संकटाला तोंड देण्यासाठी आणि हाताळण्यासाठी मानवता हा गुणविशेष नेतृत्वाने आत्मसात केला तर प्रतिसाद अधिक शीघ्र आणि संकटमुक्ती अधिक वेगाने शक्य होईल. कृतीसाठी सामुहिक स्वर , स्वतःबद्दलची मक्तेदारी आणि इतरांचे आपल्यावरील दायित्व यांचा विचार नेत्याला करावाच लागतो. […]
खरे तर आपल्याला बुद्धी दिली हा शापच आहे असे आज वाटत आहे. कारण अनुकरण म्हणा एखादा इम्पॅक्ट इतका जबरदस्त असतो की तो मनाच्या पाठीवर भुतासारखा मानगुटीवर बसतोच बसतो. निगेटिव्हिटी किती जोपासावी , त्याला ही खरेच मर्यादा आहेत , आणि पोझीटीव्हीटी किती आणावी यालाही मर्यादा आहेतच. […]
आज दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीत आपला लेख “इस्राईल चे दोन चेहरे” वाचला. सदर लेख तुम्ही वस्तुनिष्ठ राहून न लिहिता, स्वतःची मते घुसडत, इस्राईल व पॅलेस्टाईन वादात ज्यांचा काडीमात्र संबंध नाही अशा हिंदू लोकांना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना, तुम्हाला हवे त्याप्रमाणे गुंतवण्याचा प्रयत्न केला आहे, जो निंदनीय आहे, म्हणूनच तुमचा सदर लेख दुर्लक्ष करण्यायोग्य आहे. तथापी हा लेख दै सकाळ मध्ये प्रसिद्ध झाला असून दै सकाळचा वाचकवर्ग हा बुद्धिजीवी व विचारवंत आहे, त्यांचे मत कलुषित होऊ नये यासाठी हा पत्रप्रपंच ! […]
भीती नावाच्या प्रकाराची मनुष्याला अगदी लहान वयातच ओळख होत असते.” झोप लवकर, बागुलबुवा येईल बघ. “इथपासून सुरू झालेला आपल्यातील भितीचा प्रवास अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच मृत्यूशय्येवर पडल्यावर होणाऱ्या विलक्षण थररकापापर्यंत सुरूच असतो. भितीची कारणं वेगवेगळी असतील… प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या असतील परंतु कोणतीही व्यक्ती घ्या कशाची ना कशाची भिती तिला सदैव सतावत असतेच.. लहानपणी मला अशीच बुरुजावरच्या […]
भाषांचे, उच्चारांचे, संकरांचे आपापले कप्पे असतात. शेजारची भिंत उडी मारून दुसऱ्या अंगणात पटकन घुसता येते, पण तेथे स्थिरावता येत नाही. आपली गांवे, गावकूस सांभाळणे आणि नंतर शक्य असेल तर उंबरा ओलांडणे हे श्रेयस्कर ! […]
हिरवी हिरवी रानं….निळं निळं आकाश…लख्खं लख्खं सूर्यप्रकाश पात्यापात्यावर चमकणारे दवबिंदू …उंच माळाच्या पोटाला अलगद बिलगून जाणारी चिमुकली पाय वाट. हलकेच झाडाला हेलकावून टाकणा-या वा-याच्या लहरी… झाडावर बगळ्यांची पांढरी नक्षी हे सारं असं मनात साठवलेलं होतं.. पूर्वी.परिसराची किती किती ओढ होती म्हणून सांगावी…. निसर्गाविषयी खूप आकर्षण वाटायचं.. तासनतास घालवायचे नदीच्या काठावर.. पिवळी- पिवळी कन्हेरीची फुलं गोळा करायची.. […]
लोभसपणा म्हणजे मोह होऊन जडलेले आकर्षण. कधी ते आकर्षण एखाद्या व्यक्तीवर होते तर कधी ते आकर्षण एखाद्या वस्तूचे असते. लोभ हा प्रत्येकाकडे आहे, पण तो इतरांच्या वस्तूवर कधीही नसावा, यावर रचलेली एक सुंदर बोधकथा… […]
कोरोना जगभर फिरुन भारतात आला.त्यानी जनजीवन विस्कळीत केलं.आपण घरी बसून कंटाळलो. कधी एकदा लोकांमधे मिसळतो, असं म्हणता म्हणता बुडाला मोड फुटले. आपल्या देशात कधीही बंद नपडणारी मुंबईची लाईफलाईन पूर्ण बंद झाली. कार्यालये ओस पडली, मग ती सरकारी असोत की खाजगी. […]
४५१ वर्षांत तिसवाडी म्हणजेच इल्हास म्हणजेच १५४३ पर्यंतचे गोवा यामधे काय घडले याबद्दल आपल्याला माहितीच नाही. माहिती नाही म्हणून आपण विचारही करीत नाही. जे सांगितले गेले शिकविले गेले ते समजले, आता आपल चाललय ना व्यवस्थित मग सोडून देऊ अस आपण जगलो. पण आपल्या आक्रमक कर्त्यानी नोंदी लिहून ठेवल्या म्हणून काही गोष्टी आता आपल्याला जाणून घेता येतात. असल्या बऱ्याच नोंदी-गोष्टी नष्ट केल्या गेल्या हे ही जाणून घ्या. […]
आज अनेकजण कोरोनामुळे संघर्ष करत आहेत तर काहींनी आपली जवळची माणसे गमावली आहेत. खरेच आपण ज्यांनी माणसे गमावली आहेत त्यांना ‘ बी पॉझिटिव्ह ‘ हा सल्ला देऊ शकतो का? […]