नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

दुधावरची साय माया कमी करत जाय

तसेही आता या पिढीला माया प्रेम कमीच आहे. व्यवहारी जगात कसे जगायचे हे जाणतात भावनेत गुंतून पडत नाहीत. याची मनाची तयारी हवी. पूर्वीचा काळ गेला आहे. त्यामुळे थोडी कणखरता ठेवून जगता आले पाहिजे. कदाचित तुम्हाला पटणार नाही पण हे कटू सत्य आहे हे मात्र खरं आहे. […]

भरुनी येता आकाशी (सुमंत उवाच – १०९)

पावसाळा! काहींना न आवडणारा शब्द तर काहींसाठी आनंदाचं उधाण घेऊन येणारा शब्द. मला पावसाच्या रिमझिम सरींमध्ये भिजायला आवडतं, तर काहींना मुसळधार कोसळणाऱ्या पावसात चिंब व्हायला. पण, पावसाळा म्हटलं की कित्येक चांगल्या- वाईट गोष्टी तो घेऊन येतो. […]

मुकुट शिरी तो धारण करूनी (सुमंत उवाच – १०८)

विजापूर दारी चाकरी करणारे मोरे बंधु शिवाजीच्या कर्तृत्वाने चिडले होते. आपल्यापेक्षा लहान असलेल्या एका मुलाने आम्हास नोकरी द्यावी, हा त्यांचा अपमान होता आणि म्हणूनच त्यांनी शिवाजीला पकडून आणण्याचे आदेश दिले होते. […]

पत सांभाळण्या तीर मारिला (सुमंत उवाच – १०७)

दिल्लीचा बादशहा, आलमगीर, आलंपन्हा औरंगजेब याचा पुत्र अकबर त्याच्या कपटी स्वभावास, त्याने केलेल्या अघोरी कृत्यांना जाणून होता. ज्याने आपल्या भावाला आणि बापाला मारलं तो आपल्या मुलाची किंमत काय करेल अशी भीती अकबरास वाटू लागली आणि ठिणगी पडली, अकबर फुटला आणि बापविरोधात बंड पुकारून उत्तरेतून दख्खनला आला तो थेट संभाजी महाराजांना भेटायला. […]

शब्द

लहान असताना रेडिओवर ‘ आवाज के दुनिया के दोस्तो ’ असे बोलून गाण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. खरंच ह्या जगामध्ये आवाजच आवाज आहे. बाह्य जगत आणि अंर्तजगत दोन्ही आवाजांनी भरलेली आहेत. बाह्य जगात ध्वनी प्रदूषण आणि अंतर्जगात विचारांचे प्रदूषण. मनातल्या विचारांना आवाज देणारे आहेत शब्द. विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे शब्द. विचारांना शब्दांचे रूप कसे द्यायचे हे मात्र प्रत्येकांनी ठरवायचे. […]

उंची त्याने गाठून पाहिली (सुमंत उवाच – १०६)

संभाजी महाराजांच्या काळात म्हणजेच १६८० मार्च नंतर ते १६८९ सुरुवातीपर्यंत अनेक लढाया झाल्या. स्वराज्य तलवारीच्या पात्यावर जणू डोलत होते. औरंगजेब सारखा विषारी सर्प स्वराज्याला चारही बाजूने विळखा घालून बसला होता. […]

रामनाम जपावरची शाळा

आता मुलगी सासरी गेली की चैन पडत नाही. पूर्वी पत्र यायची. प्रिय सौ आईस. आणि शेवटी तुझीच.. आणि आईच्या हृदयात कालवाकालव होते. आता तर फोन वर हॅलो आई असा आवाज ऐकला की डोळ्यासमोर लेक उभी राहते आणि डोळ्यातून पाणी येतं.. […]

पर्जन्य काल समीप येता (सुमंत उवाच – १०५)

पावसाळा जवळ आला, आता नालेसफाई कधी होणार? परत या वर्षी मुंबई तुंबणार का? किती दिवस ट्रेन बंद राहणार पावसामूळे? या सारख्या अनेक चिंता लोकांना सतावू लागतात आणि मग त्यावर काही ठोस उत्तर मिळाले नाही की मग लोकं व्यवस्थापनाच्या नावाने खडे फोडायला सुरुवात करतात. […]

1 34 35 36 37 38 136
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..