नवीन लेखन...

विविध विषयांवरील वैचारिक लेखन

कृतज्ञता – एक कौटुंबिक संस्कार

कृतज्ञता  हे  मानवी स्वभावाचे एक अंग आहे.किंबहुना ते असायलाच  हवे. त्यावरून तो किती सुसंस्कृत आहे हे दिसून येते. तो एक महत्वाचा संस्कार आहे. काहीजणाकडे तो उपजत असतो. काही जणांकडे तो डोळसपणे आपल्या आजूबाजूला, समाजाकडे पहिल्याने येतो. त्यासाठी माणसाने सामाजिक भान ठेवायला हवे. पण कृतज्ञता संस्काराचे मूळ स्त्रोत आहे स्वत:चे कुटुंब. कुटुंबातील मोठ्या माणसांकडे तो असणे गरजेचे आहे. […]

प्रेरणा

“प्रेरणा”मग ती कशी कां असेना, अंतिम परिणाम ‘आत्मविश्वास’ हाच असायला हवा. म्हणतात नं, “स्वत:वर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते.” […]

मानवतेचे दूत

कोरोना नावाच्या दहशतीने आपले २०२० हे वर्ष गिळंकृत केलेले आहेच पण आता २०२१ ही त्याच्या कचाट्यातून सुटताना दिसत नाही. शतकातून एखाद्या येणाऱ्या या महामारीने आपल्या जगाला तीन प्रकारे उध्वस्त करण्याचे आरंभले आहे. […]

अरे संसार संसार

आपले आयुष्य , संसार सुरु झाला की ह्या पायवाटा नि रस्ते पार एकमेकात अडकतात आणि गुंततात आणि तो गुंता इतका वाढतो की तो कोर्टाच्या दारात नेऊन ठेवतो तर कधी आत्महत्या किंवा आणखी काहीव्यसने . […]

वृत्ती, प्रवृत्ती, आकृती, विकृती

आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ‘ बी पॉझिटिव्ह ‘ हा सल्ला देऊ शकतो का? […]

वर्तमानकाळ म्हणजे काय?

जसा भूतकाळ आहे, भविष्यकाळ आहे तसा वर्तमानकाळ नाही. काळ क्षणाने मोजला जात असेल तर तो दुसर्‍या क्षणी उरत नाही, त्या क्षणाला परत आणता येत नाही. पुढचे क्षण ह्या क्षणी दिसत नाहीत. मग ‘चालू क्षण’ म्हणजेच वर्तमानकाळ का? तसे असेल तर ‘वर्तमानकाळ’ क्षणभंगूर आहे. […]

समर्थ “समर्थ “का आहेत?

संत हे समाजाचे HR Managers असतात. उद्या Artificial Intelligence , Internet of Things, Machine Learning आणि Industry ४. ० सारखं तंत्रज्ञान येऊ घातलंय. मनोकायिक समस्या वाढीला लागणार आहेत , ताण -तणाव , आत्महत्या , मानसिक स्वास्थ्यासाठी समुपदेशन इत्यादी समस्या असतील. Anxiety , Depression, दूषित होणारं कौटुंबिक /सामाजिक /राजकीय पर्यावरण पुन्हा आपल्याला समर्थांकडे नेणार आहे. थोडक्यात काय तर समर्थांची आजपेक्षा अधिक गरज उद्या भासणार आहे. बलोपासना ,शारीरिक /भावनिक/मानसिक/अध्यात्मिक गरजांचा समतोल ,धार्मिक असहिष्णूता सगळ्यांना सावरणारे भक्कम हात रामदास स्वामींचेच असतील. त्यांचं प्रयोजन ,अस्तित्व कालजयी आहे. […]

‘इथे’ ओशाळला’ कोरोना

लाॅकडाऊन सुरु झाल्यापासून माणसातील छुप्या ‘सैताना’ने त्याच्या चांगुलपणावर कुरघोडी केली व तो ‘सैतानीवृत्ती’ने वागू लागला…गेल्या दोन महिन्यांत वर्तमानपत्रातील आलेल्या बातम्यांवरुन तयार केलेल्या या पूर्णपणे काल्पनिक पाच अति लघु कथा… […]

माझं “माझं” दुःख !

दुःख वाटल्याने कमी होतं म्हणे ! हेही पटत नाही. माझ्याकडचं एक किलो दुःख चार जणात वाटल्याने ते प्रत्येकी २०० ग्रॅम ( मी धरून पाच ) होत नाही. माझ्यासाठी ते एक किलोच राहतं आणि प्रदीर्घ काळ टिकतं . नवं दुःख आलं म्हणजे जुनं विसरलो असं होत नाही. ते सतत असतच आणि एकाकी असताना नव्याने, पूर्ण शक्तीनिशी भिडतं. […]

एकेक दिवा वाटू या !

आपण शेवटचे दमदार हस्तांदोलन कधी केले आहे, आठवतंय? आणि हो, दुसऱ्याला शेवटची घट्ट, उबदार मिठी उसासून कधी मारलीय? म्हटलं तर या छोट्या, नगण्य गोष्टी -इतरवेळी त्यांच्याकडे सहसा लक्षही दिले जात नाही. पण अचानक या क्षुल्लक भासणाऱ्या “सहवासाचे” आवर्तन महत्वाचे ठरले आहे. या “ना स्पर्श” कोरोना पर्वात आपल्याला खिळखिळे करण्याचे सामर्थ्य आहे, हे आत्ता आत्ता लक्षात येऊ लागले आहे. […]

1 50 51 52 53 54 135
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..