ध्येय असणे हे फार महत्वाचे आहे कारण त्यातूनच तयार होणारा नकाशा तुमच्या आयुष्याला दिशा देतो. ध्येय तुम्हाला तुमच्या संपूर्ण वाढीसाठी विकासासाठी आव्हान तयार करतात. ध्येय तुम्हाला कधी काळी तुम्हाला अशक्य कोटीतील वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्यास मदत करतात. स्वतःचे वैयक्तिक ध्येय ठरवणे फार आवश्यक आहे कारण जर तुम्ही तसे नाही केलेत तर बऱ्याचदा तुम्ही तुमचा वेळ व काम इतरांची ध्येय साध्य करण्यासाठी खर्च करता. […]
माध्यमाबरोबर जन्मलेली व व्यवसायाच्या निमित्ताने जगभर विखुरलेली एक पिढी आहे आणि माध्यमापूर्वीच्या काळात जन्मलेली एक पिढी आहे. या दोन पिढ्यांच्या साहित्याच्या संदर्भातील अनेक संकल्पनांमध्ये मूलभूत फरक आहे आपले कवितेच्या नाटकाच्या, कथेच्या, ललित लेखाच्या रूपांतील अभिव्यक्तीचे पुस्तक काढण्यापेक्षा इंटरनेटवरील आपल्या वा तंत्राने होणाऱ्या कविसंमेलनांमध्ये सहभाग घेतात. अशा साहित्यिकांत जन्म व शिक्षण ठाण्यात झालेले पण व्यवसायाच्या निमित्ताने ब्राझिलिया, कनेक्टिक्ट, टोकिओ येथे वास्तव्य असणारे साहित्यिक आहेत, त्यांच्या अनुभवांचे परीघ समृद्ध आहेत. […]
आषाढीचा मुहूर्त गाठत विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी, वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या वाटेवर पडत आहेत. भक्तांच्या गर्दीत त्यांना विठोबाचं दर्शन होणार नाही, कदाचित…पण त्यांना लांबून दिसणारा विठ्ठलमंदिराचा कळसही पुरतो दर्शनासाठी…कारण त्यांचा विठ्ठल, त्यांच्या हृदयातच तर वसतो! […]
ज्यांचे शिक्षण झाले किंवा नाही माहित नसतांना त्यांचे मूल्यमापन करण्याचे आव्हान सध्या आहे. कॉपी रोखणे जसे ऑफलाईन मध्ये आव्हान होते तसेच आव्हान ऑनलाइन परीक्षा पद्धतीमध्ये ही आहे. ऑफलाइन परीक्षेमध्ये प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांना यश मिळत असे पण ऑनलाईन परीक्षेमध्ये अभ्यास न करणारें ही वरचढ ठरत आहेत […]
आज समाज, संस्कृती यात अमुलाग्र बदल झाला आहे. असे असले तरी समाजातील लोकांच्या मानसिक, भावनिक गरजा या जशाच्या तशाच आहेत. त्या समजून घेतल्या तरी आपले नाते संबंध सुधरायला मदत होते. प्रत्येक पदोनपदी आपला लोकांशी संबंध येतोच. कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायच झालं तरी कुटुंबीयांच्या, नातेवाईकांच्या, समाजातील लोकांच्या मदतीची गरज लागतेच […]
जन्म स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे १९४७ पूर्वी झाला आहे आणि त्यांचे साहित्यही त्याच काळात प्रसिद्ध झालेले आहे असा एक गट आणि ज्यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळात झाला, परंतु त्यांचे साहित्य १९४७ नंतर म्हणजे स्वातंत्र्योत्तर प्रकाशित झाले, हा दुसरा गट. या दोघांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करताना बरीच साहित्यिक मंडळी दिवंगत झालेली आढळली. त्यामुळे त्यांच्याशी नाते जोडायचे, इतरत्र प्रकाशित असलेले साहित्यसंदर्भ धुंडाळणे अथवा त्यांच्याशी संबंधित असणारे बुजुर्ग शोधून त्यांच्याकडून आठवणींचे कवडसे हातात येतात का त्याचा प्रयत्न करणे, हाच मार्ग शिल्लक होता. […]
मायकल जॉर्डन, थॉमस एडीसन, एलनॉर रूझवेल्ट आणि हेन्री फोर्ड अशी आणि इतर यशस्वी लोक यांच्यात काय गोष्टी आहेत ज्या त्यांना जेहमीच यश मिळवून देतात. त्या गोष्टी जर आपल्याला देखील माहीत झाल्या तर आपणही त्यांच्या प्रमाणे खात्रीलायक यश मिळवू शकतो. खालील गोष्टी या त्यातलाच काही आहेत असे आपण म्हणू शकतो. […]
संवादात्मक स्क्रीन ,ऑनलाइन वर्ग तसेच एड टेक स्टार्टअप मुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो ,शिकणें मनोरंजक व जटील संकल्पना समजण्यास मदत होते. संबोध स्पष्ट नसणें हेच शिक्षणाच्या पिछेहाटीचं कारण आहे. पोपटपंची ने करिअर करण्याचे दिवस आता संपले आहेत. शैक्षणिक परीणाम वाढविण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर वापरून शिक्षण अधिक आकर्षक व सुलभ बनविले जात आहे. […]
आपल्या पैकी प्रत्येकजण स्वप्न पाहतो पण ती स्वप्नं साकार करण्यासाठी गरज असते ती निर्धार, शिस्त आणि प्रयत्नांची. ऑलिम्पिक म्हटलं की आपल्या मनात विचार येतात ते जबरदस्त मनोरंजनाचे. पण जरा विचार करता आपल्या हे लक्षात येईल की ऑलिम्पिक खेळांमधून आपल्याला जीवनात यश मिळवण्यासाठी बऱ्याच गोष्टी शिकता येतील.. […]
ठाणे येथे 2010 मध्ये झालेल्या अ भा मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेत प्रकाशित झालेला शकुंतला मुळ्ये यांचा हा लेख… लेखातील संदर्भ 2010 मधील आहेत. मात्र आजही हे संदर्भ सद्य परिस्थितीत जसेच्या तसे लागू पडतात. […]