मेरा भारत महान असं ट्रकच्या मागे लिहिलेले दिसतं. परंतु हे वाक्य वाचणारा मंत्री त्याचे कार्यकर्ते व देशातील इतर नागरिक त्यांच्या गाडीच्या मागे मात्र, ‘मेरा भारत महान’ असं लिहिताना दिसत नाहीत. ही बाब विचारतंद्री वाढवणारी आहे.असं का होतं? ट्रकवाला सोडून देशातील इतर लोकांना का वाटत नाही, की माझ्या गाडीच्या मागे मेरा भारत महान असं वाक्य असलेलं असावं. […]
घटस्थापना.. अर्थात घरोघरी देव बसतात. नऊ दिवस घरोघरी देवीची उपासना केली जाते.सप्तशतीचे पाठ पठण केले जातात. देवीची विविध स्तोत्रे, आरत्या म्हंटल्या जातात.याचवेळी नऊ दिवस विविध मंडळाच्या दुर्गादेवी पण बसतात. […]
मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘ ऊठ लेका, जागा हो, तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा. आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे, त्यांना म्हणावे, हे आमचे सर्वसामान्यांचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी. तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस, हे बरे. म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’ […]
नवरात्रीच्या नऊ रंगाचे कपडे नऊ दिवस घालायचे आणि फोटो काढून पाठवायचे. एक मजेचा भाग म्हणून छान वाटतं. पण ही काही परंपरा / धार्मिक रीत आहे का? अजिबात नाही. फेसबुक आणि सोशल मीडियाच्या काळाआधी म. टा. / लोकसत्तेच्या पुरवणी मधून नवरात्रीचे नऊ रंग छापून येऊ लागले. त्याबरोबर वेगवेगळ्या ऑफिसेस मधले ग्रुपफोटो छापायला लागले. प्रसिद्धी मिळाल्याने अजूनच हे प्रस्थ पसरत गेले. […]
शिक्षणावर शहरी माणूस सर्वात जास्ती खर्च करतो, शिक्षणाचा रोजचा माणशी खर्च दीडशे रुपयांच्या आसपास जातो. स्पेशल ट्युशन्स लावल्या, काही कला किंवा खेळाचे प्रशिक्षण घेतले तर तो खर्च कितीही वाढू शकतो. यामध्ये चार जणांचे कुटुंब गृहीत धरलेले आहे.माणशी रोजचा खर्च पावणे पाचशे ते साडेसहाशे इतका येतो.याच्या पुढचे उत्पन्न हे गुंतवणूक म्हणून वापरता येऊ शकते. […]
भिती माणसांच्या विचारांमध्ये असते, ती जगात कुठेही अस्तित्वात नाही. भितीग्रस्त माणूस ज्या गोष्टीला घाबरतो ती गोष्ट सर्वात मोठी समजतो, ज्या गोष्टीला तो घाबरत नाही त्या गोष्टीला तो तुच्छ समजतो. भितीग्रस्त माणूस ज्याची भिती वाटते अशा गोष्टींच्या सूचना अंमलात आणतो, भीतीदायक माणसांना खुश ठेवायचा प्रयत्न करतो आणि ज्या गोष्टीची भीती वाटत नाही त्यांना अक्षरशः नजरअंदाज करतो. […]
वाचून बघ किंवा होऊन बघ मग कळेल, पुस्तकाने उत्तर दिले. कपाटात रहातो म्हणून कमी समजू नका. वाचता वाचता झोप आली की तसेच छातीवर किंवा डोळ्यावर ठेवून बघा. अनेकांना मी हवा असतो वाचकांना वाचण्यासाठी कपाटांना कधी कधी सजवण्यासाठी तर काहींना ढापण्यासाठी पुस्तके ढापणारी मंडळी पण मजबूत असतात….तरबेज असतात… कोणी ज्ञानासाठी ढापते तर कोणी अज्ञान झाकण्यासाठी.. पुस्तकाप्रमाणे मजकूरही […]
मे महिना म्हणजे सुट्टीचा आणि धमाल करण्याचा महिना. तुमच्या या धमाल आनंदात भर घालण्यासाठी आम्ही सादर करीत आहोत एक विज्ञानकथा. विज्ञान, तंत्रज्ञान, गुन्हेगारी आणि भावना यांचे आगळेच रसायन असणारी ही कथा आहे. आम्हांला खात्री आहे की, ती तुम्हांला नक्की आवडेल! […]
अनेकजण सागतात मुलगा चार वर्षाचा होईपर्यंत त्याच्या हातात ‘ स्क्रीन ‘ देवू नये म्हणजे मोबाईल किवा तत्सम गोष्ट कारण वयाच्या ३ ते ४ वर्षापर्यंत त्याच्या मेदूची वाढ झपाट्याने होत असते जर त्याच्या हातात त्यावेळी ‘ स्क्रीन ‘ अथवा दुसरी वस्तू दिली तर त्याचे विचार त्याभोवतीच फिरत असतात त्याला तीच एकच वस्तू गुंतून ठेवते परिणामी त्याच्या मेदुच्या पूर्ण वाढीस अडथळा निर्माण होतो असे म्हणतात, त्याच्या मेदूची वाढ सर्वाकष होत नाही असे म्हणतात. […]