एका राज्यामध्ये एक सुप्रसिद्ध नामवंत मूर्तिकार राहत होता. त्याचे नाव होते. इंद्रजीत… मूर्ती घडविण्याचे अप्रतिम कौशल्य त्याच्याजवळ होते. तो अगदी हुबेहूब आणि जिवंत मुर्त्या घडवित असे. त्याच्या कलाकौशल्याला परदेशातही मागणी होती. राज्यात कित्येकदा त्याला त्याच्या या कलेबद्दल पुरस्कार मिळाला होता. […]
त्यानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि तो एकदम मोठा होऊन गेला . मोठा म्हणजे अगदी खूपच मोठा . आभाळा एवढ्या उंचीचा आणि समुद्रएवढ्या खोलीचा . अर्थात उंची होतीच पहिल्यापासून पण कुणाला दिसली नव्हती . अर्थात चिरपरिचित असल्यानं ती कुणाला जाणवली नव्हती . […]
विज्ञानविषयक मजकूर छापतांना पारिभाषिक शब्दांच्या बाबतीत बर्याच अडचणी येतात. सर्वमान्य पारिभाषिक शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होतो. अुदा. ‘बॉयलिंग पॉअिंट’ या अिंग्रजी शब्दास ‘अुत्कलनबिंदू’ हा सर्वमान्य शब्द आहे. फार तर ‘अुत्कलनांक’ किंवा ‘अुकळांक’ हे शब्द वापरले तरी चालण्यासारखं आहे. पण ‘बुदबुदांक’ हा शब्द वापरल्यास अर्थबोध चट्कन होणार नाही. कोणताही द्रव अुकळत असतांना बुदबुद असा आवाज येतो हे खरं आहे. […]
इच्छा असेल तर मार्ग दिसेल. जेव्हा मनातून एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असतो, त्या इच्छेला मार्ग आपोआपच खुला होत जातो. इच्छा चांगली असेल, तर आपले आणि आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच घडते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र दुसर्यांसोबत आपलेही वाईट घडते. अशीच एक इच्छेला मार्ग दर्शवणारी ही कथा… […]
या विषयाचा आवाका फार मोठा आहे. फेसबुकच्या माध्यमातून, जगभरच्या मराठी विचारवंतांशी संपर्क साधता येतो, विचारांची देवाणघेवाण करता येते, आपले विचार, जगभरच्या विचारवंतांना क्षणभरात पोचविता येतात वगैरे सुविधा असल्यामुळे या माध्यमाचा सुयोग्य वापर करून मराठी भाषेला, कालमानानुसार, समृध्द करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करता येण्यासारखा आहे. […]
आमची मुंबईच्या प्रिय मुंबईकरांनो मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोलायचं कारण म्हणजे आज मला मनातुन खूप भरून आले आहे. आणि भरून येण्याचे कारण म्हणजे मला लवकरच तुमच्या सेवेत पूर्ण क्षमतेने सामावून घेण्याची चर्चा माझ्या कानापर्यंत पोहचली आहे. […]
मराठी भाषेचं सौष्ठव अधोरेखित करण्याचं काम करणारी आणि मला कायम स्तिमित करणारी चार व्यक्तिमत्वं म्हणजे ज्ञानोबा माउली, समर्थ रामदास, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि श्री. दा. पानवलकर ! या मंडळींच्या लेखणीतून व्यक्त होणारी मराठी काही औरच ! तुम्ही -आम्ही बोलतो ती मराठी त्यांच्या भाषेपेक्षा वेगळीच वाटते. […]
आज आपण आपले जीवन उदात्त बनवण्याच्या चार मौल्यवान घटकांवर विचार करूया. हे घटक आपल्या नियतीला दिव्यत्वाच्या मार्गावर खचितच नेतील. त्याच्या पूर्तीसाठीच हा मानवी जन्म आपणांस बहाल करण्यात आला आहे. पृथ्वीवरील मानवाच्या आगमनामागचे जे ज्ञात पैलू आहेत- ज्ञान, आकलन, बुद्धिमत्ता, समज, परिपक्वता, ते सारे साध्य होण्यासाठी हे चार घटक महत्वाचे ठरतात. हा “आत्मज्ञानाचा ” मार्ग आहे. […]
श्रीमहालक्ष्मीची अनेक नावे, अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधूकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, राजेश्वरी, चंद्रा, गिरीजा, पद्मा, मालती आणि सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीमाता ओळखल्या जातात. अशा या सर्वांभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मी मातेचे ध्यान लागावे अशी ही कथा आहे. […]
लोकसत्ताच्या ‘चतु:सूत्र’ या सदरातील ‘संस्कृतीच्या वाटाघाटी’ हा प्रा. श्रद्धा कुंभोलकर यांचा १२नोव्हें. २०२० ला ( पुणे आवृत्तीत ) प्रसिद्ध झालेला लेख आणि त्यानिमित्तानें प्रा, विजय काथरे यांची १३ नोव्हे. ची लोकसत्तामधील ‘लोकमानस’ या सदरातील प्रतिक्रियाही वाचली. सत्यनारायण व्रतावर आणखी माहिती मिळावी अशी इच्छा काथरे यांनी प्रगट केलेली आहे. त्यानुसार माझा हा लेख. […]