सारखे DOING करत असू तर दिवसातील काहीवेळ तरी BEING साठी आपण राखून ठेवतो का? याचं कारण असं की आपणांस आसपास आवाजाची, गोंधळाची इतकी सवय झाली असते की थोडावेळ जरी शांतता असली तर आपण दचकतो/भांबावतो. आजूबाजूला काही नसेल तर आपल्याला कसंनुसं होतं. कामातून बाहेर पडून या शांततेला कवटाळलं तर आपल्याला चैन पडत नाही. […]
शाळेत असताना आपण हा सुविचार एकदा का होईना फळ्यावर लिहिला असेल च कि “Health is Wealth” पण या धकाधकीच्या जीवनात खरंच आपण स्वतःची काळजी घेत आहोत का ??? […]
कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी समजून घेऊन आपापसातील संवादात सकारात्मक शब्दप्रयोग केले पाहिजेत. मनाला मन:पूर्वक मानलं, समजून घेतलं, मोकळं केलं, आनंदी ठेवलं, तंदुरुस्त ठेवलं, सकारात्मक विचारांमध्ये गुंतवलं आणि नकारात्मक विचारांपारून दूर ठेवलं कि फक्त आणि फक्त भरघोस घवघवीत यश, आनंदच प्राप्त होत राहतो. अशा परीस्थित मनावर ताण नाही तर ताबा असणं महत्वाचं असतं, हे समजून घेतलं पाहिजे. […]
आपल्या घराचं अंतरंग सजवण्यात आणि खुलवण्यात आपल्या मानसिकतेचा संबंध असल्यामुळे अंतर्मनाचा त्यांत मोठा वाटा असतो. आपल्या अंतर्मनाच्या सहभागाशिवाय केलेलं अंतर्गत सजावटीचं काम आपल्याच घरात आपल्याला परकेपणा निर्माण करायला कारणीभूत ठरू शकतं. अर्थात, अशी एखादीच सजावट अपवादात्मक असू शकते, की जी आपल्या अंतरंगात न डोकावता केली गेली आहे. […]
करिअरची निवड करताना तर अनेकांच्या बाबतीत अनेकदा काही घडायच्या ऐवजी बिघडतेच. करिअर निवडताना केवळ भावनेच्या आहारी जाऊन आणि त्यांतील ग्लॅमरमुळेच अनेकजण त्याकडे आकर्षित होताना दिसतात. […]
सध्या , शुध्द विज्ञानाचा अभ्यास करण्याची, विद्यार्थ्यांची आवड आणी निकड कमीकमी होते आहे. अुपयोजित आणि व्यावसायिक विज्ञान आणि तंत्रज्ञान शिकण्याकडे आणि तोच व्यवसाय निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढतो आहे. […]
एखादं शरीर जमिनीत पुरलं की काही काळाने तेही मातीमोल होतं, आपल्या आधीच्या लोकांनी केलेल्या चुका नुसत्या उगाळत बसण्यापेक्षा काही काळा नंतर त्यांना देखील तिलांजली देणं गरजेचं असतं नाहीतर काही जखमा अशा असतात ज्यांना कितीही मलम लावलं तरी त्या सुकत नाहीत, त्या नेहमी ओल्याच रहातात […]
एक रोग म्हणून नव्हे तर वृद्धांची मनं. लहानाचे कोंडणे. तरुणांना पेन्शनर सारखे घरात बसून काम करावे लागते पण यात समाधान नाही. आयुष्यातील आंनद लुटायच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर जबाबदारी पार पाडावी लागत आहे. त्यामुळे जीव तीळतीळ तुटतो. […]
आपल्या प्रत्येकाला जगण्यापलीकडचं जीवन अधिक आनंद देत असतं. ह्या आनंदात अनेकदा आपण आत्मकेंद्रित झालो तर मात्र इतरांच्या बाबतीतील आपल्या जाणिवाच संपुष्टात येण्याची शक्यता असते. आयुष्यात दुसऱ्यांसाठी करण्यासारखं खूप काही असतं, पण आपलंच तिकडे लक्ष नसतं. आनंदातिरेकानं काहीवेळा आपल्याला जगाचा, इतरांचा विसर पडतो, पण दु:खाच्या वेळी मात्र प्रत्येकाच्या आठवणी आल्याशिवाय आपला एकही क्षण जात नाही. एखाद्याच्या दु:खापेक्षा […]
श्रवण भक्ती ज्याची अपार त्याचे कान होती तयार नुसती मान डोले तालासंगी काय कामाची!! अर्थ– शिवशाहीर कै श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी 96 व्या वर्षी त्यांच्या एका व्याख्यानात मनातलं दुःख बोलून दाखवलं होतं, ते असं ” इतक्या वर्षांनंतर मला आज असं वाटतं की जर मी व्याख्यानं देण्यापेक्षा लिखाण जास्त केलं असतं तर बरं झालं असतं.” काय शिकायचं […]