प्रगतीची वाट सापडली की त्यावर पायाला चाकं फुटतात. मग वेग वाऱ्यापेक्षा अधिक होतो आणि यशाची गाडी धावू लागते. मन आनंदी होते, यश सुखावते, कष्ट मागे पडतात, श्रम वाहून जातात त्या यशाच्या अलोट महापुरात पण, त्या यशाच्या-प्रगतीच्या शिखरावर पोचलं आणि जाणवलं की आपण येथे एकटेच आहोत? तर? […]
सुख आपण काही काळचं लक्षात ठेवतो पण, दुःख मात्र अनंतकाळ चघळत बसतो. काय हे किती संकटं येतायत नुसती एका मागून एक सुरूच आहेत. कसा निभाव लागायचा देवास ठाऊक आता. हे देवा तूच सांभाळून घे रे आता. अशा विनवण्या आपण सतत करत रहातो. […]
जे सुंदर असते त्याला दिखावा म्हणतात, जे सुबक असते त्याला देखावा म्हणतात पण जे कदाचित या दोन्ही पैकी काही नसू शकते जे पाहण्याची ताकद माणसांत आता कमी होत चालली आहे त्याला खरेपणा म्हणतात. […]
आता काळ बदलला आहे आता पक्ष सोडून, पदास लाथ मारून दुसऱ्या पक्षात गेलेल्या लोकांना परत पक्षात आणून रेड कार्पेट घालून त्यांना पूर्वीचे पद बहाल केले जाते कारण आता धर्म नव्हे तर पैसा बोलतो. […]
आपलं म्हणणारे पोषक नसून शोषक आहेत हे नंतर कळले तर त्या जमिनीची रान उगवायचीही योग्यता टिकणार नाही हे खरे. मग नुसतेच वृक्षारोपण होत राहील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी. […]
पुराणात जे सांगितले, ते पूर्वीची लोकं जगली, त्या प्रमाणे त्यांनी आयुष्य घडवले, वैद्यकीय माहिती, व्यवसाय शिक्षण, शिवाय वेगवेगळ्या विषयांतील ज्ञान पुराणात शिकायला मिळते आणि त्याचा उपयोग आपल्या आधीच्या लोकांनी योग्य प्रकारे घेतला. […]
समर्थांचे चरित्र वाचताना, अभ्यासताना अनेक चमत्कारिक गोष्टी पुढे येतात, अचंबित करणाऱ्या घटना सापडतात पण, समर्थ किती वेळा रडले, याची नोंद कुठेही नाही. […]
आपल्या भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव म्हणून त्याचे आगत्य केले जाते. आजही ग्रामीण भागात अजूनही जेवायला बसलेले शेतकरी अनोळखी माणसाला देखिल जाणाऱ्या व्यक्तीला या जेवायला पाहुणे असे म्हणतात रामराम करतात. आणि ती व्यक्ती सुद्धा तितकाच प्रतिसाद देताना म्हणतात की घ्या देवाचे नाव रामराम. […]
योग्य मार्ग, योग्य नीती, योग्य कर्म, योग्य परिणाम, योग्य समय याचे गणित आपल्या आयुष्यात अनुभव आणि सद्गुरू सोडवू शकतात. म्हणून थोरल्या लोकांचा अनुभव आपल्या प्रगती साठी कसा मोलाचा ठरेल याचे गणित मांडलेत की यशाच्या मार्गात कितीही अडचणी आल्या तरी पिछेहाट होणार नाही. […]