नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

विचारांना वाट करून देण्याची गरज

मनांत येणाऱ्या अनेक विचारांना वाट करून देण्याची गरज असते, त्यांना मोकळं करण्याची जरुरी असते. बोलून दाखवलेल्या मनांतील विचारांमुळे मनावरचा ताण हलका होतो. आपल्या मेंदूत साठवलेले, आठवलेले अनेक विचार, विषय ड्रेन करण्याची आवश्यकता असते. […]

पन्नास वर्षांची मराठी रंगभूमी आणि नाट्यलेखनाचे प्रवाह

मराठी रंगभूमीवरील नाट्यलेखनाचा गेल्या पन्नास वर्षांचा हा धावता आढावा. हा प्रवास सत्तरच्या दशकानंतर विविध माध्यमांच्या आक्रमणाने खडतर होत गेला आणि मराठी प्रेक्षकांच्या पारंपरिक सवयीही बदलल्यामुळे तो अधिकच दुष्कर झाला. पण गुणात्मकदृष्ट्या मराठी नाटक मागे पडत चाललं आहे हा ओरडा खोटा आहे. […]

लहानपणातलं बालपण

अनेकदा अगदी लहानपणापासूनच बाल मनावर आपण, कदाचित अनावधानानं असेल, पण आघात करत असतो, दबाव टाकत असतो. त्यांच्या स्वातंत्र्यावर अनेकदा आपण गदा आणत असतो. प्रत्येक बाब आपण आपल्याच मनाप्रमाणे त्यानं करावी ही केवळ अपेक्षाच नाही, तर सक्ती सुद्धा करत असतो. शिस्तीच्या नावाखाली आपण बाळाची गळचेपी करत असतो. त्यांच्या लहानपणी त्यांचं बालपण टिकवून ठेवणं आपापल्या हातात असतं. […]

बालमनाला सांभाळणे आवश्यक

मी आणि माझं, आपण आणि आपलं या वैचारीकतेमुळे कुटुंबातील सदस्यांनी आपल्या स्वतः भोवती जणू लक्ष्मणरेषा आखून घेतल्याप्रमाणे वर्तन आणि विचार अंगीकारल्याचं दिसत आहे. सामाजिकदृष्ट्या आपणच आपलं अध:पतन तर करत नाहीत ना, हा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. […]

वाचनसंस्कृती : कालची-आजची

— ठाणे येथे झालेल्या 84व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या ‘श्रीस्थानक’ या स्मरणिकेतील हा श्री वसंत श्रीपाद देशपांडे यांचा लेख. वाचनसंस्कृतीबद्दल काही मत व्यक्त करावयाचे म्हटले, की लोकसंख्येच्या किती टक्के लोक आजघडीस वाचन करीत असतील? त्यातून आजच्या युवावर्गाविषयी लिहावयाचे ठरविले, की आपण पन्नासएक वर्षापूर्वीचा तरुण आणि आजचा तरुण वर्ग यातील वाचनसंख्येचा तुलनात्मक आकडा मनाशी बांधू लागतो. पण […]

विचार वेध

विचारांचा वेध घेण्याची सवय असायला हवी त्यातून नीरक्षीरविवेक वृत्ती विकसित व्हायला मदत होते. सर्वंकष सकारात्मक मानसिकता हवी असेल तर विचारांबरोबर समझोता करावा लागतो. हे जुळवून घेणे सुरुवातीला अवघड वाटत असले तरीही सवयीने जमते. […]

बालमनाची निरागसता

बालमन अत्यंत निरागस असतं, हे आपल्याकडून केवळ बोललं जातं; पण त्याचा अनेकदा आपल्या विचारांत आणि वर्तनांत उपयोग केल्याचं दिसून येत नाही. बालमन हे अनुकरणप्रिय असतं; निरपेक्ष, निरागस, नि:स्वार्थी आणि निरपराधी असतं. […]

कोरस

काही दर्दभरी गाणी (बहुतांशी मुकेशची ) ऐकत काम करत बसलोय. त्याच्या आवाजातील वेदनेला अधिक भावविभोर करतोय पार्श्वभूमीचा कोरस ! ” संसार हैं एक नदिया ” असो वा “कई सदियोंसे !” हा कोरस नायक -नायिकेचे , गायक -गायिकेचे सुखदुःख अधोरेखित करतो. त्याला एक खर्ज,एक खोली बहाल करतो. […]

रिडेव्हलपमेंट (पुनर्निर्मिती? पुनर्विकास?)

आपले दिवस सरले तेव्हा गाशा गुंडाळलेला बरा, असं त्या वाड्याला वाटत असेल कां ? भर डेक्कनवर, चव्हाट्यावर आपलं वय झाल्याचं वर्तमान प्रसिद्ध केल्याबद्दल संकोच, किंचित उद्वेग आणि बराचसा राग त्या वास्तूच्या मनात आला असेल कां ? किंवा ” मेकअप ” मुळे आपण अधिक तरुण, चित्ताकर्षक, लोभस दिसणार म्हणून आतून नवी हिरवाई जाणवत असणार कां ? […]

कृतज्ञता

कृतज्ञता ही कदाचित एकमेव अशी भावना असेल जिचा प्रत्येकाला केव्हा ना केव्हा अनुभव येतोच पण ती अभावानेच व्यक्त होते. एकतर आपण इतरांना गृहीत धरत असतो आणि त्यात काय मोठं? ते त्या व्यक्तीचं कामच आहे. त्यासाठी त्याला पगार मिळतो, मग वेगळं कौतुक /कृतज्ञता यांची गरज काय? किंवा आपण बर्‍याच गोष्टींवर आपला हक्क मानत असतो. अशावेळी या ना त्या कारणाने कृतज्ञता राहूनच जाते. […]

1 27 28 29 30 31 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..