शब्दाची किंमत ठेवावी वा असावी. पण आज ह्या घोर कलियुगामध्ये शब्दाची काही किंमत नाही. शपथ, वचन, प्रतिज्ञा.. हे शब्द नाहीसे होऊन गेले आहेत. संबंधामध्ये दुरावा येण्याचे हे एक कारण आहे की मनुष्य जस बोलतो तस वागत नाही. कधी कधी विचार येतो की ‘ का बरं एखादा व्यक्ति असं करत असेल?’ काही कारण नसताना ही आज मनुष्याला खोटं बोलावं लागते. […]
संकटे येता घरा, सावध असावे! स्वतःस वेळ देऊनी, साऱ्यांस थोडेच दिसावे!! असे म्हणताना त्याचा नेमका अर्थ लागला नाही तर मात्र आपण दुसऱ्याच्या आयुष्यातले खेळणे तर बनून रहात नाही ना याचा विचार होणे गरजेचे आहे. […]
भिंतींनाही कान असतात म्हणे, जरा हळू बोलावे असे म्हणणारे पेपर मधे कोण ड्रग्स घेतो, कोण पैसे खातो, कोण कोणाच्या आड येतो या विषयांवर मात्र संध्याकाळी पारावर बसून जोरदार भाषण देत असतो. […]
शाळा हे मुलांना अभ्यासमध्ये गुंतवून ठेवणारे आणि गुणांच्या चढाओढीत कुरघोडी करायला लावून शाळेचा गुणांचा TRP वाढवणारे कारखाने झालेयत. 90%, 95%, 98%, 99% गुण मिळवणारी मशीन आम्ही तयार करतोय, जी पुढे मानेवर जू ठेवून अभ्यास करत आपलं शिक्षण पूर्ण करून आणि मोठमोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवून एखाद्या यंत्रमानवासारखी वावरतायत, आत्मकेंद्रीत होऊन आपल्यापुरताच विचार करतायत. […]
प्रवाह कसा पार करायचा, हा प्रश्न या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला केव्हा ना केव्हा पडतोच, मग तो नदीचा प्रवाह असेल, जगण्याचा प्रवाह असेल अथवा अजून कसला प्रवाह असेल. […]
केवळ मोठाली घरे, गाड्या, महागातले कपडे, पायातल्या ब्रॅण्डेड चपला- शूज, हातातली महागडी घड्याळं, फोन, लॅपटॉप हे सगळे असले किचं माणूस सुखी होतो किंवा असतो असे मानणे मूर्खपणाचे आहे. […]
बुद्धीबळ (chess) खेळणारा व्यक्ति आपल्या बुद्धीचा वापर करून, त्या खेळाचे नियम समजून त्या खेळामध्ये पारंगत होतो. त्याचप्रमाणे आपण ही ज्ञानाच्या आधाराने जीवनाचे नियम समजून, बुद्धीचा वापर करून प्रत्येक कार्य करावे. तेव्हाच आयुष्यामध्ये संतुष्टतेचे धन कमवू शकतो. स्थूल धनासोबत संतुष्टतेचे धन ही आपण बुद्धीबळाद्वारे प्राप्त करू शकतो. सुखी-समाधानी होऊ शकतो. […]
इमानदारीत काम करणाऱ्या कामगाराला त्याच्या मालकाने त्याच्या कामाचा इमानदारीतच मोबदला द्यायला हवा ! पण तसे न होता या इमानदार लोकांचीच आज समजात दुर्दैवाने जास्त पिळवणूक होताना दिसते. मग नकळत मनात विचार येतो…इमानदारीचा ठेका काय फक्त गरिबांनीच घेतलेला आहे का ?… […]
मला हे जगायचे आहे, मला हे करायचे आहे म्हणून त्यासाठी मला काय काय करावे लागेल? ह्याचा विचार करून तसे वागणे म्हणजे स्वार्थ होतो का? आणि एखाद्या गोष्टीला जुगारून त्यापलिकडे काही करणे याला स्वार्थ म्हणतात का? […]