कृष्ण हा शब्दच कानावर पडला की चेहऱ्यावर स्मित येते. कृष्ण हा शब्द हा मुळातंच स्थितप्रज्ञ या शब्दाला निर्माण करणारा आहे असे मला वाटते. ज्याच्या पाशी सारं काही मिळवण्याची क्षमता होती त्याने केवळ मार्गदर्शन करावं आयुष्यभर. […]
आपल्याला ना सगळंच हवं असतं. काही ना काही सांगायचं असतं, समोरच्याने ते ऐकायला हवं असतं, नाही ऐकलं तर आपल्याला ते फार लागतं, मग आपल्याला समजून घेत नाहीत म्हणून आपण गळा काढतो. एकूण काय तर सगळ्या दोऱ्या आपल्या हातात हव्या असतात. […]
हा व्यक्ती दिसतो तसा नाहीये, त्याच्या कपड्यांवर जाऊ नका, अमुक अमुक ठिकाणी 2 फ्लॅट आहेत याचे, अमुक हिल स्टेशन ला रिसॉर्ट आहे याचं. किंवा याच्या दिसण्यावर जाऊ नका, फिरतो गाडीतून पण देणी इतकी आहेत की कधीही लोकं येऊन मारू शकतात. […]
कोणाचे दुःख कोणते असते याला काही सीमा नसते. एखादा काळा माणूस मी काळा का? म्हणून दुःख करीत बसतो तर एखादी गोरी बाई बाहेर गेल्यावर गोरेपण टिकवण्यासाठी ते झाकावे लागते या दुःखात बुडालेली असते. […]
एखाद्या गोष्टीचा त्रास होणे, दुःख होणे हे निसर्गाच्या नियमानुसार योग्य आहे पण, जर तेच दुःख गोंजारून पुढे गेले तर आयुष्याला वेग येण्या ऐवजी हातपाय लटपटायला लागतात. प्रगतीचा वेग कमी होतोच शिवाय वैद्याचा खर्च वाढतो. […]
देवाची भक्ती या सगळ्या मध्ये आपला काही स्वार्थ असतो का? की नाही? असेल तर रामजी माणूस म्हणून बरोबर आहे आणि नसेल तर मग तो दु:खी का आहे?खूप वेळ विचार करत होते. स्वतःचे व अनेक लोकांचे अनुभव आठवले. आणि वाटले की आपण सामान्य माणसं हे सगळं नाही समजू शकत. […]
हातातली टाळ वाजली की त्यातून येणाऱ्या आवाजाचा एक वेगळाच आनंद आपल्या शरीरात फुलून येतो अन आपणही त्या सुरात बेधुंद होऊन देवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जातो. […]
भूतकाळातील ऐश्वर्य. वैभव. लोकांनी दिलेला मान आणि बरेच काही आठवत असते. पण कुणीही आपल्याला विचारत नाहीत हे लक्षात आले की वाईट वाटते. कोलमडून जातो. शेवटी आपणहून अलिप्त होऊन स्थितप्रज्ञ होतो.. […]