कोरोनामुळे जग बदलत आहे, अजूनही बदलणार आहे. जगण्याच्या विविध क्षेत्रांवरच नाही तर सामाजिक परंपरा आणि चालीरीतीवरही याचा परिणाम होत आहे, यापुढेही तो होणार आहे. मात्र, हा बदल महाराष्ट्रातील जनता लढाऊ वृत्तीने आणि सामाजिक जाण भान जपत स्वीकारत आहे, ही बाब कौतुकास्पद म्हणावी लागेल. आषाढी एकादशी आणि वारीच्या निमित्ताने त्याचा प्रत्यय आला. लाखो विठ्ठलभक्तांच्या उपस्थितीत जवळपास पंधरा दिवस साजरा होणारा पंढरीच्या वारीचा महोत्सव यंदा सरकारी नियम पाळून अगदी मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. […]
गुरु म्हणजे जीवनाचे मांगल्य, जीवनाचे कल्याण, साक्षात जीवनाचे व्यवस्थापन, जीवनाला दिलेला अर्थ, गुरुविना जीवन म्हणजे दिशेविणा मार्ग , जीवनामध्ये गुरु असणं हे खुप महत्त्वाचे आहे. जन्मापासुन ते मॄत्युपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर गुरु हे लागतातच. ज्ञान देणं हे गुरुंचे परम कर्तव्य…आणि या कर्तव्याला धारण करणारी व्यक्ती म्हणजे गुरु… […]
पूर्वीच्या काळाची आठवण झाली. एक शिक्षक अनेक वर्गांना शिकवीत असत. या शाळेत मुळात एकच शिक्षक आहे. जगातले हे विलक्षण ज्ञानपीठ आहे. इथे मी काय शिकलो याची चाचणी देणे बंधनकारक नाही. मी जर एक चांगला माणूस बनू शकलो व निसर्गाचा आदर केला तर शाळा सोडल्याचा दाखला मला नक्की मिळेल. […]
निवडणुकांची लगीनघाई सुरू झाली की लगेच तरुणांना केंद्रस्थानी ठेवून मीडियातील पत्रकार बांधव त्यांच्या कट्ट्यावर जाऊन मुलाखती घेतात. नवीन सरकार आणि लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्याचा हा प्रयत्न असतो. शाळा कॉलेजेस, व्यवसायसंधी आणि कधी नव्हे एवढी फुगलेली बेरोजगारी यावर चर्चासत्र आयोजिले जातात. वृत्तपत्रातील रकाने तरुणांच्या अपेक्षांनी भरले जातात. मग हेच हेरून लबाड राजकारणी आणि पक्ष आपल्या जाहीरनाम्यात तरुणांसाठी ‘खास तरतुदी’ करतात. हे सर्व निवडणूक आटोपेपर्यंतच असते. एकदाची निवडणूक संपली की तो केंद्रस्थानी असलेला तरुण आपोआपच त्या वर्तुळातून बाहेर फेकला जातो. […]
एक सुंदर असे टुमदार एक गाव होते. त्या गावाच्या वेशीवर एक गुरुकुल होते. गुरुकुलामध्ये ज्ञान देणारे एक ॠषीमुनी होते. या गुरुकुलामध्ये नित्यनियमाने शिष्य येत असत. आपल्या गुरुंकडुन ज्ञान घेत असत. गुरुंसोबत गप्पागोष्टी करत असत. असा उपक्रम गुरुकुलामध्ये नित्यनियमाने होत असे. […]
ही कोणती स्पर्धा जेथे एखाद्याच्या पोटावर पाय ठेवून पुढे जाण्यास मज्जा येते. जो तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. फक्त ऐकवण्याच्या गोष्टीत स्वारस्व मानतो.’आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ अशी भरकटलेली तसेच वाईट दृष्टीच्या विचारांचा अंगीकार करून त्रुट्या काढण्यात अनेक महाशय धन्यता मानतात. आपल्या खांद्याला खांद्या लावून चालणारा पुढे जाण्यास निघाला की, पाय खेचण्याची ओढच काही जणांना लागते. […]
काही दिवसांपूर्वी माझ्या एका मानसोपचार तज्ञ असणाऱ्या मित्राने एक नवीन संज्ञेशी परिचय करून दिला ती म्हणजे AQ अर्थात Adversity Quotient जो प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करण्याच्या क्षमतेची कल्पना देतो. आपण त्याला प्रतिकूलता गुणांक म्हणू. […]