा

माझा अजाणतेपणाचा काळ सुखाचा होता की दु:खाचा याचा जमाखर्च मला नाही मांडता यायचा. पुन्हा सुख-दुःखाचे निकष व्यक्तिसापेक्ष आणि आपल्या भावनांचा कस कुणी ऐरणीवर घासून तपासतो का? […]

नदीबाई माय माझी..

परवा सहजच संध्याकाळच्या वेळी गावाहून येता येता गोदावरी काठी थोडा वेळ थांबलो.ताडकळस आणि पालम या दरम्यान धानोरा (काळे) या ठिकाणी गोदावरी नदीवर मोठा पूल बांधण्यात आला आहे. तिथे थोडा वेळ काम नसतांना ही रेंगाळलो पुलावरून खाली पाहिले असं काही मनोहर दृश्य दिसलं की मला पूर्वीच्या काळच्या दिपमाला ची आठवण झाली संध्याकाळ म्हणजे दिवे लागणीची वेळ, त्यातल्या त्यात त्यात दूरवरून झगमगणारे हे दिवे पाहिले जी माणसाला अधिकच आनंद होतो. […]

मी असा का? – महेश झगडे, I.A.S

मी प्रशासनात चौतीस वर्षे ज्या पद्धतीने वागलो तो तसा का वागलो याचे उत्तर खाजगी कंपनीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दडले आहे. त्यामध्ये अवैध गोष्टींची मनस्वी चीड, स्पष्टवक्तेपणा, पैशापेक्षा बौद्धिक समाधानाकडे कल आणि प्रत्येक गोष्टीत खोलवर जावून परिपक्व विचार करण्याची सवय. मला अनेक वेळेस अनेक लोक विचारतात की मी माझ्या प्रशासन कारकिर्दीत असा का वागलो, त्याचे हे एक छोटे विवेचन. […]

जबाबदारीच्या हजार वाटा..

समाजात वावरत असताना नेहमी म्हटल जात की, जसा पैशाकडे पैसा जातो आणि वाढतो, तशी जबाबदारी घेणाऱ्याकडे जबाबदारी जाते आणि वाढते. अशा वेळी तिचं ‘ओझं’ वाटतं. वेळप्रसंगी ‘एखादी जबाबदारी घेणं’ ही ‘क्रेडिटेबल गोष्ट’ वाटायला लागते, तर कधी ‘जबाबदारी घेण्याचं कौतुक होतं’ म्हणून जबाबदारी घ्यायला आवडते. […]

मंतरलेले सोनेरी दिवस

दिवस जसेजसे जुने होऊ जातात तसतसा त्यांचेवर सोन्याचा मुलामा चढू लागतो. सारेच जुने सोने असते की नाही ठाऊक नाही, पण जुने दिवस निश्चितच सोनेरी असतात हा माझा आजपर्यंतचा शाश्वत अनुभव आहे. […]

पण ‘लक्षात’ कोण घेतो?

वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावाहून आलेली एक तरुणी आपल्या मित्राबरोबर गेल्या रविवारी शनिवार वाडा पहाण्यास पुण्यात आली. शनिवार वाडा पाहून झाल्यावर कसबा गणपतीचे दर्शन घेण्यासाठी मित्राबरोबर रस्ता ओलांडताना, भरधाव आलेल्या बुलेटस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने, त्याने दोघांनाही जोरदार धडक दिली.. परिणामी मित्र एका बाजूला व ती तरुणी दुसऱ्या बाजूला पडली.. मागून येणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली ती आल्याने […]

क्रोध

मित्रहो, नमस्कार क्रोध, राग, संताप, द्वेष, तिरस्कार, कुचेष्टा, निर्भत्सना, निंदा, मत्सर, अशा गोष्टी मानवी जीवनात अशांतता निर्माण करतात. मानवाला अस्वस्थ करतात. मानवाच्या विवेकबुद्धीला आव्हान देतात. मानवी प्रकृती ही मूलतः पंचतत्वानी म्हणजे पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायु बनली आहे हे सर्वश्रुत आहे. मानवी जीवनात सुखी जीवनासाठी चार पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष सांगितले असून सात्विक परमोच्च […]

लढा अथवा पळ काढा !

सध्याच्या २४x ७ न्यूज संस्कृतीने आपल्या प्रतिक्रिया/प्रतिसाद तसेच इन्स्टंट करून ठेवले आहेत.बरेचसे अननुभवी वार्ताहर पोरकटपणे हातात भ्रमणध्वनी आणि माईकचे नळकांडे घेऊन इतरांच्या आधी आणि खातरजमा न करताच सनसनाटी ब्रेकिंग ओकताना दिसतात आणि लगेच समाजमाध्यमांवर बरावाईट वर्षाव सुरु होतो… आपले सगळे निर्णय सध्या माध्यमे घेताना दिसतात. आपले शब्द,प्रतिसाद,कृती याबाबत खूप काळजी घेण्याची सध्या नको तितकी गरज निर्माण झालेली आहे. […]

1 22 23 24 25 26 135
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..